जगप्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसैन यांची तब्येत बिघडली, अमेरिकेत उपचार सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2024 20:36 IST2024-12-15T20:35:48+5:302024-12-15T20:36:09+5:30

Ustad Zakir Hussain: उस्ताद झाकीर हुसैन यांना ICU मध्ये दाखल करण्यात आले आहे.

Ustad Zakir Hussain's health updates, admitted to hospital in America | जगप्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसैन यांची तब्येत बिघडली, अमेरिकेत उपचार सुरू

जगप्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसैन यांची तब्येत बिघडली, अमेरिकेत उपचार सुरू

Ustad Zakir Hussain: जगप्रसिद्ध तबलावादक उस्ताक झाकीर हुसेन यांची तब्येत बिघडल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्यावर अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांचे जवळचे मित्र आणि बासरीवादक राकेश चौरसिया यांनी सांगितल्यानुसार, झाकीर हुसेन यांना सध्या आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे. या बातमीने झाकीर हुसेन यांचे लाखो चाहते त्यांच्यासाठी प्रार्थना करत आहेत.

पत्रकार परवेझ आलम यांनीदेखील झाकीर हुसेन यांच्या तब्येतीची माहिती दिली. त्यांनी झाकीर यांचा फोटो X (पूर्वीचे ट्विटर) वर शेअर करत सांगितले की, 'महान तबलावादक अल्ला राखा यांचे पुत्र उस्ताद झाकीर हुसेन यांची तब्येत ठीक नाही. त्यांच्यावर अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांचे मेहुणे आयुब औलिया यांनी मला फोनवरून ही माहिती दिली. लंडनमध्ये राहणाऱ्या औलिया साहेबांनी चाहत्यांना प्रार्थना करण्याचे आवाहन केले आहे.'

झाकीर हुसेन यांना रक्तदाबाचा त्रास 
पीटीआयच्या वृत्तानुसार, 73 वर्षीय झाकीर हुसैने यांना दीर्घ काळापासून रक्तदाबाशी संबंधित समस्या आहे. दरम्यान, ही माहिती सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरली असून, चाहते त्यांना लवकरात लवकर ठीक होण्यासाठी प्रार्थना करत आहेत. 

अनेक पुरस्कारांनी सन्मान
उस्ताद झाकीर हुसेन यांचा जन्म 1951 मध्ये महाराष्ट्राची राजधानी मुंबई येथे झाला. भारत सरकारने त्यांना पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण देऊन गौरविले आहे. याशिवाय, 1999 मध्ये त्यांना यूएस नॅशनल एन्डॉवमेंट फॉर द आर्ट्सद्वारे राष्ट्रीय वारसा फेलोशिप प्रदान करण्यात आली, त्यानंतर त्यांना भारतीय शास्त्रीय संगीताचे जागतिक राजदूत म्हणून मान्यता मिळाली. उस्ताद झाकीर हुसेन हे पहिले भारतीय संगीतकार आहेत, ज्यांना अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी व्हाईट हाऊसमध्ये जागतिक मैफिलीसाठी आमंत्रित केले होते. 

Web Title: Ustad Zakir Hussain's health updates, admitted to hospital in America

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.