शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्र येणार, मुंबईत एकच मोर्चा काढणार, संजय राऊत यांची घोषणा
2
Sonam Raghuvanshi : आरोपींनी पोलिसांसमोर गुन्हा कबुल केला, पण न्यायाधीशांसमोर वेगळंच सांगितलं; राजा रघुवंशी प्रकरणात नवा ट्विस्ट
3
मराठी समाज विभागलाय, मुंबईत उत्तर भारतीय महापौर बनवण्याची हीच वेळ; सुनील शुक्लानं मांडलं गणित
4
Harjit Kaur: दुचाकीवरून आले अन् धाडधाड गोळ्या झाडल्या, कुख्यात गुन्हेगाराच्या आईची भररस्त्यात हत्या
5
ट्रेनच्या तिकिटांपासून ते ATM मधून पैसे काढण्यापर्यंत; १ जुलैपासून बदलणार तुमच्या पैशांशी निगडित 'हे' ६ नियम
6
पुण्यातील महिलेला ५ कोटींची पोटगी मिळालेली; NRI च्या भानगडीत पडली आणि...
7
Maratha Reservation Supreme Court: मराठा आरक्षणावर आता जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात सुनावणी
8
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, Sensex १५० अंकांनी वधारला; Tata Motors, Reliance, HCL Tech मध्ये तेजी
9
९० खाजगी जेट, ३० वॉटर टॅक्सी... पण लग्नपत्रिकेवरुन ट्रोल! बेझोस-सांचेझ यांच्या लग्नाची पत्रिका व्हायरल!
10
Prada : कोल्हापुरी चप्पलसाठी संभाजीराजे मैदानात; फेसबुक पोस्ट करुन केली मोठी मागणी
11
...तर दिल्ली-मुंबई टोल केवळ ३० रुपये लागेल; वार्षिक पास खरेदी करून २०० टोल ओलांडता येणार
12
बोगस लाभार्थी हटवले; केंद्राने ३ लाख कोटी रुपये वाचविले, ३१४ केंद्रीय योजनांची छाननी सुरू
13
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
14
शुभांशू ठरले अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय; म्हणाले, 'लहान बाळासारख्या गोष्टी शिकतोय'
15
"जबरदस्ती करायचे, नको तिथे स्पर्श करायचे, केबिनमध्ये बोलावून...’’, बीडमध्ये  शिक्षकांकडूनच विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण
16
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
17
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!
18
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
19
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
20
पुन्हा एकदा निळ्या ड्रममध्ये सापडला मृतदेह, दोरीने बांधलेले होते पाय आणि गळा

रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2025 08:31 IST

पाकिस्तानविरोधात ऑपरेशन सिंदूर राबवले यामध्ये रशियाने दिलेल्या S-400 या क्षेपणास्त्राने पाकिस्तानचे हल्ले हवेतच निकामी केले.

'ऑपरेशन सिंदूर'मध्ये रशियाने दिलेल्या S-400 या क्षेपणास्त्राने पाकिस्तानच्या हल्ल्यांना योग्य प्रत्युत्तर दिले. या क्षेपणास्त्रामुळे पाकिस्तानने सोडलेले क्षेपणास्त्र हवेतच निकामी केले, यामुळे भारताचे नुकसान झालेले नाही. रशियाकडून आणखी S-400 ही क्षेपणास्त्रे येणार आहेत. याबाबत रशियाकडून एक मोठी अपडेट समोर आली आहे. 

जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?

'२०२६-२७ पर्यंत अत्याधुनिक S-400 ट्रायम्फ जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्र प्रणालीच्या उर्वरित दोन स्क्वॉड्रनची डिलिव्हरी पूर्ण करणार असल्याचे आश्वासन रशियाने दिले आहे. गुरुवारी चीनमधील किंगदाओ येथे झालेल्या शांघाय सहकार्य संघटनेच्या संरक्षण मंत्र्यांच्या बैठकीच्या बाजूला भारतीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि त्यांचे रशियन समकक्ष आंद्रे बेलोसोव्ह यांच्यात द्विपक्षीय चर्चेदरम्यान हे आश्वासन देण्यात आले.

दोन्ही देशात संरक्षण सहकार्य मजबूत होणार

रशिया-युक्रेन युद्धामुळे या बहुप्रतिक्षित क्षेपणास्त्र यंत्रणेच्या पुरवठ्याला बराच काळ विलंब झाला होता. भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि रशियाचे नवनियुक्त संरक्षण मंत्री आंद्रे बेलोसोव्ह यांच्यात या विषयावर सविस्तर चर्चा झाली. बैठकीनंतर राजनाथ सिंह यांनी 'एक्स'वर सांगितले की, "भारत-रशिया संरक्षण सहकार्य अधिक मजबूत करण्यासाठी महत्त्वाच्या चर्चा झाल्या."

ऑपरेशन 'सिंदूर' मध्ये S-400 ने मोठं काम केलं

मागील महिन्यात पहलगाममधील झालेल्या हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव सुरू होता. यावेळी S-400 प्रणालीने "ऑपरेशन सिंदूर" मध्ये महत्त्वाची भूमिका बजावली होती. पाकिस्तानने ७ ते १० मे दरम्यान दावा केला होता की त्यांनी पंजाबमधील आदमपूर एअरबेसला लक्ष्य केले होते आणि तेथे तैनात असलेली S-400 बॅटरी नष्ट केली होती. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः १३ मे रोजी आदमपूर एअरबेसला भेट दिली आणि तेथे S-400 ऑल-टेरेन ट्रान्सपोर्टर-एरेक्टर-लाँचर सोबत फोटो काढून हा दावा फेटाळून लावला.

चौथ्या आणि पाचव्या स्क्वॉड्रनची डिलिव्हरी

रशियन अधिकाऱ्यांच्या मते, चौथी स्क्वॉड्रन २०२६ मध्ये आणि पाचवी स्क्वॉड्रन २०२७ मध्ये दिली जाईल. S-400 हवाई संरक्षण प्रणाली भारताच्या हवाई संरक्षण नेटवर्कचा सर्वात बाहेरील थर म्हणून काम करते आणि भारतीय हवाई दलाच्या एकात्मिक हवाई कमांड अँड कंट्रोल सिस्टमशी एकत्रित आहे. ती ३८० किमी अंतरावरून शत्रूची लढाऊ विमाने, ड्रोन, क्षेपणास्त्रे आणि पाळत ठेवणारी विमाने शोधून पाडण्यास सक्षम आहे.

टॅग्स :russiaरशियाPakistanपाकिस्तानIndiaभारतOperation Sindoorऑपरेशन सिंदूर