शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाचे २५-३० आमदार फोडण्याचं उद्धव ठाकरेंचं प्लॅनिंग झालं होतं; एकनाथ शिंदेंचा नवा दावा
2
"निवडणूक जिंकली तर..."; बॉलिवूड क्वीन कंगना राणौतची फिल्मी करिअरबाबत मोठी घोषणा
3
प्रचार समितीचा राजीनामा मागे घेतोय; काँग्रेस नेते नसीम खान यांची मोठी घोषणा
4
Acharya Pramod Krishnam : "जो PM मोदींसोबत नाही, तो देशद्रोही", आचार्य प्रमोद कृष्णम यांचे वादग्रस्त विधान
5
व्हॉट्सॲपच्या एका फिचरवरुन सरकारसोबत वाद, भारतात WhatsApp बंद होणार?
6
एका दिवसात ₹११७० कोटींनी कमी झाली Rekha Jhunjhunwala यांची संपत्ती, टाटाचा 'हा' शेअर आपटला
7
मोठी दुर्घटना! बॉल समजून बॉम्ब उचलला, ब्लास्टमध्ये लहान मुलाचा मृत्यू, 3 जखमी
8
“RSS-हेमंत करकरे यांच्यात संघर्ष, संघाचे लोक माझ्याकडे यायचे अन्...”; राऊतांचा मोठा दावा
9
T20 World Cup : बाबरने केली रोहितची कॉपी; वर्ल्ड कप जिंकण्यासाठी पाकिस्तानची सांगितली रणनीती
10
'साहेब, तब्येतीला जपा! विजय तुमच्या पायावर आणून ठेवतो',शरद पवारांसाठी बजरंग सोनवणेंची पोस्ट
11
Narendra Modi : "भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
12
Income Tax Saving Tips: EEE कॅटेगरीत येतात 'या' ४ स्कीम्स, यात पैसे गुंतवाल तर ३ पद्धतीनं वाचेल टॅक्स
13
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: बुध म्हणजे 'राजकुमार'; उत्तम वाणी, प्रखर बुद्धी, चिरतारुण्याचं वरदान
14
‘पुंछमध्ये IAF च्या ताफ्यावर झालेला हल्ला ही स्टंटबाजी, जेव्हा निवडणुका येतात तेव्हा..’ काँग्रेस नेते चरणजीत सिंग चन्नी यांचं विधान
15
PHOTOS : मोकळे केस अन् घायाळ करणाऱ्या अदा; धनश्री वर्माचा बोल्ड लूक!
16
मराठी उमेदवाराचा प्रचार करण्यास गुजराती सोसायटीत विरोध; ठाकरे गटाचा दावा, काय घडलं?
17
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी कन्हैया कुमारांनी केले हवन, सर्व धर्माच्या गुरूंचे घेतले आशीर्वाद! 
18
रथावर स्वार मुख्यमंत्र्यांनी गदा उंचावली, काँग्रेसमधून भाजपात आलेल्या आमदाराच्या डोक्याला लागली, मग...  
19
संत मंडळींमध्ये ‘वडील’, उत्तर भारतात मोठी ख्याती; ‘अशी’ आहे संत गोरोबा काकांची महती
20
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी

चंद्रावर स्वारीची पन्नाशी : चक्क 'नासा'चा कमांडरही यानाला लिंबू लटकवतो तेव्हा...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2019 12:25 PM

भारतात लिंबू -मिरचीचा वापर खाद्यपदार्थांशिवाय जादूटोण्यासाठीही केला जातो.

भारतात लिंबू -मिरचीचा वापर खाद्यपदार्थांशिवाय जादूटोण्यासाठीही केला जातो. अमेरिकन अंतराळ संस्था नासाचे प्रायोगिक अंतराळ यान अनेक संकटात सापडले होते. त्याचे कमांडर गस ग्रिशम यांचा जादूटोण्यावर थोडा विश्वास होता. या विश्वासापोटीच त्यांनी अंतराळयानाच्या मोड्युलबाहेर लिंबू लटकविले होते.

