जगभरात का बंद पडलं होतं यूट्युब? भारतातही सेवा झाली होती ठप्प, आता कंपनीनं सांगितलं असं कारण
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2026 10:27 IST2026-02-18T10:26:02+5:302026-02-18T10:27:38+5:30
YouTube down News: लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असलेल्या युट्युबची सेवा आज सकाळी बराच वेळ ठप्प झाली होती. युट्युब डाऊन झाल्याने जगभरातील लाखो वापरकर्त्यांना युट्यूब वापरताना अडचणींचा सामना करावा लागत होता.

जगभरात का बंद पडलं होतं यूट्युब? भारतातही सेवा झाली होती ठप्प, आता कंपनीनं सांगितलं असं कारण
लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असलेल्या युट्युबची सेवा आज सकाळी बराच वेळ ठप्प झाली होती. युट्युब डाऊन झाल्याने जगभरातील लाखो वापरकर्त्यांना युट्यूब वापरताना अडचणींचा सामना करावा लागत होता. तसेच युट्यूबची सेवा अचानक कशी काय बंद पडली, असा प्रश्न विचारला जात होता. आता युट्यूबने सेवा बंद पडण्यामागचं कारण सांगितलं आहे.
यूट्युबने एक्सवर पोस्ट करून सेवा ठप्प होण्यामागचं कारण सांगितलं आहे. त्यात यूट्युबने म्हटले आहे की, आमच्या रेकमेंडेशन सिस्टिममध्ये आलेल्या समस्येमुळे यूट्युबवरील होमपेज, युट्यूब अॅप, युट्यूब म्युझिक आणि युट्यूब किड्स या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर व्हिडीओ दिसू शकत नव्हते.
आता युट्यूबचं होमपेज पुन्हा काम करू लागलं आहे. मात्र युट्यूबमध्ये आलेली समस्या पूर्णपणे दुरुस्त करण्याचं काम सुरू आहे. तसेच त्याबाबतची माहिती लवकरच दिली जाईल.
भारतामध्येही युट्यूबची सेवा पूर्वपदावर आली आहे. युट्युब पोर्टल सुरळीतपणे काम करत आहे. तसेच आऊटेजला ट्रॅक करणाऱ्या पौर्टलवरही रिपोर्टची संख्या घटून कमी झाली आहे.