अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2025 21:20 IST2025-08-20T21:15:26+5:302025-08-20T21:20:50+5:30

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची अलास्कामध्ये बैठक झाली.

Vladimir Putin's 5-hour stay in America cost him dearly Donald Trump charged 2.2 crores; What's the exact issue? | अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?

अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?

मागील काही वर्षापासून रशिया-युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे. हे युद्ध थांबवण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. काही दिवसापूर्वी ट्रम्प यांनी पुतिन यांची अलास्कामध्ये भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये बैठक झाली. या  बैठकीत युक्रेनसोबत सुरू असलेल्या युद्धाबाबत चर्चा झाली. या बैठकीची जगभरात चर्चा सुरू आहे. दरम्यान, आता आणखी एक मोठी माहिती समोर आली आहे. 

अमेरिकेतून परतताना पुतिन यांनी  अमेरिकेने २.२ कोटी रुपये आकारल्याचे समोर आले आहे. अमेरिकेहून परतताना रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना तीन विमानांमध्ये इंधन भरण्यासाठी सुमारे २५०,००० डॉलर (सुमारे २.२ कोटी रुपये) रोख रक्कम मोजावी लागली.

जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबतच्या महत्त्वाच्या बैठकीसाठी १५ ऑगस्ट रोजी अलास्कामध्ये पोहोचल्यावर पुतिन यांचे भव्य स्वागत करण्यात आले. रुबियो म्हणाले की, त्यांच्या प्रतिनिधीमंडळाला विमानात इंधन भरण्यासाठी रोख रक्कम मोजावी लागली, ही अमेरिकेच्या निर्बंधांचा थेट परिणाम होता.

निर्बंधामुळे रोख रक्कम भरावी लागली

ज्यावेळी रशियन लोक अलास्कामध्ये उतरले तेव्हा ते इंधन भरण्यासाठी तिथे आले. त्यांना त्यांच्या विमानांमध्ये इंधन भरण्यासाठी रोख पैसे द्यावे लागले, कारण ते आमच्या बँकिंग प्रणालीचा वापर करू शकत नव्हते, असं रुबियो यांनी एनबीसीला सांगितले. "त्यांनी पदभार स्वीकारला त्या दिवशी लागू केलेले सर्व निर्बंध अजूनही लागू आहेत आणि ते सर्व निर्बंध अजूनही लागू आहेत,"असंही रुबियो म्हणाले.

व्लादिमीर पुतिन अमेरिकेत पाच तास होते

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन अलास्कामध्ये पाच तास होते,ते  संयुक्त पत्रकार परिषदेनंतर लगेचच निघून गेले. ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील भेटीनंतर रशिया-युक्रेन युद्धावर कोणताही करार झालेला नाही. 

पुतिन यांची भेट घेतल्यानंतर, सोमवारी ट्रम्प यांनी युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की आणि युरोपीय नेत्यांशी युद्धबंदीबाबत चर्चा केली. 

Web Title: Vladimir Putin's 5-hour stay in America cost him dearly Donald Trump charged 2.2 crores; What's the exact issue?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.