शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर आमदारकीचा राजीनामा देईन; आमदार मंदा म्हात्रेंचं गणेश नाईकांना चॅलेंज, भाजपात वाद पेटला
2
'अश्रू, आक्रोश अन् उद्रेक'; तिकीट नाकारल्याने निष्ठावंतांचा संभाजीनगर भाजप कार्यालयात राडा
3
नाशिकमध्ये थरार! AB फॉर्म घेऊन जाणाऱ्या कारचा पाठलाग, भाजपा इच्छुकांचा कारनामा
4
“बहुजन विकास आघाडीचा वसई-विरार निवडणुकीतही पराभव करू, आमचाच महापौर होईल”: स्नेहा दुबे पंडित
5
शक्तिप्रदर्शन करत आला, पण अर्जच विसरला! धापा टाकत कार्यकर्ता अखेर अर्ज घेऊन आला
6
२०२५ सरता सरता...! Google वर '67' सर्च करताच तुमची स्क्रीन थरथरू लागतेय? तुम्हीही करून पहा...
7
VIDEO: 'धुरंधर' फिव्हर सुरूच! चिमुरडीचा FA9LA गाण्यावरील जबरदस्त डान्स सोशल मीडियावर VIRAL
8
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर जोरदार आपटले; Silver ₹३९७३ नं घसरली, Gold किती झालं स्वस्त? पटापट पाहा रेट्स
9
Amit Shah : Video - "बंगालमधील घुसखोरी संपवणार, प्रत्येकाला शोधून बाहेर काढणार", अमित शाह कडाडले
10
एचआयव्ही पॉझिटिव्ह कर्मचाऱ्याला दिलासा; नोकरी कायम करण्याचे हायकाेर्टाने दिले निर्देश
11
"पक्षासाठी केसेस अंगावर, तिकीट मात्र दुसऱ्यांना"; संभाजीनगरात भाजप पदाधिकाऱ्यांचा राडा
12
मनपा निवडणुकांसाठी ठाकरे बंधूंच्या किती संयुक्त सभा होणार?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
13
नाराजी टाळण्यासाठी एबी फॉर्मबाबत सस्पेन्स, उमेदवारीसाठी आज अखेरचा दिवस : युतीची शक्यता कमीच
14
उद्धवसेना, मनसेने अमराठी उमेदवारांनाही दिलं तिकीट; 'मराठीचा नारा' देणाऱ्या ठाकरे बंधूंचं काय आहे 'गणित'?
15
जालना मनपा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा; शिंदेसेना-भाजपात १२ प्रभागांतील जागांवर एकमत
16
Nashik Municipal Corporation Election : नाशकात शिंदेसेना-राष्ट्रवादी एकत्र; महायुतीत फूट तर मविआत एकजूट, भाजपकडून 'ही' नावं निश्चित
17
काहीतरी मोठं घडणार! चीनची आक्रमक हालचाल, तैवानला सैन्याने वेढा घातला; विमानांची उड्डाणेही रद्द
18
Nashik Municipal Election 2026: आमदारांच्या वारसांचा पत्ता कट; पक्षाचा निर्णय शिरसावंद्य, हिरे, फरांदे माघार घेणार
19
वादळाने दृष्टी हिरावली, 'दिव्यदृष्टी'ने भाकितं वर्तवली; बाबा वेंगा कोण होत्या? त्यांनी खरंच हे सगळं लिहून ठेवलंय?
20
फोटोग्राफर, प्रोड्यूसर, नॅशनल लेव्हल फुटबॉलपटू... कोण आहे प्रियंका गांधींची होणारी सून?
Daily Top 2Weekly Top 5

७२ वर्षांपूर्वी असं काय घडलं की, इराण आणि अमेरिका बनले एकमेकांचे कट्टर शत्रू?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2025 14:01 IST

एकीकडे इराण अमेरिकेला 'सगळ्यात मोठा सैतान' म्हणतो तर, दुसरीकडे अमेरिका इराणला पश्चिम आशियात सुरू असलेल्या प्रत्येक 'समस्येचं मूळ' मानतो. 

गेल्याच आठवड्यात अमेरिकेने इराणच्या अणु प्रकल्पांवर हल्लाबोल केला होता. यानंतर दोन्ही देशांच्या नातेसंबंधातील कटुता वाढली आहे. मात्र, इराण आणि अमेरिका यांचे संबंध आधीपासूनच फारसे चांगले नव्हते. गेल्या अनेक दशकांमध्ये दोन्ही देशातील वैर अनेकदा पाहायला मिळाले. एकीकडे इराण अमेरिकेला 'सगळ्यात मोठा सैतान' म्हणतो तर, दुसरीकडे अमेरिका इराणला पश्चिम आशियात सुरू असलेल्या प्रत्येक 'समस्येचं मूळ' मानतो. 

एका गुप्तचर अहवालातून असे समोर आले आहे की, तीन ठिकाणांवर अमेरिकेच्या हल्ल्यामुळे इराणचे गंभीर नुकसान झाले आहे, पण ती ठिकाणे पूर्णपणे नष्ट झालेली नाहीत. 

