Welcome 2020 : न्यूझीलंड, ऑस्ट्रेलियामध्ये नववर्षाचे उत्साहात स्वागत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2019 19:19 IST2019-12-31T19:19:14+5:302019-12-31T19:19:25+5:30

न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया या देशांममध्ये नववर्षाचे आगमन झाले असून, तेथे नववर्षाचे उत्साहात स्वागत करण्यात आले

Welcome 2020 : New Year celebrated in New Zealand & Australia | Welcome 2020 : न्यूझीलंड, ऑस्ट्रेलियामध्ये नववर्षाचे उत्साहात स्वागत

Welcome 2020 : न्यूझीलंड, ऑस्ट्रेलियामध्ये नववर्षाचे उत्साहात स्वागत

वेलिंग्टन/कॅनबेरा -  2019 वर्ष सरून 2020 सुरू होण्यास आता केवळ काही तास उरले आहेत. मात्र न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया या देशांममध्ये नववर्षाचे आगमन झाले असून, तेथे नववर्षाचे उत्साहात स्वागत करण्यात आले आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी साडेचार वाजता न्यूझीलंडमधील ऑकलंड येथे नववर्षाचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर ऑस्ट्रेलियामधील सीडनी येथेही भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी साडेसहा वाजता नववर्षाचे स्वागत करण्यात आले. 

 दक्षिण गोलार्धात वसलेल्या न्यूझीलंडमध्ये नववर्षाचे स्वागत सर्वात आधी होते. भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी साडेचार वाजता न्यूझीलंडमधील ऑकलंड येथे नववर्षाला सुरुवात झाली. त्यावेळी येथील स्काय टॉवर येथे फटाक्यांची आकर्षक आतिषबाजी करण्यात आली. 



न्यूझीलंडप्रमाणेच ऑस्ट्रेलियातील सिडनीमध्येही नववर्षाच्या स्वागताला सुरुवात झाली आहे. सिडनी हार्बर येथे मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतिषबाजी करून नववर्षाचे स्वागत करण्यात आले. 

Web Title: Welcome 2020 : New Year celebrated in New Zealand & Australia