व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2026 19:01 IST2026-04-13T19:00:10+5:302026-04-13T19:01:23+5:30
पाकिस्तानमध्ये अमेरिका आणि इराण दरम्यान युद्धविराम चर्चा सुरू असताना, शनिवारी पोप यांनी सेंट पीटर्स बॅसिलिका येथे एका प्रार्थना सभेचे आयोजन केले होते. या सभेत त्यांनी युद्धाचे समर्थन करणाऱ्या आणि लष्करी श्रेष्ठतेचा उदोउदो करणाऱ्या प्रवृत्तींवर नाव न घेता टीका केली होती. याच पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी पोप यांच्यावर निशाणा साधला होता.

व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या टीकेला पोप लिओ XIV यांनी सोमवारी प्रत्युत्तर दिले. "आपण ट्रम्प प्रशासनाला घाबरत नाही. शांती आणि सलोख्यासाठी व्हॅटिकनने केलेले आवाहन हे पूर्णपणे 'गॉस्पेल'वर (धर्मग्रंथ) आधारित आहे, असे त्यांनी मीडियाशी बोलताना म्हटले आहे. महत्वाचे म्हणजे, ते अमेरिकन वंशाचे आहेत.
अल्जीरियाला जाताना 'एपी' वृत्तसंस्थेशी बोलताना पोप लिओ म्हणाले, माझ्या संदेशाची तुलना राष्ट्राध्यक्षांनी येथे जे करण्याचा प्रयत्न केला आहे, त्याच्याशी करणे, मला वाटते, हे 'गॉस्पेल'चा संदेश न समजणे आहे आणि हे ऐकून मला दुःख वाटले. मात्र, मी आज जगात चर्चचे जे मिशन मानतो, ते काम मी पुढेही सुरूच ठेवेन.
पोप पुढे म्हणाले, "मला कोणत्याही वादात पडायचे नाही. माझ्या बोलण्याचा उद्देश कुणावरही हल्ला करण्याचा नाही. मी गॉस्पेलचा संदेश देण्यापासून आणि सर्वांना शांतता आणि सलोख्याचा मार्ग शोधण्यासाठी आणि शक्य असेल तेव्हा युद्ध टाळण्यासाठी आमंत्रित करत राहीन."
काय म्हणाले होते ट्रम्प? -
या वादाची सुरुवात रविवारी झाली, ट्रम्प यांनी पोप यांच्यावर जोरदार हल्ला चढवत म्हटले होते, "आपल्याला असे वाटत नाही की, कॅथोलिक चर्चच्या मुळच्या अमेरिकन असलेल्या या वैश्विक नेत्याचे काम फार चांगले आहे आणि ते फारच उदार व्यक्ती आहेत." एवढेच नाही तर, त्यांनी 'कट्टर डाव्यांचा' पक्ष घेणे बंद करावे, असा सल्लाही ट्रम्प यांनी त्यांना दिला होता." याशिवाय, ट्रम्प यांनी सोशल मीडियावर असेही लिहिले होते की, "जर मी व्हाईट हाऊसमध्ये नसतो, तर लिओ व्हॅटिकनमध्ये नसते. त्यांनी राजकारणी न होता एक महान पोप बनण्यावर लक्ष द्यावे, यामुळे कॅथोलिक चर्चचे नुकसान होत आहे."
अशी पडली वादाची ठिणगी -