मानवी ‘डीएनए’ बनवण्याचा प्रयोग का ठरतोय वादग्रस्त?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2025 08:47 IST2025-07-04T08:45:47+5:302025-07-04T08:47:39+5:30

पूर्णपणे मानवी डीएनएने प्रयोगशाळेत तयार करण्यास वैज्ञानिकांनी तयारी सुरू केल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. जगात पहिल्यांदाच असा प्रयोग होत असल्याचा दावा केला जात आहे.

Why is the experiment to create human DNA becoming controversial? | मानवी ‘डीएनए’ बनवण्याचा प्रयोग का ठरतोय वादग्रस्त?

मानवी ‘डीएनए’ बनवण्याचा प्रयोग का ठरतोय वादग्रस्त?

इंग्लंड : आजपर्यंत डीएनएसारख्या अत्याधुनिक उपचार पद्धतीवर चर्चा होत होती. मात्र, आता ब्रिटनच्या काही वैज्ञानिकांनी मानवाचा डीएनए प्रयोगशाळेत बनविण्यासाठी एका वादग्रस्त ह्यूमन जिनोम प्रोजेक्टवर काम सुरू केले आहे.

पहिल्यांदाच होत आहे असा प्रयोग

पूर्णपणे मानवी डीएनएने प्रयोगशाळेत तयार करण्यास वैज्ञानिकांनी तयारी सुरू केल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. जगात पहिल्यांदाच असा प्रयोग होत असल्याचा दावा केला जात आहे.

प्रयोगशाळेत डीएनए बनविण्याचा वैज्ञानिकांचा निर्णय पूर्णपणे चुकीचा असून, त्यामुळे मानवजात मोठ्या संकटात सापडण्याची भीती या प्रकल्पाला विरोध करणाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. तसे झाले तर मानव स्वत:च्या सोयीनुसार डीएनएच्या मदतीने दुसरा मानव तयार करू शकेल.

डीएनए बनविणे म्हणजे काय?

डीएनए बनविणे म्हणजे प्रयोगशाळेत कृत्रिमरीत्या मानवी जीनोम अर्थात डीएनएला रासायनिक प्रक्रियेच्या माध्यमातून तयार करणे. हे कार्य एखाद्या कॉम्प्युटरचा कोड लिहिण्यासारखे अवघड आहे. कॉम्प्युटर कोडमध्ये प्रत्येक अक्षराचा अर्थ वेगळा असतो. त्यामुळे एक छोटीशी चुकदेखील मोठा अनर्थ करू शकते.

डीएनए बनविण्याचे दुष्परिणाम

डीएनए तयार केल्यास एक प्रकारे मानवी जीवन प्रणालीवर नियंत्रण मिळवता येईल. तसे झाल्यास डीएनएच्या आधारे हवी तशी मुले जन्माला घालण्याची परंपरा सुरू होईल.

श्रीमंत लोकांमध्ये आपली मुले बुद्धिमान, सुंदर व शक्तिशाली बनविण्याची चढाओढ लागेल. मानवी डीएनए असणारे प्राणी बनविण्याचे प्रयोग होतील. एवढेच नाहीतर, जैविक शस्त्रांचा धोका वाढेल.

डीएनए म्हणजे नक्की काय?

डीऑक्सिरायबोन्यूक्लिक ॲसिड (डीएनए) प्रत्येक जीवंत पेशीत आढळून येतो. शरीराची संरचना, गुण, आजाराचे स्वरूप एवढेच नाही, तर तुम्ही कसे वर्तन करता हेदेखील डीएनए निश्चित करतो.

लाल पेशी(आरबीसी) सोडल्या तर शरीरातील प्रत्येक पेशीत डीएनए असतो. त्यातून महत्त्वाची आनुवंशिक माहिती समजते.

हे आहेत डीएनए तयार करण्याचे फायदे

डीएनए तयार करण्यात यश मिळाले तर जीन थेरेपी व आनुवंशिक आजारावर उपचार करणे शक्य होईल. कर्करोगासारख्या आजाराचे निदान जनुकाच्या पातळीवर करता येईल. ऑर्गन ट्रान्सप्लांटसाठी मदत होईल. प्रयोगशाळेत शरीराशी सुसंगत अवयव बनविण्यासाठी मदत होईल. आजारांशी लढणाऱ्या पेशी तयार केल्या जातील. त्यामुळे नुकसान झालेले अवयवदेखील दुरुस्त करता येतील.

Web Title: Why is the experiment to create human DNA becoming controversial?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.