‘मोसाद’चे धाडसी ऑपरेशन्स आणि त्याची खासियत काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2025 05:40 IST2025-07-15T05:40:16+5:302025-07-15T05:40:23+5:30

या जगातील मोठ्या गुप्तहेर संस्था कोणत्या आहेत आणि त्या कसे काम करतात...

What are the bold operations of Mossad and what makes it special? | ‘मोसाद’चे धाडसी ऑपरेशन्स आणि त्याची खासियत काय?

‘मोसाद’चे धाडसी ऑपरेशन्स आणि त्याची खासियत काय?

इराणच्या अणुस्थळांवरील हल्ले आणि त्यांच्या वरिष्ठ शास्त्रज्ञांच्या हत्येनंतर इस्रायलची गुप्तहेर संस्था मोसाद आणि अमेरिकेची सीआयए पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. जाणून घेऊ या जगातील मोठ्या गुप्तहेर संस्था कोणत्या आहेत आणि त्या कसे काम करतात...

गुप्तहेर संस्था काय करतात? 
एखाद्या देशाची गुप्तचर संस्था ही त्या देशासाठी एक मजबूत आणि अदृश्य सुरक्षा कवचासारखी असते. या संस्था शत्रू देशांच्या हालचालींवर गोपनीय नजर ठेवतात तसेच गुप्त अभियान राबवितात.

यासाठी किती खर्च होतो?
या संस्थांचे बजेटही तसे गुप्तच असते. मात्र, काही अहवालांत व्यक्त अंदाजांनुसार, अमेरिका सीआयएवर जवळपास ७१ अब्ज डॉलर्स खर्च करते. त्यानंतर चीन आणि रशियाचा क्रमांक लागतो.

मोसाद इतकी खास का? 
मोसाद ही संस्था अत्यंत गुप्त, धाडसी आणि थेट कारवाया करते. येथे एखादा एजंट पूर्ण प्रशिक्षण घेतल्याशिवाय प्रत्यक्ष मैदानात पाठवला जात नाही.

म्युनिच हत्याकांडाचा बदला असो की नाझी युद्ध अपराधी अडॉल्फ आयशरमन याच्या मुसक्या आवळणे असो, या कारवायांतून मोसादची ताकद आणि वेगळेपण दिसून येते.

Web Title: What are the bold operations of Mossad and what makes it special?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.