...म्हणे आम्ही भारतावर 10 सर्जिकल स्ट्राईक करू; पाकची दर्पोक्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2018 06:05 IST2018-10-14T06:04:59+5:302018-10-14T06:05:53+5:30

लंडन येथील पाकिस्तानच्या लष्कराच्या एका कार्यक्रमावेळी पत्रकारांसमोर त्यांनी ही दर्पोक्ती केली.

will do 10 surgical strikes on India; Pakistan's repatriation | ...म्हणे आम्ही भारतावर 10 सर्जिकल स्ट्राईक करू; पाकची दर्पोक्ती

...म्हणे आम्ही भारतावर 10 सर्जिकल स्ट्राईक करू; पाकची दर्पोक्ती

इस्लामाबाद : भारताने पाकच्या हद्दीत घुसुन एकजरी हल्ला केल्यास आम्ही 10 सर्जिकल स्ट्राईक करू अशी धमकी पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्ता मेजर जनरल आसिफ गफूर यांनी दिली आहे. 


लंडन येथील पाकिस्तानच्या लष्कराच्या एका कार्यक्रमावेळी पत्रकारांसमोर त्यांनी ही दर्पोक्ती केली. पाकिस्तानचे लष्कर प्रमुख कमर जावेद बाज्वाही या कार्यक्रमाला उपस्थित होते. 


जे पाकिस्तानवर हल्ला करण्याचे मनसुबे ठेवून आहेत त्यांनी पाकची ताकदही एकदा पाहावी. 50 दशलक्ष डॉलरचा सीपेक कॉरिडॉर पाक लष्कराच्या सुरक्षेखाली आहे. या प्रकल्पामुळे पाकची आर्थिक ताकद वाढेल, असेही गफूर यांनी सांगितले. 


पाकिस्तानमध्ये लोकशाही मजबूत व्हावी असे लष्कराला वाटते. जुलैमध्ये झालेली सार्वत्रिक निवडणूक ही आजपर्यंतची सर्वात पारदर्शक होती. जर कोणताही पुरावा सापडल्यास त्यावर कडक कारवाई केली जाईल. पाकच्या प्रसारमाध्यमांना स्वातंत्र्य दिलेले आहे. त्यांच्यावर कोणतीही बंधने लादलेली नाहीत, असा खुलासा त्यांनी केला. 


आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांनी पाकिस्तानमधील वाईटपणापेक्षा चांगल्या विकासकामांवरही लक्ष द्यावे. पाकमध्ये वाईटापेक्षा चांगली कामे जास्त होत आहेत, असेही गफूर म्हणाले. 
 

Web Title: will do 10 surgical strikes on India; Pakistan's repatriation