व्हाइट हाऊस परिसरात सतर्कतेचा इशारा, संशयास्पद वस्तू आढळली
By Admin | Updated: March 28, 2017 21:11 IST2017-03-28T21:07:31+5:302017-03-28T21:11:24+5:30
व्हाइट हाऊसजवळील मैदानात संशयास्पद वस्तू आढळली,सुरक्षा कारणास्तव व्हाइट हाऊसजवळ नाकाबंदी

व्हाइट हाऊस परिसरात सतर्कतेचा इशारा, संशयास्पद वस्तू आढळली
>ऑनलाइन लोकमत
वॉशिंग्टन, दि. 28 - व्हाइट हाऊसजवळील मैदानात संशयास्पद वस्तू आढळल्याचं वृत्त आहे. यानंतर सुरक्षा कारणास्तव व्हाइट हाऊसजवळ नाकाबंदी कऱण्यात आली आहे. बॉम्ब शोधक आणि नाशक पथक घटनास्थळी दाखल झालं आहे.
व्हाइट हाऊसकडे येणारे सर्व रस्ते बंद कऱण्यात आले आहेत. शिवाय मीडिया आणि अन्य कर्मचा-यांना व्हाइट हाउसपासून लांब सुरक्षित स्थानी जाण्यास सांगितलं आहे.
काही दिवसांपूर्वी ब्रिटनच्या संसदेवर दहशतवादी हल्ला करण्यात आला होता. ब्रिटन संसदेबाहेरच्या परिसरात हल्लोखोरांनी पादचाऱ्यांना कारने चिरडणे, गोळीबार आणि चाकूने भोकसणे अशाप्रकारे दहशतवादी हल्ला करण्यात आला होता. यामध्ये 5 जणांचा मृत्यू तर 40 जण जखमी झाले होते. इसिस या दहशतवादी संघटनेने हा हल्ला घडवून आणला होता.