अमेरिका-इराण संबंध इतके कटू का? १९५३ मध्ये इराणमध्ये एक सत्तापालट झाला होता, ज्याला ब्रिटनच्या मदतीने सीआयएने (CIA) घडवून आणले होते. 'ऑपरेशन एजाक्स' अंतर्गत इराणमधील लोकशाही मार्गाने निवडून आलेले सरकार उलथवून टाकण्यात आले आणि शाह मोहम्मद रजा पहलवी यांना सत्ता देण्यात आली. असे यासाठी केले गेले, कारण पाश्चात्त्य देशांना इराणमध्ये सोव्हिएत युनियनचा प्रभाव वाढण्याची आणि तेल उद्योगाच्या राष्ट्रीयीकरणाची भीती वाटत होती.

शाह अमेरिकेचे रणनीतिक सहयोगी होते. त्यांनी अमेरिकेसोबत इराणचे संबंध सुधारले. पण त्यांच्या निरंकुश शासनाबद्दल आणि अमेरिकेच्या हितांपुढे झुकल्यामुळे इराणी लोकांमध्ये तक्रारी कायम होत्या. पहलवीच्या राजवटीविरोधात इराणी लोकांमध्ये १९७९ मध्ये असंतोष वाढला, त्यानंतर इस्लामिक क्रांती झाली. यानंतर ते देश सोडून पळून गेले आणि धर्मवादी क्रांतिकारकांनी देशावर नियंत्रण मिळवले.

इराणी क्रांतीने तणाव कसा वाढवला?इराणमध्ये अमेरिकाविरोधी भावना शिगेला पोहोचल्या होत्या. याचदरम्यान नोव्हेंबर १९७९ मध्ये इराणी विद्यार्थ्यांनी ६६ अमेरिकन राजनयिक आणि नागरिकांना बंधक बनवले. त्यापैकी ५० पेक्षा अधिक जणांना ४४४ दिवसांपर्यंत बंधक बनवून ठेवले होते. अमेरिका आणि तत्कालीन राष्ट्राध्यक्ष जिमी कार्टर यांच्यासाठी ही अत्यंत अपमानास्पद गोष्ट होती. 

'ऑपरेशन ईगल क्लॉ' अंतर्गत नौदलाचे आठ हेलिकॉप्टर आणि वायुसेनेची सहा विमानं इराणला पाठवण्यात आली. तथापि, वाळूच्या वादळामुळे एक हेलिकॉप्टर सी-१२० इंधन भरणाऱ्या विमानाला धडकल्याने आठ सैनिकांचा मृत्यू झाला आणि मिशन रद्द झाले. १९८० मध्ये दोन्ही देशांमधील राजनैतिक संबंध तुटले आणि ते आजही तुटलेले आहेत. २० जानेवारी १९८१ रोजी रोनाल्ड रीगन यांनी राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतल्यानंतर काही मिनिटांतच इराणने या बंधकांना सोडून दिले होते.

अमेरिकेचे इराणवरील हल्ले

गेल्या आठवड्यातील अमेरिकेचा हल्ला इराणविरुद्धचा पहिला हल्ला नव्हता. यापूर्वीचा सर्वात मोठा हल्ला समुद्रात झाला होता. अमेरिकेच्या नौदलाने दुसऱ्या महायुद्धानंतरच्या आपल्या सर्वात मोठ्या हल्ल्यात १८ एप्रिल १९८८ रोजी दोन इराणी जहाजे बुडवली, एक जहाज खराब केले आणि दोन पाळत ठेवण्याचे प्लॅटफॉर्मही नष्ट केले होत.

'ऑपरेशन प्रेइंग मँटिस' नावाच्या मोहिमेअंतर्गत केलेली ही कारवाई पर्शियन आखातात यूएसएस सॅम्युअल बी रॉबर्ट्सवर झालेल्या हल्ल्याच्या प्रत्युत्तरात होती. यूएसएस सॅम्युअल बी रॉबर्ट्सवर झालेल्या हल्ल्यात दहा खलाशी जखमी झाले होते आणि स्फोटामुळे जहाजात मोठे भगदाड पडले होते.

इराण आणि इराक युद्धात अमेरिकेने अप्रत्यक्षपणे इराकला आर्थिक मदत, गुप्त माहिती आणि लष्करी तंत्रज्ञान पुरवले. कारण इराणच्या विजयामुळे संपूर्ण प्रदेशात अस्थिरता निर्माण होईल आणि तेलाच्या पुरवठ्यावर दबाव येईल अशी त्यांना चिंता होती. इराण आणि इराक यांच्यात १९८० ते १९८८ पर्यंत चाललेल्या युद्धात कोणीही स्पष्ट विजेता झाला नाही. मात्र, या युद्धात हजारो लोकांचा बळी गेला.

टॅग्स :IranइराणAmericaअमेरिकाwarयुद्ध