आम्हाला तर पाकिस्तान सोबत येणे शक्य, पण हे दोन देश...; नव्या समूहासंदर्भात काय म्हणाला बांगलादेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2025 13:13 IST2025-12-11T13:12:21+5:302025-12-11T13:13:07+5:30
गेल्या वर्षीच बांगलादेशात सत्तांतर झाले. यानंतर, माजी पंतप्रधान शेख हसीना भारताच्या आश्रयत आल्या. खरे तर १९७१ साली भारताने बांगलादेशच्या निर्मितीत मोठे योगदान दिले होते. मात्र आता त्याच बांगलादेशात कट्टरवाद्यांचे समर्थन असलेले मोहम्मद युनुस सत्तेवर आहेत.

आम्हाला तर पाकिस्तान सोबत येणे शक्य, पण हे दोन देश...; नव्या समूहासंदर्भात काय म्हणाला बांगलादेश
दक्षिण आशियाई प्रादेशिक सहकार्य संघटनेची (SAARC) २०१४ पासून कुठलीही बैठक झालेली नाही आणि गेल्या ११ वर्षांत या प्रदेशात मोठ्या प्रमाणावर राजकीय बदल झाले आहेत. यातच भारत आणि त्याच्या शेजारील राष्ट्रांच्या संबंधांवर परिणाम करणारे बदलही झाले आहेत.
गेल्या वर्षीच बांगलादेशात सत्तांतर झाले. यानंतर, माजी पंतप्रधान शेख हसीना भारताच्या आश्रयत आल्या. खरे तर १९७१ साली भारताने बांगलादेशच्या निर्मितीत मोठे योगदान दिले होते. मात्र आता त्याच बांगलादेशात कट्टरवाद्यांचे समर्थन असलेले मोहम्मद युनुस सत्तेवर आहेत. गेल्या काही दिवसांत बांगलादेश आणि पाकिस्तान यांची जवळिक वाढली आहे. बांगललादेशच्या या बदललेल्या भूमिकेचा परिणाम प्रादेशिक स्तरावर दिसून येत आहे.
नवा प्रादेशिक गटाची तयारी -
पाकिस्तान आणि बांगलादेश मिळून सार्कच्या धरतीवर एक नवा प्रादेशिक समूह तयार करण्याच्या तयारीत आहेत. महत्वाचे म्हणजे, या समूहात भारताऐवजी चीनला सहभागी करून घेण्यचा या देशांचा मानस आहे. या मागची सूप्त इच्छा म्हणजे, चीनच्या मदतीने आपली ताकद वाढविणे. या संदर्भात, पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक अहमद डार यांनी मोठे भाष्य केले असून, आम्ही बांगलादेश आणि चीनसोबत एक त्रिपक्षीय सहकार्य सुरू करत आहोत. यात भविष्यात इतरही काही देशांना समाविष्ट होऊ शकतात, असे त्यांनी म्हटले आहे.
यासंदर्भात बांगलादेशच्या सरकारी वृत्तसंस्थेने, परराष्ट्र व्यवहार सल्लागार मोहम्मद तोहिद हुसैन यांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, हुसैन म्हणाले, बांगलादेशसाठी पाकिस्तानसोबत जाणे शक्य आहे, परंतु नेपाळ आणि भूतानसारख्या देशांना भारताला सोडून पाकिस्तानसोबत येणे शक्य होणार नाही. हुसैन यांचे हे विधान डार यांच्या वक्तव्यानंतर आले आहे.
महत्वाचे म्हणजे, शेख हसीना यांची सत्ता गेल्यापासून बांगलादेशची भीमिका बदलली आहे. तो पाकिस्तान्या दिशेने झुकला आहे.