नासा’चा नियमचंद्रावरून पृथ्वीवर आणण्यात आलेल्या माती, खडक व इतर वस्तूंच्या नमुन्यांबाबत ‘नासा’ने तयार केलेल्या नियमावलीनुसार चंद्राशी संबंधित सर्वच वस्तू ह्या अमेरिकेची संपत्ती असतील आणि त्यांचा वापर केवळ सरकारी उद्देशांसाठीच केला जाऊ शकतो.अमेरिका आणि चीननंतर भारतानेसुद्धा चांद्र मोहिमेच्या दिशेने वेगवान पावले टाकणे सुरू केले आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेतर्फे(इस्रो) अंतराळ मोहीम चांद्रयान-२ चे प्रक्षेपण होत आहे. विशेष म्हणजे काही महिन्यांपूर्वीच चीनने आपले अंतराळ यान चांग ई-४ चंद्रावर उतरविले आहे. अपोलो-१७ नंतर अमेरिकेने चंद्रात रुची घेणे बंद केले होते. परंतु आता तोसुद्धा पुन्हा चंद्रावर संशोधनात गुंतला आहे. इ.स. २०२४ पर्यंत चंद्रावर पुन्हा एकदा अमेरिकेच्या अंतराळवीरांची पावले पडू शकतात. चंद्रावर वसाहती निर्माण करून खनिजांचे उत्खनन आणि मोठे उद्योग उभारण्यासाठी ही सगळी चढाओढ आहे. चंद्रावर वस्त्या निर्माण करून खनिज पदार्थांचे उत्खनन करण्याची जगभरातील महाशक्तींची योजना आहे. हे लक्षात घेऊनच चीन, अमेरिका, रशिया आणि भारत प्रदीर्घ कालावधीच्या योजनेवर काम करीत आहे. इ.स. २०३६ पर्यंत चंद्रावर आपला एक स्थायी ठावठिकाणा असावा यासाठी चीन प्रयत्नशील आहे. अग्निबाण बनविण्यासाठी चंद्राच्या भूपृष्ठावर आढळणाऱ्या टायटेनियम, युरेनियम, पोलाद व पाण्याचा वापर करण्याची या देशाची मनीषा आहे.

अनेक देश स्पर्धेत सामीलरशियाच्या अंतराळ संस्थेनेसुद्धा इ.स.२०४० पर्यंत चंद्रावर लोकवस्ती बनविण्याची घोषणा गेल्या वर्षी केली होती. रशियन विज्ञान अकादमीचे प्रमुख अलेक्झँडर सर्गेयेव यांच्या सांगण्यानुसार नैसर्गिक संसाधनांच्या दृष्टीने चंद्र अत्याधिक महत्त्वाचा आहे. जपान आणि दक्षिण कोरियानेसुद्धा चंद्राच्या ध्रुवांवर अंतराळ यान पाठविण्याची घोषणा केली आहे. त्यांचेही लक्ष चंद्रावरील नैसर्गिक स्रोतांच्या वापराकडेच आहे. तिकडे युरोपियन युनियनही चंद्रावर ‘मून व्हिलेज’ वसविण्याचे स्वप्न रंगवते आहे.

४ लाख लोकांचे परिश्रम५० वर्षांपूर्वी मानवाने चंद्रावर पाऊल ठेवले तेव्हा साºया जगाने आनंदोत्सव साजरा केला होता. या अभूतपूर्व यशामागे एक-दोन नव्हेतर, तब्बल चार लाख लोकांचे अथक परिश्रम होते. १६ जुलै १९६९ साली अपोलो-११ हे अमेरिकन अंतराळ यान प्रथमच मानवासह रवाना झाले होते. चार दिवसांनी २० जुलैला अमेरिकन अंतराळवीर नील आर्मस्ट्राँग चंद्रावर पाऊल ठेवणारे पहिले मानव ठरले. चंद्र्रावर मानवाचे पाऊल पडणे ही मानवी इतिहासातील बहुधा सर्वाधिक महत्त्वपूर्ण उपलब्धी होती. खुद्द आर्मस्ट्राँगनेसुद्धा अपोलो-११ मोहिमेच्या यशाचे श्रेय त्याच्याशी जोडलेल्या हजारो लोकांना दिले होते.

 

टॅग्स :NASAनासाNeil Armstrongनील आर्मस्ट्राँग