"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2025 19:35 IST2025-06-23T19:32:58+5:302025-06-23T19:35:23+5:30

पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी बिलावल भुट्टो झरदारी यांच्या नेतृत्वाखाली, एक नऊ सदस्यांचे शिष्टमंडळ वेगवेगळ्या देशांच्या दौऱ्यावर पाठवले आहे. हे शिष्टमंडळ जगभर फिरत भारताविरुद्धच्या लढाईत पाक सैन्याच्या शौर्याचे वर्णन करत आहे.

We thought India had launched a nuclear attack, what exactly did Bilawal Bhutto say | "वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो

"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो

पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री तथा पाकिस्तान पीपल्स पार्टीचे (पीपीपी) प्रमुख बिलावल भुट्टो झरदारी यांनी ऑपरेशन सिंदूरसंदर्भात भाष्य केले आहे. ते म्हणाले, "जेव्हा दहशतवादी तळांवर हल्ला झाला, तेव्हा आम्हाला वाटले, भारताने अण्वस्त्र हल्लाच केला. भारताने अशी क्रूझ क्षेपणास्त्रे तैनात केली होती, जी अण्वस्त्रे वाहून नेण्यास सक्षम होती आणि हा अण्वस्त्र हल्ला आहे की नाही, हे ठरवण्यासाठी आमच्याकडे केवळ काही सेकंदच होते."

पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी बिलावल भुट्टो झरदारी यांच्या नेतृत्वाखाली, एक नऊ सदस्यांचे शिष्टमंडळ वेगवेगळ्या देशांच्या दौऱ्यावर पाठवले आहे. हे शिष्टमंडळ जगभर फिरत भारताविरुद्धच्या लढाईत पाक सैन्याच्या शौर्याचे वर्णन करत आहे.

लंडन येथे सोमवारी द संडे टाईम्सशी बोलताना बिलावल भुट्टो म्हणाले, 'ऑपरेशन सिंदूर दरम्यान, भारताने अण्वस्त्रे वाहून नेण्यास सक्षम असलेल्या दुहेरी वापराच्या क्रूझ क्षेपणास्त्रांचा वापर केला आणि हा अण्वस्त्र हल्ला आहे की नाही, याचा निर्णय पाकिस्तानला काही सेकंदांतच घ्यावा लागला. अशा परिस्थितीत, आकाशातील क्षेपणास्त्र हल्ल्यांचे फोटो पाहून, हे क्षेपणास्त्र अण्वस्त्र हल्ल्यासाठी वापरले जाऊ शकते की नाही? यासंदर्भात काही सेकंदांतच निर्णय घ्यावा लागत असतो. आम्हीही या काही सेकंदातच निर्णय घेतला.'

अद्यापही धोका कायम -
ऑपरेशन सिंदूर दरम्यान पाकिस्तानी सैनिक  भारताला वरचढ ठरले. तरीही पाकिस्तानने युद्धबंदीला सहमती दर्शवली. कारण संघर्षाच्या सर्व मुद्द्यांवर नंतर चर्चा केली जाईल, असे आश्वासन अमेरिकेने दिले होते. मात्र, असे होताना दिसत नाही. तसेच, आंतरराष्ट्रीय समुदायाला सहजतेची खोटी जाणीव व्हावी, असे वाटत नाही. कारण अद्यापही धोका कायम आहे..

 

 

Web Title: We thought India had launched a nuclear attack, what exactly did Bilawal Bhutto say