पुन्हा हाहाकार माजवणार कोरोना? जपानच्या 'बाबा वेंगा'ने केलीय धडकी भरवणारी भविष्यवाणी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2025 15:00 IST2025-05-28T14:59:29+5:302025-05-28T15:00:11+5:30
जपानच्या या ‘बाबा वेंगा’ने 1999 मध्ये ‘द फ्यूचर एज आई सी इट’ नावाचे एक पुस्तक लिहिले आहे. यात, रात्रीच्या काही वाईट स्वप्नांवरून काही विचलित करणारी भाकितं वर्तवण्यात आली आहेत.

पुन्हा हाहाकार माजवणार कोरोना? जपानच्या 'बाबा वेंगा'ने केलीय धडकी भरवणारी भविष्यवाणी!
भारतात पुन्हा एकदा कोरोना रुग्ण समोर येताना दिसत आहेत. यातच, काही दशकांपूर्वी जपानी 'बाबा वेंगा' नावाने परिचित असलेल्या प्रसिद्ध मंगा कलाकार रियो तात्सुकीने (Ryo Tatsuki) केलेली एक भविष्यवाणी चर्चेचा विषय बनली आहे. 2030 मध्ये एक घातक व्हायरस हाहाकार माजवणार, अशी भविष्यवाणी रियोने केली होती. खरे तर रियोची ही भविष्यवाणी धडकी भरवणारी आहे. कारण, रियो तात्सुकी यांची आधीची काही भाकितं सत्यसिद्ध झाली आहेत. जैसे कि, 2020 मधील कोरोना महामारी.
10 वर्षांनंतर पुन्हा हाहाकार माजवणार व्हायरस...!
जपानच्या या ‘बाबा वेंगा’ने 1999 मध्ये ‘द फ्यूचर एज आई सी इट’ नावाचे एक पुस्तक लिहिले आहे. यात, रात्रीच्या काही वाईट स्वप्नांवरून काही विचलित करणारी भाकितं वर्तवण्यात आली आहेत. यात, 2020 मध्ये एक अज्ञात व्हायरस येईल, जो एप्रिल महिन्यात मोठे थैमान घालून सौम्य हईल आणि 10 वर्षांनंतर पुन्हा दिसून येईल.
आरोग्यावर मोठा परिणाम होईल! -
रियो तात्सुकी यांच्या नव्या व्हायरल भविष्यवाणीनुसार, हा व्हायरस आणखी हाहाकार माजवणार. रियो यांच्या पुस्तकात म्हणण्यात आले आहे की, संबंधित व्हायरस पूर्वीच्या तुलनेत अधिक भयंकर रूप धारण करेल आणि अधिक लोकांचा बळी घेईल. याच बरोबर, तो पुन्हा एकदा जागतिक आरोग्य व्यवस्था नष्ट करेल.
यातच, वाढत्या कोरोना रुग्णसंख्येसंदर्भात कसल्याही प्रकारची चिंता करण्याची आवश्यकता नाही. दक्षिण भारतातून घेण्या आलेल्या सॅम्पल्सची जीनोम सीक्वेंसिंगवरून कोविड-19 चा नवा व्हेरिअन्ट गंभीर नसल्याचे समजते. तसेच हा ओमिक्रॉन सब व्हेरिअन्ट आहे, असे इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्चेच (ICMR) महानिदेशक डॉ. राजीव बहल यांनी म्हटले आहे.