होर्मुझ सामुद्रधुनीतून एलपीजी गॅस घेऊन निघालेले भारतीय जहाज कधीपर्यंत पोहोचणार? सरकारने सांगितली तारीख

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2026 20:48 IST2026-03-14T20:44:56+5:302026-03-14T20:48:26+5:30

Indian Oil Ship Hormuz Strait: अमेरिका-इस्रायल युद्धामुळे होर्मुझच्या सामुद्रधुनीतून तेल, गॅसचे वाहतूक करणे धोक्याचे बनले आहेत. अशातच दोन तेल जहाज होर्मुझ सामुद्रधुनीतून भारताच्या दिशेने येत आहेत. 

When will the Indian ship carrying LPG gas from the Strait of Hormuz reach? The government has announced the date | होर्मुझ सामुद्रधुनीतून एलपीजी गॅस घेऊन निघालेले भारतीय जहाज कधीपर्यंत पोहोचणार? सरकारने सांगितली तारीख

होर्मुझ सामुद्रधुनीतून एलपीजी गॅस घेऊन निघालेले भारतीय जहाज कधीपर्यंत पोहोचणार? सरकारने सांगितली तारीख

Indian Oil Tankers Hormuz Strait: इराणविरोधात अमेरिका-इस्रायलने सुरु केलेल्या युद्धाने सर्वात मोठा तडाखा तेल, गॅसच्या वाहतुकीला बसला आहे. मध्य पूर्वेत निर्माण झालेल्य युद्ध परिस्थितीमुळे भारताची तेल आणि गॅस आयात विस्कळीत झाली असून, शनिवारी दिलासा देणारी घटना होर्मुझच्या सामुद्रधुनीत घडली. एलपीजी भरलेल्या दोन जहाजांनी होर्मुझ सामुद्रधुनी पार केली. त्याबद्दल केंद्रीय जहाज वाहतूक मंत्रालयाने माहिती दिली. 

जहाज वाहतूक मंत्रालयाचे विशेष केंद्रीय सचिव राजेश कुमार सिन्हा यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, शिवालिक आणि नंदा देवी हे दोन जहाज एलपीजी गॅस घेऊन निघाले असून, त्यांनी होर्मुझच्या सामुद्रधुनीत पार केली आहे. ही दोन्ही जहाजे १६ आणि १७ मार्च रोजी भारतातील बंदरांवर पोहोचतील. 

होर्मुझमुळे भारताचे किती जहाज अडकली?

सिन्हा म्हणाले की, पर्शियन गल्फ क्षेत्रामध्ये सर्व भारतीय नाविक सुरक्षित आहेत आणि मागील २४ तासात त्यांच्यासोबत कोणतीही वाईट घटना घडलेली नाही. होर्मुझ सामुद्रधुनीच्या पर्शियन गल्फमध्ये २४ भारतीय ध्वज असलेले जहाज आहेत. 

९२,७०० मेट्रिक टन एलपीजी, दोन जहाज भारताच्या दिशेने

'उभ्या असलेल्या जहाजांपैकी दोन जहाजांनी एक शिवालिक आणि दुसरे नंदा देवी, आज सकाळी (१४ मार्च) होर्मुझ सामुद्रधुनी पार केली. हे जहाज भारताच्या दिशेने येत असून, दोन्ही जहाजांमध्ये जवळपास ९२,७०० मेट्रिक टन एलपीजी भरलेला आहे', अशी माहिती सिन्हा यांनी दिली. 

'एक जहाज मु्ंद्रा पोर्ट आणि दुसरे जहाज कांडला पोर्टवर येणार आहे. मुंद्रा पोर्टवर येणारे जहाज १६ मार्च, तर कांडला पोर्टवर येणारे जहाज १७ मार्चला पोहोचेल, अशी आशा आहे. या व्यतिरिक्त पर्शियन गल्फमध्ये २२ भारतीय ध्वज असलेले जहाज उभे आहेत. त्यामध्ये एकूण ६११ नाविक आहेत. आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत, असे राजेश कुमार सिन्हा यांनी सांगितले.   

हमासने इराणला काय केले आवाहन?

पॅलेस्टाईनमधील संघटना हमासने युद्ध सुरू असताना इराणला शेजारी देशांवर सुरू असलेले थांबवण्याचे आवाहन केले आहे. हमासने म्हटले आहे की, 'आम्ही इराणी बांधवांना शेजारी देशांना लक्ष्य न करण्याचे आवाहन करतो. या भागातील देशांनी बंधुत्वाच्या भावनेतून आपले संबंध जोपासण्यासाठी काम केले पाहिजे.'

इराणने हमासच्या या आवाहनावरही अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, शेजारी देशांवरील हल्ल्यांबद्दल इराणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आधीच भूमिका स्पष्ट केली आहे. 

प्रत्युत्तरात शेजारी देशावर केलेले हल्ले हे अमेरिकेच्या ठिकाणांवर आहे. आखाती देशांच्या भूमीवर अमेरिकेची तळे आहेत. आम्ही शेजारी देशांवर हल्ले करत नाहीये, असे इराणने यापूर्वीच स्पष्ट केले आहे. 

Web Title: When will the Indian ship carrying LPG gas from the Strait of Hormuz reach? The government has announced the date