दुबई : पर्शियन आखातातील इराणच्या खार्ग बेटावरील तेल टर्मिनल ताब्यात घेण्याचा विचार अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बोलून दाखविला आहे. तसेच युद्धविराम करार लवकर झाला नाही तर इराणमधील वीज, पाणी शुद्धीकरण प्रकल्पासारख्या महत्त्वाच्या पायाभूत सुविधा अमेरिका पूर्णपणे नष्ट करेल असा इशाराही ट्रम्प यांनी दिला.
ते म्हणाले की, इराणमधील तेल मिळविणे यालाही आम्ही प्राधान्य दिले आहे. त्यासाठी तेल प्रकल्प असलेल्या खार्ग बेटावर कब्जा करावा लागेल. होर्मुझ सामुद्रधुनीतून २० तेल टैंकरना जाण्याची परवानगी इराणने सोमवारी दिली आहे. अमेरिका इराणशी थेट आणि अप्रत्यक्ष चर्चा करत आहे. पण इराणबाबत नक्की सांगता येत नाही. त्यामुळे मग कारवाई करावी लागते.
इराणने प्रत्युत्तर दिले की, ट्रम्प सरकारकडून आम्हाला १५ मुद्द्यांचा युद्धविराम प्रस्ताव मिळाला आहे. पण त्यात अमेरिकेने केलेल्या मागण्या अवास्तव असून त्याबाबत आम्ही त्या देशाशी अद्याप थेट चर्चा केलेली नाही.
इस्रायलवर हल्ले
इस्रायलच्या प्रमुख अणुसंशोधन केंद्राजवळ पहाटे सायरन वाजले. गेल्या काही दिवसांत या भागाला इराणने वारंवार लक्ष्य केले आहे. येमेनमधून डागण्यात आलेले दोन ड्रोन इस्रायलच्या लष्कराने पाडले आहेत. इराणसमर्थित हुती बंडखोरांनी शनिवारी पहिला क्षेपणास्त्र हल्ला करत या युद्धात प्रवेश केला होता.
आजवरची जीवितहानी
लेबनॉनमध्ये १,२००हून अधिक लोक ठार झाले असून, दहा लाखांहून अधिक विस्थापित झाले आहेत. इराणमध्ये युद्धात १,९०० हून अधिक लोक ठार झाले आहे, तर इसायलमध्ये १९ जणांचा मृत्यू झाला आहे. इराकमध्ये ८० सुरक्षा दलांचे सदस्य मृत्युमुखी पडले आहेत.
भारतीय नागरिकाचा मृत्यू
कुवेतमध्ये वीज तसेच पाणी शुद्धिकरण प्रकल्पावर इराणने केलेल्या हल्ल्यात एका भारतीय नागरिकाचा मृत्यू झाला. महिनाभरापूर्वी सुरू झालेल्या या संघर्षात आतापर्यंत आठ भारतीयांचा मृत्यू झाला आहे. कुवेतच्या वीज, पाणीविषयक मंत्रालयाने सांगितले की इराणने रविवारी हा हल्ला केला. त्यात मृत्यू झालेल्या भारतीय नागरिकाच्या कुटुंबीयांच्या आम्ही संपर्कात आहोत. कुवेतच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून लवकरात लवकर या नागरिकाचा मृतदेह कुटुंबीयांच्या हवाली करण्यात येईल, असे भारतीय दूतावासाने म्हटले आहे. इराणच्या उत्तर भागात सोमवारी पहाटे तब्रीझ पेट्रो केमिकलच्या एका युनिटवर हल्ला करण्यात आला. हा हल्ला कोणी केला याबद्दल इराणने अद्याप काहीही माहिती दिलेली नाही. दरम्यान, आम्ही लवकरच अमेरिका आणि इराण यांच्यात चर्चा घडवून आणणार आहोत, असे पाकिस्तानने जाहीर केले आहे.
Web Summary : Trump warned of destroying Iran's infrastructure, including power and water plants, if a deal isn't reached. He considered seizing Iran's oil terminal and accused Iran of attacking Israel and Kuwait, leading to casualties, including an Indian citizen. Pakistan offered to mediate US-Iran talks.
Web Summary : ट्रंप ने ईरान के बिजली और पानी संयंत्रों जैसे बुनियादी ढांचे को नष्ट करने की धमकी दी। उन्होंने ईरान के तेल टर्मिनल पर कब्जा करने पर विचार किया और ईरान पर इजराइल और कुवैत पर हमला करने का आरोप लगाया, जिसके परिणामस्वरूप एक भारतीय नागरिक सहित कई लोगों की मौत हुई। पाकिस्तान ने अमेरिका-ईरान वार्ता में मध्यस्थता की पेशकश की।