2024 मध्ये जे घडणार, त्यानं हाहाकार उडणार; नव्या नॅस्ट्रॉडेमसच्या भविष्यवाणीनं अमेरिकेचं टेन्शन वाढवलं!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2023 03:32 PM2023-11-12T15:32:05+5:302023-11-12T15:32:23+5:30

अनेक मोठ्या मुद्द्यांवर भाष्य करण्यापूर्वी, त्यांनी अमेरिकेसंदर्भात भाष्य केले आहे...

What will happen in 2024 The new Nostradamus craig hamilton-parker prediction increased the tension of America | 2024 मध्ये जे घडणार, त्यानं हाहाकार उडणार; नव्या नॅस्ट्रॉडेमसच्या भविष्यवाणीनं अमेरिकेचं टेन्शन वाढवलं!

2024 मध्ये जे घडणार, त्यानं हाहाकार उडणार; नव्या नॅस्ट्रॉडेमसच्या भविष्यवाणीनं अमेरिकेचं टेन्शन वाढवलं!

नवे नॉस्ट्रॅडॅमस म्हणून ओळखले जाणारे, मानसशास्त्रज्ञ क्रेग हॅमिल्टन-पार्कर (Craig Hamilton-Parker) यांनी नुकतीच 2024 संदर्भात महत्त्वाची भविष्यवाणी केली आहे. त्याने त्याच्या 'कॉफी विथ क्रेग' या यूट्यूब चॅनलवर एक नवा अॅपिसोड अपलोड केला आहे. जो अनेकांचं टेन्शन वाढवणारा आहे. या व्हिडिओमध्ये, अनेक मोठ्या मुद्द्यांवर भाष्य करण्यापूर्वी, त्यांनी अमेरिकेसंदर्भात भाष्य केले आहे.

'अमेरिकेत होणार ब्लॅकआउट' -
क्रेग म्हणाले, मला एक गोष्ट दिसत आहे, ती म्हणजे अमेरिकेत वीजेची टंचाई आणि पूर्णपणे ब्लॅकआउट. प्रामुख्याने, कॅलिफोर्निया आणि टेक्सासमध्ये मोठा ब्लॅकआउट होणार आहे. यासंदर्भात सविस्तर बोलताना ते म्हणाले, 'कदाचित हवामानाच्या घटना अथवा वादळामुळे हे सर्व होईल. नैसर्गिक आपत्तीत वीज पुरवठ्याशी संबंधित पायाभूत सुविधा उद्धवस्त झाल्याने हे सर्व घडेल. 

'मोठ-मोठ्या भूकंपात सर्वकाही नष्ट होईल' -
यानंतर क्रेग यांनी म्हटले आहे, 2024 मध्ये अमेरिकेत मोठ मोठे भूकंप होतील. हे सर्व मला पश्चिम किनार्‍यापर्यंत दिसत आहे. कदाचित यामुळे सर्व काही नष्ट होऊ शकते. एका झटक्यात मोठे नुकसान होणार आहे. क्रेग यांचा हा ताजा व्हिडिओ पूर्णपणे भयभीत करवणारा आहे.

महत्वाचे म्हणजे, नुकतेच बाबा वेंगा यांची भविष्यवाणीही चर्चेत आली आहे. बाबा वेंगाने 2024 वर्षासाठी काही भाकितं केली होती. यातील मोठे भाकीत म्हणजे, एका रशियन व्यक्तीकडून राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांच्या हत्येचा प्रयत्न होण्याची शक्यता. मात्र त्यांनी काही सकारात्मक भाकीतंही वर्तवली आहेत.

कॅन्सरवर नवा इलाज - 
बाबा वेंगा यांच्या भविष्यवाणीतील सर्वात महत्वाची भविष्यवाणी  म्हणजे, 2024 मध्ये अल्झायमर आणि कॅन्सरसह अनेक असाध्य आजारांवर नवे उपचार शोधले जातील, असा दावा त्यांनी केला आहे.

Web Title: What will happen in 2024 The new Nostradamus craig hamilton-parker prediction increased the tension of America

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.