संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2025 14:18 IST2025-09-18T14:18:07+5:302025-09-18T14:18:37+5:30
सौदी अरेबियाची ताकद आधुनिक शस्त्रे आणि अमेरिकेच्या पाठिंब्यामुळे निर्माण झाली आहे. परंतु संख्येच्या बाबतीत ते इराणपेक्षा मागे १४ व्या क्रमांकावर आहेत

संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
सौदी अरेबिया मध्य पूर्वेतील एक शक्तिशाली देश आहे. जे तेल कमाईतून त्यांच्या सैन्याला आधुनिक शस्त्रांनी मजबूत करत असतात. जागतिक इंडेक्सनुसार, सौदी अरेबियाच्या सैन्याची ताकद जगातील २४ व्या स्थानावर आहे. सौदी अरेबियाची सैन्य ताकद, त्यांच्याकडील शस्त्रे आणि पाकिस्तानला त्यांनी दिलेली मदत याविषयी आपण जाणून घेऊया.
ग्लोबल फायरपॉवर इंडेक्स (GFP) २०२५ मध्ये सैन्य संख्या, शस्त्रे, आर्थिक परिस्थिती, भूगोल आणि रसद यासारख्या ६० हून अधिक घटकांवर आधारित १४५ देशांच्या लष्करी ताकदीचे मूल्यांकन केले जाते. सौदी अरेबियाचा पॉवर इंडेक्स (PwrIndx) स्कोअर ०.४२०१ आहे (स्कोअर जितका कमी तितकी जास्त पॉवर). सौदी अरेबियाचा सक्रिय लष्करी बजेट जगातील टॉप ५ मध्ये आहे, जे GDP च्या अंदाजे ९% आहे.
एकूण सैन्य संख्या - ३,५०,००० (सक्रिय: २,२५,०००; राखीव: १,२५,०००). एकूण लोकसंख्या: ३.५३ कोटी
लष्कर
सैन्य (भूदल): २००,००० सक्रिय सैन्य
रणगाडे: १,०५५ (३१५ M1A2 अब्राम, ४५० M60A3, २९० AMX-३०).
चिलखती वाहने: ८,२००+ (४०० M2 ब्रॅडली IFV, ३,०००+ M113 APC, ५७०+ AMX-१०P)
तोफखाना: १,१००+ (११० स्व-चालित, २००+ ओढलेले, ६० बहुविध रॉकेट लाँचर)
अँटी-टँक क्षेपणास्त्रे: २०००+
मोर्टार: ४००
वायूसेना
लढाऊ विमाने: ३००+ (८१ एफ-१५एसए, ७२ युरोफायटर टायफून, ८१ टोर्नाडो आयडीएस)
हल्ला करणारे हेलिकॉप्टर: १२ (अपाचे एएच-६४)
वाहतूक हेलिकॉप्टर: ५०+
हवाई संरक्षण: १०००+ जमिनीवरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रे (पॅट्रियट, THAAD प्रणाली)
एकूण विमाने: ११०६ (त्यापैकी ३४९ लढाऊ/इंटरसेप्टर आहेत)
नौदल - ३४ हजार सैन्य
फ्रिगेट्स: ७
कॉर्वेट्स: ४
गस्ती जहाजे: ५९
माइन युद्धनौका: ३
एकूण नौदल जहाजे: ९०+
स्ट्रॅटेजिक मिसाइल फोर्स: १० जमिनीवरून जमिनीवर मारा करणारी क्षेपणास्त्रे (DF-21 चिनी बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे)
सौदी अरेबियाची ताकद आधुनिक शस्त्रे आणि अमेरिकेच्या पाठिंब्यामुळे निर्माण झाली आहे. परंतु संख्येच्या बाबतीत ते इराणपेक्षा मागे १४ व्या क्रमांकावर आहेत. GFP मध्य पूर्वेतील इस्रायल आणि इराण नंतर तिसऱ्या क्रमांकाचा सर्वात शक्तिशाली देश सौदी अरेबिया आहे. सौदी अरेबियाचे सैन्य हे जगातील सर्वात आधुनिक आणि महागड्या शस्त्रसंपन्न सैन्यांपैकी एक आहे. १९६० पासून पाकिस्तान आणि सौदी अरेबियामधील लष्करी संबंध मजबूत आहेत. सौदी अरेबिया हा पाकिस्तानचा मध्य पूर्वेतील सर्वात जवळचा मित्र आहे.