Video: दाट धुक्यामुळे पुलावर भीषण अपघात; 200 गाड्या एकमेकांवर आदळल्या

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2022 02:57 PM2022-12-28T14:57:56+5:302022-12-28T14:59:00+5:30

या अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Video: Heavy accident on bridge due to dense fog; 200 cars collided with each other in china | Video: दाट धुक्यामुळे पुलावर भीषण अपघात; 200 गाड्या एकमेकांवर आदळल्या

Video: दाट धुक्यामुळे पुलावर भीषण अपघात; 200 गाड्या एकमेकांवर आदळल्या

Next


Major Road Accident in China: चीनच्या हेनान प्रांतातील झेंगझोउ या मध्य चिनी शहरातील एका पुलावर बुधवारी सकाळी प्रचंड धुक्यामुळे अनेक वाहनांचा अपघात झाला. या अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, यात व्हिडिओमध्ये अनेक कार्स आणि ट्रक एकमेकांवर आदळल्याचे दिसत आहे. अपघातात अनेक लोक जखमी झाले असून त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले.

स्थानिक मीडियानुसार, घटनास्थळी पोहोचलेल्या बचाव पथकाचा प्राथमिक अंदाज असा आहे की, या अपघातात 200 हून अधिक वाहने पुलावरच अडकली आहेत. अपघातातील जखमींना उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. झेंगझो ट्रॅफिक अधिकाऱ्यांनी जारी केलेल्या निवेदनानुसार स्थानिक वाहतूक पोलिसांनी अपघाताच्या दोन तासांपूर्वीच धुक्यामुळे वाहनांना पुलावरून जाण्यास बंदी घातली होती.

चीनमधील सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वेइबोवर सुमारे 42 सेकंदांच्या व्हिडिओमध्ये खराब झालेल्या कार आणि ट्रकची एक मोठी रांग दिसत आहे. यामध्ये लोक पुलावर व्हिडिओ आणि फोटो घेताना दिसत आहेत. 

Web Title: Video: Heavy accident on bridge due to dense fog; 200 cars collided with each other in china

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.