पत्रकाराने असा काय प्रश्न विचारला की डोनाल्ड ट्रम्प यांचा पारा चढला? म्हणाले "चल निघ इथून..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2025 08:51 IST2025-05-22T08:48:42+5:302025-05-22T08:51:15+5:30
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प परदेशी राष्ट्रप्रमुखांना व्हाईट हाऊसमध्ये आमंत्रित करून आणि त्यांना अस्वस्थ करणारे प्रश्न विचारून भंडावून सोडत आहेत. ...

पत्रकाराने असा काय प्रश्न विचारला की डोनाल्ड ट्रम्प यांचा पारा चढला? म्हणाले "चल निघ इथून..."
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प परदेशी राष्ट्रप्रमुखांना व्हाईट हाऊसमध्ये आमंत्रित करून आणि त्यांना अस्वस्थ करणारे प्रश्न विचारून भंडावून सोडत आहेत. नुकतीच ट्रम्प यांनी दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष रामाफोसा यांची भेट घेतली. मात्र, त्यांच्यासोबतही ट्रम्प यांनी असाच काहीसा प्रकार केला. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद देखील घेतली. पण त्याच पत्रकार परिषदेत, एका पत्रकाराने ट्रम्प यांना विचारले की, कतारकडून भेट म्हणून मिळालेल्या बोईंग ७४७ बद्दल त्यांच्या काय योजना आहेत. हा प्रश्न ऐकल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प संतापले आणि त्यांनी पत्रकाराला तिथून निघून जाण्याचा सल्ला दिल.
तत्पूर्वी ट्रम्प यांनी पत्रकरच्या प्रश्नांना उत्तर देताना म्हटले की, तुमचा प्रश्न म्हणजे आफ्रिकेतील श्वेत शेतकऱ्यांवरील हिंसाचार आणि वर्णद्वेषी कायदे यासारख्या महत्त्वाच्या मुद्द्द्यांवरून लक्ष विचलित करण्याचा हा एक मार्ग आहे.
डोनाल्ड ट्रम्प संतापले!
एवढेच नाही तर ट्रम्प रिपोर्टरच्या संपूर्ण मीडिया नेटवर्कवर संतापले आणि म्हणाले की या संपूर्ण कंपनीची चौकशी झाली पाहिजे. ट्रम्प पत्रकारावर टीका करत म्हणाले की, "तुम्ही कशाबद्दल बोलत आहात? तुम्हाला माहिती आहे की, यानंतर तुम्हाला येथून निघून जावे लागेल... कतारकडून आम्हाला मिळणाऱ्या जेटशी या पत्रकार परिषदेचा काय संबंध आहे? ते युनायटेड स्टेट्स एअर फोर्सला जेट देत आहेत, जी चांगली गोष्ट आहे. पण, सध्या आम्ही इतर महत्त्वाच्या मुद्द्द्यांवर बोलत आहोत. आणि तुम्ही आम्हाला त्या मुद्द्द्यांपासून दूर नेण्याचा प्रयत्न करत आहात."
पत्रकारावर केली टीका
डोनाल्ड ट्रम्प एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी त्या पत्रकारावर टीका केली आणि म्हटले, "तू एक भयानक पत्रकार आहेस. एका पत्रकारामध्ये जे गुण असायला हवे ते तुझ्यात नाही. तू तेवढा हुशार नाहीस. तुला तुझ्या स्टुडिओमध्ये परतायला हवं आणि ब्रायन रॉबर्ट्स आणि त्या ठिकाणाचे व्यवस्थापन करणाऱ्या लोकांची चौकशी करायला हवी."
कतारकडून मिळालेल्या भेटवस्तूच्या प्रश्नावर स्वतःचा बचाव करताना ट्रम्प म्हणाले की, "आपण कतारकडून मिळालेल्या विमानाबद्दल बोलू शकतो. त्यांनी अमेरिकेला एक जेट भेट म्हणून दिले आहे, जी खूप चांगली गोष्ट आहे. पण त्यांनी या विमानाशिवाय ५.१ ट्रिलियन डॉलर्सची गुंतवणूकही केली आहे."