स्वत:च्या पक्षानेच नाकारलं, आता अपक्ष निवडणूक लढणार व्लादिमीर पुतीन, तरीही विजय निश्चित?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2023 08:37 PM2023-12-17T20:37:17+5:302023-12-17T20:37:44+5:30

रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक मार्च २०२४ मध्ये होणार

Vladimir Putin to run for Russia President as an independent candidate in March 2024 as per reports | स्वत:च्या पक्षानेच नाकारलं, आता अपक्ष निवडणूक लढणार व्लादिमीर पुतीन, तरीही विजय निश्चित?

स्वत:च्या पक्षानेच नाकारलं, आता अपक्ष निवडणूक लढणार व्लादिमीर पुतीन, तरीही विजय निश्चित?

Russia Elections , Vladimir Putin : रशियात दीर्घकाळापासून व्लादिमीर पुतीन यांची सत्ता आहे. भविष्यातही त्यांच्या खुर्चीच्या आसपास येणारा कोणी दिसत नाही. रशियातराष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुका होणार असल्याने चर्चांना उधाण आले आहे. विशेष म्हणजे यावेळी पुतीन यांना त्यांच्या पक्षाने तिकीट दिलेले नाही. ते अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार आहेत. असे असूनही रशियाची सत्ता ही पुतीन यांच्याकडेच राहिल हे जवळपास निश्चित आहे.

व्लादिमीर पुतीन यांच्या समर्थकांनी शनिवारी त्यांचे औपचारिकरित्या 2024 च्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीसाठी अपक्ष उमेदवार म्हणून नामांकन दाखल केले. रशियाच्या निवडणूक कायद्यानुसार, पक्षाच्या तिकीटावरून निवडणूक न लढणाऱ्या उमेदवारांकडे कमीत 500 समर्थकांचा पाठिंबा आवश्यक असतो. तसेच त्यांना कमीत कमी 3 लाख लोकांच्या सह्या घेणेही अनिवार्य असते.

पुतीन यांच्या समर्थकांमध्ये युनायटेड रशिया पार्टीचे मुख्य अधिकारी, बडे अभिनेते आणि गायक, एथलिट आणि इतर बड्या लोकांचा समावेश आहे. रशियाच्या माध्यमांच्या रिपोर्टनुसार, पुतीन 2024 ची निवडणूक अपक्ष उमेदवार म्हणून लढवतील. खेळ आणि सांस्कृतिक क्षेत्रातील सुमारे 700 पेक्षा जास्त राजकीय नेते आणि दिग्गजांच्या समूहाने मॉस्कोमध्ये बैठक घेतली आणि एक स्वतंत्र उमेदवार म्हणून सर्वसहमतीने पुतीन यांचे नाव निश्चित केले.

पुतीन यांनी महिन्याच्या सुरुवातीलाच घोषणा केली की ते पुढील वर्षी मार्च मध्ये राष्ट्रपती निवडणुकीत आणखी सहा वर्षांचा कार्यकाळ पाहतील. युनायटेड रशिया पार्टीचे वरिष्ठ अधिकारी आंद्रेई तुरचक यांनी सांगितल्यानुसार, रशियात सर्वात मोठ्या पक्षाच्या रुपात त्यांच्याजवळ 2022 पर्यंत राज्य ड्युमा च्या 450 जागांपैकी 325 जागा आहेत जे 2007 पासून बहुमतात आहेत.

व्लादिमीर पुतीन 1999 पासून देशाचे नेतृत्व करत आहेत. 71 वर्षीय पुतीन यांनी 2008 साली पंतप्रधान दिमित्री मेदवेदेव यांच्यासोबत राष्ट्राध्यक्ष पदाची अदलाबदल केली. त्यानंतर पुतीन यांनी राष्ट्राध्यक्ष पदाच्या जनादेशाला सतत सीमित करणाऱ्या नियमांवर रोख लावली. पुतीन 2012 पासून राष्ट्राध्यक्ष पदावर आहेत आणि भविष्यात 2036 पर्यंत ते या पदावर राहू शकतात.

Web Title: Vladimir Putin to run for Russia President as an independent candidate in March 2024 as per reports

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.