इराणवरील अमेरिकेच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2025 16:14 IST2025-06-22T16:11:36+5:302025-06-22T16:14:40+5:30

इराणच्या अणुकेंद्रांवर अमेरिकेने केलेल्या ताज्या हल्ल्यांसंदर्भात पाकिस्तानने तीव्र चिंता व्यक्त केली आहे. हे हल्ले आधीच सुरू असलेल्या इस्रायली कारवायांचाच भाग आहेत...

What was Pakistan's first reaction after the US attack on Iran | इराणवरील अमेरिकेच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?

इराणवरील अमेरिकेच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?

अमेरिकेने इराणमधील फोर्डो, नतांझ आणि इस्फहान या तीन अणुकेंद्रांवर मोठे हल्ले चढवत ते उद्ध्वस्त केले आहेत. अमेरिकेच्या या हल्यानंतर, पाकिस्तानातील परराष्ट्र मंत्रालयाने एक अधिकृत निवेदन जारी करत, अमेरिकेकडून करण्यात आलेल्या या हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे. एवढेच नाही तर, इराणच्या सार्वभौमत्वावर करण्यात आलेला हा हल्ला प्रादेशिक शांतता आणि स्थिरतेसाठी गंभीर धोका असल्याचेही पाकिस्तानने म्हटले आहे.

हमल्ल्याने वाढू शकतो तणाव -
इराणच्या अणुकेंद्रांवर अमेरिकेने केलेल्या ताज्या हल्ल्यांसंदर्भात पाकिस्तानने तीव्र चिंता व्यक्त केली आहे. हे हल्ले आधीच सुरू असलेल्या इस्रायली कारवायांचाच भाग आहेत. यामुळे संबंधित प्रदेशात तणाव आणि हिंसाचार आणखी वाढू शकतो, असे पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. तसेच, ही परिस्थिती केवळ मध्यपूर्वच नव्हे तर संपूर्ण जगाच्या शांतता आणि स्थिरतेसाठी धोकादायक आहे, असेही पाकिस्तानने म्हटले आहे.

इराणला स्व-संरक्षणाचा अधिकार - 
पाकिस्तानने स्पष्ट शब्दात म्हटले आहे की, या हल्ल्यांने आंतरराष्ट्रीय कायद्याचे तथा संयुक्त राष्ट्रांच्या चार्टरमधील सर्व नियमांचे उल्लंघन केले आहे. इराणला स्व-संरक्षणाचा अधिकार आहे आणि त्याच्यावरील असे हल्ले कोणत्याही प्रकारे समर्थनीय ठरू शकत नाहीत. हे आंतरराष्ट्रीय नियमांविरोधातील एक धोकादायक पाऊल आहे.

विद्यमान संकटाचा मार्ग केवळ चर्चा आणि कूटनीतीतूनच सुटू शकतो -
आपल्या निवेदनात, पाकिस्तानने सर्व देशांना सामान्य नागरिकांच्या जीविताचा आणि मालमत्तेचा आदर करण्याचे आणि युद्धासारख्या कारवाया तत्काळ थांबवण्याचे आवाहन केले आहे. या शिवाय, सर्व पक्षांना आंतरराष्ट्रीय कायद्याचे, प्रामुख्याने मानवाधिकार कायद्याचे पालन करण्याचा सल्ला दिला आहे. तसेच, विद्यमान संकटाचा मार्ग केवळ चर्चा आणि कूटनीतीतूनच सुटू शकतो. यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या चार्टरचे पालन करणे आवश्यक आहे, यावरही पाकिस्तानने जोर दिला.

Web Title: What was Pakistan's first reaction after the US attack on Iran