पाक सैन्यासोबत मिळून अफगाणिस्तानवर हल्ला करू; लष्कर-ए-तैय्यबाची उघड धमकी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2025 17:44 IST2025-12-12T17:44:01+5:302025-12-12T17:44:27+5:30
या धमकीमुळे पाकिस्तान-अफगाणिस्तानमधी तणाव आणखी चिघळण्याची शक्यता आहे.

पाक सैन्यासोबत मिळून अफगाणिस्तानवर हल्ला करू; लष्कर-ए-तैय्यबाची उघड धमकी
पाकिस्तानातील प्रमुख दहशतवादी संघटन लष्कर-ए-तैय्यबा (LeT) ने पाकिस्तान आर्मीसोबत मिळून अफगाणिस्तानवर हल्ला करण्याची थेट धमकी दिली आहे. यामुळे आधीच तणावपूर्ण असलेल्या पाक-अफगाण सीमेवरील परिस्थिती आणखी गंभीर झाली आहे. संयुक्त राष्ट्रांनी बंदी घातलेली ही संघटना पहिल्यांदाच पाकिस्तान सैन्याच्या बाजूने इतक्या उघडपणे उतरल्याने गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे.
लष्कर कमांडरची उघड धमकी
लष्करच्या वरिष्ठ कमांडरने पाक आर्मी चीफ असीम मुनीरच्या ‘चीफ ऑफ डिफेन्स फोर्सेस’ नियुक्तीचेही स्वागत केले. लष्करचे नेता आणि हाफिज सईदचा निकटवर्तीय कारी याकूब शेख याने एका व्हिडिओ संदेशातून पाकिस्तानच्या भूमिकेचे समर्थन करत अफगाणिस्तानला कठोर इशारा दिला. त्याने म्हटले, पाकिस्तानने अफगाणिस्तानासाठी दिलेल्या त्यागाचे फळ नेहमीच समर्थनाच्या रूपात मिळाले पाहिजे. पाकिस्तान-अधिकृत काश्मीर आणि अफगाण उलेमा यांनी फतवा दिला आहे की, अफगाण भूमीचा वापर पाकिस्तानविरोधी कारवायांसाठी होऊ नये, आम्ही याला पूर्ण पाठिंबा देतो.
🚨🇵🇰👹 Interesting days ahead.
— OsintTV 📺 (@OsintTV) December 12, 2025
Lashkar e Taiba declares it is prepared to take on Afghanistan and its terrorist networks 🫢
Hafiz Saeed’s close aide and senior LeT leader Qari Yaqoob Sheikh has endorsed Asim Munir’s elevation to CDF. PaK and Afghan ullema issued fatwa against… pic.twitter.com/UbiAZTNzR4
अफगाण सरकारकडून ‘लिखित हमी’ची मागणी
कारी याकूब शेख याने पुढे अफगाण सरकार आणि तालिबानकडून स्पष्ट हमीही मागितली. अफगाणिस्तानाने लिखित स्वरुपात आश्वासन द्यावे की, त्यांच्या भूमीवरुन पाकिस्तानविरोधी कोणतीही हालचाल होणार नाही. जर ही हमी मिळाली तर दोन्ही देशांतील संबंध नवीन उंचीवर जातील. अन्यथा लष्कर-ए-तैय्यबा पाकिस्तान सैन्यासोबत खांद्याला खांदा लावून अफगाणिस्तान व त्याच्या दहशतवादी नेटवर्कविरुद्ध लढण्यासाठी तयार आहे, असा इशारा दिला.
या धमकीचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून, यामुळे पाक-अफगाण सीमेजवळील तणाव आणखी भडकण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या व्हिडिओमध्ये उघडपणे अफगाणिस्तानवर सैन्यासोबत हल्ला करण्याची घोषणा केल्याने पाकिस्तान सरकार आणि दहशतवादी संघटनांमधील संबंध पुन्हा एकदा जगासमोर आले आहेत.