व्हेनेजुएलात Parle-G बिस्किटापेक्षा स्वस्त पेट्रोल; फक्त 'एवढ्या' मध्ये कारचा टँक फुल..!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2026 13:46 IST2026-01-05T13:43:59+5:302026-01-05T13:46:08+5:30
Venezuela Fuel Price: जगातील सर्वात मोठा तेलसाठा असूनही, प्रचंड महागाई अन् गरिबी!

व्हेनेजुएलात Parle-G बिस्किटापेक्षा स्वस्त पेट्रोल; फक्त 'एवढ्या' मध्ये कारचा टँक फुल..!
Venezuela Fuel Price: दक्षिण अमेरिकेतील तेलसमृद्ध देश Venezuela सध्या चर्चेत आला आहे. अलीकडेच अमेरीकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशावरुन अमेरिकन सैन्याने व्हेनेजुएलात कारवाई करत, राष्ट्राध्यक्ष Nicolas Maduro यांना ताब्यात घेतले. व्हेनेजुएलात जगातील सर्वात मोठे तेलाचे साठे असून, अमेरिकेला ते मिळवायचे असल्यामुळेच ही कीरवाई करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत, तिकडे पेट्रोल किती रुपयांना मिळते? हा प्रश्न अनेकांना पडला असेल.
व्हेनेजुएलात इंधनाचे सर्वाधिक साठे
एका रिपोर्टनुसार, व्हेनेजुएलामध्ये '203 अब्ज बॅरेल्स' इतके कच्चे तेलाचे साठे आहेत. हा आकडा सौदी अरेबियासह, इतर सर्व अरब देशांच्या तुलनेत खूप जास्त आहे. या इंधनामुळेच अमेरिकेने ही कारवाई केली आहे. विशेष म्हणजे, इंधनाचे सर्वाधिक साठे असूनही, व्हेनेजुएला सर्वाधिक महागाई आणि गरिबीचा सामना करत आहे.
यामुळेच, तिथे पेट्रोलच्या किमती जगातील सर्वात कमी आहेत. सध्या व्हेनेजुएलात 1 लिटर पेट्रोलची किंमत अवघी 0.01 ते 0.035 अमेरिकन डॉलर (भारतीय चलनात 1 ते 3 रुपये) इतकी आहे. यामुळेच व्हेनेजुएलात 35 ते 50 लिटर टाकी असलेली सामान्य कार, केवळ 50 ते 150 रुपयांत फुल टँक करता येते. दरम्यान, तिथे दुहेरी इंधन प्रणाली (सब्सिडी आणि प्रीमियम पेट्रोल) लागू आहे.
सब्सिडी असलेले रेग्युलर पेट्रोल अत्यंत स्वस्त असून, सामान्य नागरिकांसाठी उपलब्ध आहे, तर बिगर सब्सिडीचे प्रीमियम पेट्रोलचे आंतरराष्ट्रीय बाजारभावानुसार दर सुमारे ₹42 प्रति लिटर आहेत. जर एखाद्या वाहनचालकाने प्रीमियम पेट्रोल निवडले, तर 50 लिटर टँक भरायला 20 ते 25 डॉलर्स, म्हणजेच ₹1700 ते ₹2100 खर्च येतो.
जगातील सर्वाधिक तेलाचे साठे असणारे देश
Venezuela - 303 अब्ज बॅरल
Saudi Arabia - 267.2 अब्ज बॅरल
Iran - 208.6 अब्ज बॅरल
Canada - 163.6 अब्ज बॅरल
इतका प्रचंड तेलसाठा असूनही, राजकीय अस्थिरता, आंतरराष्ट्रीय निर्बंध, आर्थिक संकट आणि व्यवस्थापनातील त्रुटींमुळे व्हेनेजुएलाला कच्च्या तेलाच्या निर्यातीमधून अपेक्षित उत्पन्न मिळत नाही. व्हेनेजुएला हे मोठे उदाहरण दर्शवते की, नैसर्गिक संसाधनांची प्रचुरता असूनही, राजकीय स्थैर्य आणि आर्थिक धोरणे नसतील, तर देशाची अर्थव्यवस्था अडचणीत येऊ शकते. जगातील सर्वात स्वस्त पेट्रोल आणि सर्वात मोठा तेलसाठा असूनही व्हेनेजुएलाची परिस्थिती आज गंभीर आहे.