US Plane Crash: लष्कराच्या हेलिकॉप्टरला प्रवासी विमानाची धडक! अमेरिकेत भीषण अपघात, वॉशिंग्टन विमानतळ बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2025 09:39 IST2025-01-30T09:39:04+5:302025-01-30T09:39:04+5:30

US Plane Crash: अमेरिकेत भयंकर विमान अपघात झाला आहे. एका अमेरिकन प्रवासी विमानाची लष्कराच्या विमानाला धडक झाली आणि विमान नदीत कोसळले. 

Washington DC Plane Crash american airlines collided with a military helicopter | US Plane Crash: लष्कराच्या हेलिकॉप्टरला प्रवासी विमानाची धडक! अमेरिकेत भीषण अपघात, वॉशिंग्टन विमानतळ बंद

US Plane Crash: लष्कराच्या हेलिकॉप्टरला प्रवासी विमानाची धडक! अमेरिकेत भीषण अपघात, वॉशिंग्टन विमानतळ बंद

Washington DC Plane Crash: अमेरिकेतमध्ये एक लष्करी हेलिकॉप्टर आणि प्रवासी विमानाचा भीषण अपघात झाला. वाशिग्टन डीसीमध्ये रीगन नॅशनल एअरपोर्टजवळ ही घटना घडली. अमेरिकन एअरलाईन्सनचे एक विमान आकाशात असताना लष्करी विमानाला धडकले. त्यानंतर विमान आणि हेलिकॉप्टरचे तुकडे नदीत पडले.

प्रवासी विमान विमानतळावर उतरणार होते. त्याचवेळी समोरून अमेरिकन लष्कराचे ब्लॅकहॉक हेलिकॉप्टर आले. विमान आणि हेलिकॉप्टरची भयंकर धडक आकाशात झाली. त्यानंतर हेलिकॉप्टर आणि विमान तुकडे तुकडे होऊन पोटोमॅक नदीत कोसळले. 

प्रवासी विमान ज्या लष्करी हेलिकॉप्टरला धडकले, ते Sirosky H-60 हेलिकॉप्टर होते. 

लष्करी हेलिकॉप्टर आणि विमानाचा अपघात होतानाच व्हिडीओ

विमानात किती प्रवासी होते?

समोर आलेल्या माहितीनुसार, हे छोटे विमान होते, ज्याची ६५ प्रवासी क्षमता होती. अपघात घडला, त्यावेळी विमानात ६० प्रवासी होते, असे सांगण्यात येत आहे. मात्र त्याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. हे विमान कन्सासवरून वॉशिंग्टनला येत होते. विमानतळावर उतरवण्यापूर्वीच ही दुर्दैवी घटना घडली. 

एअरलाईन्स कंपनीने सांगितले की, PSA कडून चालवण्यात येणारे अमेरिकन ईगल फ्लाईट 5342 हे विमान कन्सासवरून वाशिग्टनच्या रीगन नॅशनल एअरपोर्टकडे येत होते. ते अपघातग्रस्त झाले.

अमेरिकेचे सिनेटर टेड क्रूज यांनी या घटनेबद्दल म्हटले आहे की, या अपघातात लोकांचा मृत्यू झाला आहे, पण अजून आम्हाला हे माहिती मिळू शकलेली नाही की, विमानातून किती लोक प्रवास करत होते. या विमान अपघातानंतर वॉशिंग्टन विमानतळ बंद करण्यात आले आहे. 

विमान आणि हेलिकॉप्टरचे नदीत पडलेले तुकडे

विमान अपघाताबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांची प्रतिक्रिया

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या घटनेबद्दल निवेदन जारी केले आहे. रीगन नॅशनल एअरपोर्टवर झालेल्या भयावह घटनेची माहिती मिळाली. ईश्वर मृतांच्या आत्म्याला शांती देवो. मी परिस्थितीवर नजर ठेवून आहे, असे व्हाईट हाऊसकडून देण्यात आलेल्या ट्रम्प यांच्या निवेदनात म्हटले आहे.  

वॉशिंग्टन डीसी पोलिसांनी सांगितले की, विमानाची ज्या हेलिकॉप्टरला धडक झाली, ते मेट्रोपॉलिटन पोलीस विभागाचे नव्हते.

Web Title: Washington DC Plane Crash american airlines collided with a military helicopter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.