Video: रशियाच्या समुद्राखाली शक्तीशाली भूकंप! कुरील आयलंडवर त्सुनामी; अमेरिका, जपान, न्यूझीलंडसह जगाला धोका

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2025 07:50 IST2025-07-30T07:47:10+5:302025-07-30T07:50:43+5:30

Russia Earthquake, tsunami Warning: रशियन  समुद्राखाली ८.७ एवढ्या रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला आहे. याचे हादरे पॅसिफिक समुद्रकिनाऱ्यांच्या रिंग म्हणजेच पार अगदी अमेरिकेपर्यंत बसले आहेत.

Video: Powerful earthquake under the sea of Russia! Tsunami on the Kuril Islands; Threat to the world including America, Japan, New Zealand | Video: रशियाच्या समुद्राखाली शक्तीशाली भूकंप! कुरील आयलंडवर त्सुनामी; अमेरिका, जपान, न्यूझीलंडसह जगाला धोका

Video: रशियाच्या समुद्राखाली शक्तीशाली भूकंप! कुरील आयलंडवर त्सुनामी; अमेरिका, जपान, न्यूझीलंडसह जगाला धोका

रशियामध्ये शक्तीशाली भूकंपाचे धक्के बसले आहेत. पॅसिफिक समुद्राखाली भूकंपाचे केंद्र असल्याने पूर्वेकडील कुरील आयलंडवर त्सुनामी आली आहे. तर रशियाच्या समुद्र किनाऱ्यांसह जपानपर्यंत त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. (Russia Earth Quake news)

यूएस जिओलॉजिकल सर्व्हे (USGS) नुसार, भूकंप समुद्राखाली झाला, त्यानंतर जपान आणि अमेरिकेच्या एजन्सींनी त्सुनामी अलर्ट (त्सुनामी वॉच) जारी केला आहे. रशियन  समुद्राखाली ८.७ एवढ्या रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला आहे. याचे हादरे पॅसिफिक समुद्रकिनाऱ्यांच्या रिंग म्हणजेच पार अगदी अमेरिकेपर्यंत बसले आहेत. रशियातील कामचटका येथे पहाटे भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. रशियाच्या किनाऱ्यावर तसेच अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये, जपान येथे त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे.

अमेरिकन सामोआ, अंटार्क्टिका, कोलंबिया, कुक बेटे, कोस्टा रिका, एल साल्वाडोर, फिजी, गुआम, ग्वाटेमाला, हॉलंड आणि बेकर, इंडोनेशिया, जार्विस बेट, कार्माडिस बेट, किरिबाटी, मार्शल बेटे, मेक्सिको, मिडवे बेट, न्यूझीलंड, निकाराग्वा, पलाऊ, पालमायरा बेट, पनामा, पापुआ न्यू गिनी, पेरू, फिलीपिन्स, सामोआ, तैवान, टोंगा आणि वानुआतु या देशांना त्सुनामीचा तडाखा बसू शकतो असा इशारा देण्यात आला आहे. 

भूकंप आणि त्सुनामीच्या धोक्यानंतर, रशियाच्या सखालिन प्रदेशातील सेवेरो-कुरिलस्क या छोट्या शहरातून लोकांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा यांना परिस्थितीची माहिती देण्यात आली आहे आणि सरकारने आपत्कालीन बैठक बोलावली आहे आणि मदत आणि बचाव कार्याची तयारी सुरू केली आहे. ढील तीन तासांत रशिया आणि जपानच्या काही भागात धोकादायक त्सुनामी लाटा पोहोचू शकतात, असा इशारा अमेरिकेने दिला आहे. तसेच समुद्र किनाऱ्यावरील लोकांना सुरक्षित स्थळी जाण्यास सांगण्यात आले आहे. 

Web Title: Video: Powerful earthquake under the sea of Russia! Tsunami on the Kuril Islands; Threat to the world including America, Japan, New Zealand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.