काय सांगता? दुसऱ्या ग्रहावर राहतात डायनासोर..., अमेरिकन संशोधकांचा दावा; काही ग्रह विकासाच्या पहिल्या टप्प्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2023 05:46 AM2023-11-28T05:46:52+5:302023-11-28T05:48:52+5:30

Dinosaurs: अंतराळातील अनंत रहस्ये शोधण्यासाठी जग दररोज नवनवीन पावले उचलत आहे. यापैकीच एक रहस्य म्हणजे इतर ग्रहांवर जीवसृष्टी आहे का? नवीन संशोधनानुसार, डायनासोर दुसऱ्या ग्रहावर असू शकतात, असा दावा करण्यात आला आहे.

what do you say Dinosaurs live on another planet..., American researchers claim; Some planets are in the first stages of development | काय सांगता? दुसऱ्या ग्रहावर राहतात डायनासोर..., अमेरिकन संशोधकांचा दावा; काही ग्रह विकासाच्या पहिल्या टप्प्यात

काय सांगता? दुसऱ्या ग्रहावर राहतात डायनासोर..., अमेरिकन संशोधकांचा दावा; काही ग्रह विकासाच्या पहिल्या टप्प्यात

वॉशिंग्टन - अंतराळातील अनंत रहस्ये शोधण्यासाठी जग दररोज नवनवीन पावले उचलत आहे. यापैकीच एक रहस्य म्हणजे इतर ग्रहांवर जीवसृष्टी आहे का? नवीन संशोधनानुसार, डायनासोर दुसऱ्या ग्रहावर असू शकतात, असा दावा करण्यात आला आहे.  रॉयल ॲस्ट्रोनॉमिकल सोसायटी नियतकालिकामध्ये प्रसिद्ध झालेल्या संशोधनानुसार पृथ्वीपासून दूर असलेल्या इतर ग्रहांवर डायनासोरसारखी प्रजाती असण्याची शक्यता आहे.
संशोधकांच्या मते, एक ग्रह विकासाच्या सुरुवातीच्या टप्प्यात आहे.  

इतर ग्रहांवर नवीन प्रजातींचा शोध
लिसा कॅल्टेनेगर म्हणतात की, डायनासोरच्या काळातील पृथ्वीचे वातावरण विश्वातील इतर ग्रहांवर शोधले जाऊ शकते. आमच्याकडे आता तंत्रज्ञान आहे जे आम्हाला इतर ग्रहांवर नवीन प्रजाती शोधण्यात मदत करू शकते. आपल्याला असा ग्रह शोधण्याची गरज आहे जिथे ऑक्सिजन जास्त आहे. यामुळे इतर ग्रहांवर जटिल जीवनाचे अस्तित्व समजण्यास मदत होऊ शकते. 

डायनासोरच्या काळात होता अधिक ऑक्सिजन
संशोधनात असे आढळले की, डायनासोरच्या काळात पृथ्वीवरील ऑक्सिजन आजच्या तुलनेत ३०% जास्त होता. यामुळे जटिल जीवांना येथे वाढण्याची संधी मिळाली. 
आता ऑक्सिजनची पातळी २१% वर स्थिर झाली आहे. ऑक्सिजनची उच्च पातळी इतर ग्रहांवर जटिल जीवनाच्या अस्तित्वासाठी एक उत्तम संधी म्हणून काम करू शकते.

संशोधनात काय?
- या टप्प्यात डायनासोरच्या अस्तित्वाचा उगम असलेल्या मोठ्या आणि गुंतागुंतीच्या जीवनासाठी सुविधा असतील.
- अमेरिकेतील कॉर्नेल विद्यापीठातील शास्त्रज्ञ रेबेका पायने यांनी सांगितले की, या टप्प्यात पृथ्वीवरील जीवन अधिक गुंतागुंतीचे होते. 
- या संशोधनाच्या प्रमुख लेखिका लिसा कॅल्टेनेगर म्हणाल्या, जीवांचा शोध घेण्यासाठी आपल्याला इतर ग्रहांवरील संयुगे शोधावे लागतील जे आज पृथ्वीवर आढळत नाहीत. डायनासोरच्या काळात ती संयुगे पृथ्वीवर होती.

Web Title: what do you say Dinosaurs live on another planet..., American researchers claim; Some planets are in the first stages of development

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.