इराणचे खामेेनेईच अमेरिकेचे लक्ष्य का? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2026 05:24 IST2026-03-01T05:24:30+5:302026-03-01T05:24:51+5:30

अमेरिकेचे खरे लक्ष्य खामेनेईच आहेत. त्यांना सत्तेवर हटवून लोकशाही सरकार आणण्याचे अमेरिकेचे प्रयत्न आहेत. असे हे खामेनेई १९८९ सालापासून इराणचे सर्वोच्च नेता म्हणून पदावर कार्यरत आहेत.

Why is Iran's Khamenei the target of America? | इराणचे खामेेनेईच अमेरिकेचे लक्ष्य का? 

इराणचे खामेेनेईच अमेरिकेचे लक्ष्य का? 

 

तेहरान/जेरुसलेम/वॉशिंग्टन : इराणच्या अणुकार्यक्रमावरून चर्चा फिस्कटल्यानंतर इस्रायल व अमेरिकेने इराणवर आक्रमण केले आहे. या आक्रमणात त्यांनी इराणचे सर्वोच्च नेते अयातोल्लाह अली खामेनेई यांच्या अधिकृत कार्यालयावर हल्ले केले आहे. परंतु ताज्या वृत्तानुसार खामेनेई हे जिवंत असल्याचे इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांनी सांगितले. 

अमेरिकेचे खरे लक्ष्य खामेनेईच आहेत. त्यांना सत्तेवर हटवून लोकशाही सरकार आणण्याचे अमेरिकेचे प्रयत्न आहेत. असे हे खामेनेई १९८९ सालापासून इराणचे सर्वोच्च नेता म्हणून पदावर कार्यरत आहेत. त्यांच्याकडे देशाच्या सर्व प्रमुख निर्णयांपैकी राजनैतिक, लष्करी आणि न्यायिक अधिकार आहेत. ते इराणच्या इस्लामिक रिव्हल्यूशनरी गार्ड कॉर्प्स आणि इतर प्रमुख सुरक्षा संस्थेचे नियंत्रण ठेवतात. या संस्था सत्ता संरचनेचा मूळ आधार आहे. याशिवाय, त्यांनी अनेकदा परकीय धोरणांवर कठोर भूमिकाआधी घेतली आहे.

अमेरिकाच आमचा शत्रू’
खामेनेई यांनी सतत पाश्चात्त्य देशांशी तणावपूर्ण संबंध ठेवले आहेत. त्यांच्या कार्यकाळात अमेरिका, युरोपकडून लादलेले कठोर आर्थिक निर्बंध, देशांतर्गत अर्थव्यवस्था आणि नागरी हक्कांबाबत उसळलेली अनेक आंदोलने झाली आहेत. खामेनेई अमेरिकेला इराणचा क्रमांक एक शत्रू असे संबोधत असून, त्यानंतर इस्रायलचा क्रमांक लागतो, असे ते वारंवार म्हणत आले आहेत. इराण कधीही अण्वस्त्र तयार करणार नाही आणि त्यांचा अणू कार्यक्रम केवळ नागरी उद्देशांसाठी आहे, असे खामेनेई सातत्याने सांगत आले.

Web Title : ईरान के खामेनेई: अमेरिका का प्राथमिक लक्ष्य क्यों?

Web Summary : ईरान के परमाणु कार्यक्रम की वार्ता विफल होने के बाद, अमेरिका और इज़राइल ने हमला किया। 1989 से ईरान के सर्वोच्च नेता खामेनेई, शासन परिवर्तन के लिए अमेरिका का मुख्य लक्ष्य बने हुए हैं, भले ही ईरान ने परमाणु हथियार के इरादे से इनकार किया हो।

Web Title : Iran's Khamenei: Why is he the primary target for America?

Web Summary : Following Iran's nuclear program talks failure, US and Israel attacked. Khamenei, Iran's supreme leader since 1989, remains America's key target for regime change, despite Iran's denial of nuclear weapon intentions.