Video: धूराचे लोट, सर्व काही उद्ध्वस्त..; खामेनेई यांच्यावरील हल्ल्याचा व्हिडिओ समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2026 16:39 IST2026-03-01T16:39:03+5:302026-03-01T16:39:25+5:30

इस्रायल डिफेन्स फोर्सेसने खामेनेई यांच्या मुख्यालयावर केलेल्या हल्ल्याचा व्हिडिओ पोस्ट केला आहे.

Video: A plume of smoke, everything destroyed..; Video of the attack on Khamenei surfaced | Video: धूराचे लोट, सर्व काही उद्ध्वस्त..; खामेनेई यांच्यावरील हल्ल्याचा व्हिडिओ समोर

Video: धूराचे लोट, सर्व काही उद्ध्वस्त..; खामेनेई यांच्यावरील हल्ल्याचा व्हिडिओ समोर

Iran Conflict : अमेरिका आणि इस्रायलने संयुक्तपणे केलेल्या भीषण हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते आयतुल्लाह अली खामेनेई यांचा मृत्यू झाला. आता या हल्ल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. इस्रायल डिफेन्स फोर्सेस (IDF) ने हा व्हिडिओ जाहीर केला असून, त्यामध्ये खामेनेईंचे मुख्यालय पूर्णपणे उद्ध्वस्त होऊन ढिगाऱ्यात रूपांतरित झाल्याचे दिसत आहे.

कुटुंबीयांनाही जीव गमवावा लागल्याचा दावा

या संयुक्त कारवाईत खामेनेई यांच्या मुलगा, मुलगी, नात, सून आणि जावई यांचाही मृत्यू झाल्याचा दावा काही माध्यमांनी केला आहे. मात्र, या संदर्भात ठोस माहिती उपलब्ध नाही.

कसा झाला हल्ला? 

मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणांना खामेनेई यांच्या वरिष्ठ नेत्यांसोबत बैठका सुरू असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे इस्रायलने खामेनेईंच्या मुख्यालयावर सुमारे 30 बॉम्ब टाकले, ज्यात खामेनेई यांच्यासह तिथे उपस्थित सर्व नेतेही ठार झाले.

इराणमध्ये 40 दिवसांचा राष्ट्रीय शोक, 7 दिवसांची सुट्टी

खामेनेई यांच्या मृत्यूनंतर इराणमध्ये 40 दिवसांचा सार्वजनिक शोक आणि 7 दिवसांचा राष्ट्रीय अवकाश (सुट्टी) जाहीर करण्यात आली आहे. यासोबतच, आता इराणचा पुढील सर्वोच्च नेता कोण? याबाबत चर्चा सुरू झाली आहे.

संभाव्य उत्तराधिकारी (मीडिया रिपोर्टनुसार):

मोजतबा खामेनेई

हुज्जत-उल-इस्लाम मोहसेन कोमी

आयतुल्लाह मोहसेन अराकी

आयतुल्लाह अलीरेजा अराफी

आयतुल्लाह हाशेम हुसैनी बुशेहरी

आयतुल्लाह गुलाम हुसेन मोहसेनी एजेई

ट्रम्प यांचे वादग्रस्त विधान

खामेनेईंच्या मृत्यूनंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “इतिहासातील सर्वात क्रूर लोकांपैकी एक खामेनेई आता जिवंत नाही. हे केवळ इराणच्या जनतेसाठीच नव्हे, तर त्या सर्व देशांसाठी न्याय आहे, ज्यांच्या लोकांना खामेनेई आणि त्याच्या रक्तरंजित टोळीने मारले.”

नेतन्याहूंचे इराणी जनतेला आवाहन

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी म्हणाले की, “येणाऱ्या काळात आम्ही दहशतवादी शासनाच्या हजारो लक्ष्यांवर हल्ले करू. आम्ही इराणच्या धाडसी जनतेसाठी अशा परिस्थिती निर्माण करू, ज्या त्यांना अत्याचाराच्या विळख्यातून मुक्त करतील. हे इराणच्या नागरिकांनो, ही संधी गमावू नका. प्रत्येक पिढीत एकदाच अशी संधी मिळते. रस्त्यावर उतरा, लाखोंच्या संख्येने बाहेर पडा आणि त्या दहशतीच्या शासनाला उखडून फेका, ज्याने तुमचे आयुष्य कडू केले आहे.”

जागतिक पातळीवर गंभीर परिणामांची शक्यता

तज्ज्ञांच्या मते, या घडामोडींमुळे मध्य-पूर्वेतील युद्धजन्य स्थिती तीव्र होऊ शकते, जागतिक तेल बाजार, व्यापार मार्ग आणि राजनैतिक समिकरणांवर मोठा परिणाम होऊ शकतो.

Web Title : वीडियो: अमेरिकी-इजरायली हमले में खामेनेई की मौत; मुख्यालय नष्ट।

Web Summary : ईरान के सर्वोच्च नेता खामेनेई की अमेरिकी-इजरायली संयुक्त हमले में मौत की खबर है, जिसमें उनका मुख्यालय नष्ट हो गया। परिवार के सदस्यों की भी मौत की सूचना है। ईरान में राष्ट्रीय शोक घोषित। उत्तराधिकारी की चर्चा तेज, वैश्विक स्तर पर संभावित परिणाम और ईरानी विरोध प्रदर्शनों का आह्वान।

Web Title : Video: Khamenei allegedly killed in US-Israel strike; HQ destroyed.

Web Summary : Iran's Supreme Leader Khamenei is reportedly dead after a joint US-Israeli strike that destroyed his headquarters. Family members also reportedly perished. Iran declares national mourning. Successor discussions intensify amid potential global ramifications and calls for Iranian protests.