शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंचा भुजबळांवर हल्लाबोल; मुख्यमंत्र्यांनी बाजू सावरली, म्हणाले...
2
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
3
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
4
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
5
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
6
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
7
Smriti Irani : "अमेठीत पोलिंग बूथ कॅप्चर करणारे एका सामान्य कार्यकर्तीकडून हरले..."; स्मृती इराणींचा घणाघात
8
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
9
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
10
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
11
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
12
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
13
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
14
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
15
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
16
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
17
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
18
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका
19
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
20
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे

चिनी कंपनी सिनोव्हॅकच्या लसीच्या चाचण्यांमध्ये लहान मुलांचा समावेश; 28 सप्टेंबरपासून प्रयोगांना प्रारंभ

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2020 3:06 AM

552 निरोगी स्वयंसेवकांची या मानवी चाचण्यांसाठी सिनोव्हॅकने निवड केली असून, त्यात तीन ते 17 वर्षे वयापर्यंतच्या काही मुलांचाही समावेश आहे.

बीजिंग : चीनमधील सिनोव्हॅक ही कंपनी कोरोना प्रतिबंधक लसीच्या मानवी चाचण्यांतील पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील एकत्रित प्रयोगांना 28 सप्टेंबरपासून हेबेई प्रांतामध्ये सुरुवात करणार आहे. त्यामध्ये लहान तसेच किशोरवयीन मुलांना ही लस टोचण्यात येणार आहे.552 निरोगी स्वयंसेवकांची या मानवी चाचण्यांसाठी सिनोव्हॅकने निवड केली असून, त्यात तीन ते 17 वर्षे वयापर्यंतच्या काही मुलांचाही समावेश आहे. 02 डोस या मुलांना कोरोना प्रतिबंधक लसीचे टोचण्यात येतील.- कोरोना साथीच्या काळात अमेरिकेमध्ये त्या विषाणूचा संसर्ग झालेल्या शेकडो मुलांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना अंगावर चट्टे उमटणे, ताप, अशी लक्षणे आढळली होती.- विषाणूंचा संसर्ग प्रौढ व्यक्तींच्या तुलनेत लहान मुलांना कमी होतो, असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. मात्र, विषाणूचा संसर्ग झालेल्या काही मुलांवर उपचार करताना विशेष काळजी घ्यावी लागते.शास्त्रज्ञांनी व्यक्त केली चिंताचीन बनवत असलेली कोरोना प्रतिबंधक लस सुरक्षित असल्याचे अद्याप सिद्ध झालेले नाही. तरीही त्या देशाच्या सरकारने ही लस चीनमधील हजारो नागरिकांना टोचली आहे. त्याबद्दल काही शास्त्रज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे. आपण विकसित करीत असलेली कोरोनाव्हॅक ही लस सुरक्षित असल्याचा दावा सिनोव्हॅक कंपनीने या महिन्याच्या प्रारंभी केला होता. ही लस टोचल्यानंतर वृद्ध व्यक्तींमध्येही अँटीबॉडीज तयार होतात, असा दावा सिनोव्हॅकने केला होता.सिनोव्हॅक कंपनीच्या लसीच्या चाचण्या याआधी ब्राझील, इंडोनेशिया, तुर्कस्थान या देशांमध्ये करण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे कंपनीतील 90% कर्मचाऱ्यांना व त्यांच्या कुटुंबियांना ही लस याआधीच टोचण्यात आली आहे.सिनोव्हॅकच्या प्रवक्त्याने सांगितले की, आमची लस टोचल्यानंतर प्रौढ व्यक्तींवर त्याचा काय परिणाम झाला, याबद्दलच्या प्रयोगांचे निष्कर्ष आमच्या हाती आहेत. आता मुलांवरही या लसीच्या चाचण्या करण्यासाठी चीन सरकारने आम्हाला परवानगी दिली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याchinaचीन