शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्य महिला आयोग अध्यक्षपदी माजी IPS अधिकारी मीरा बोरवणकर यांची निवड?; जाणून घ्या सत्य
2
तो माझा बाप हीच चूक, तिथेच ठेचून मारले पाहिजे; नसरापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीच्या पत्नी-मुलाचा संताप
3
Stock Market Today: रेड झोनमध्ये शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात; 'या' शेअर्समध्ये मोठी घसरण
4
Iran War: Iran War: अमेरिकेचे होर्मुझ सामुद्रधुनीत जहाजांवर हल्ले, पाच जणांचा मृत्यू; दोन जहाजे काढली बाहेर
5
नसरापूरमधील ‘त्या’ बालिकेच्या पोस्टमार्टेम रिपोर्टमधून धक्कादायक माहिती आली समोर, नराधमाने…
6
सलमान खान साकारणार 'सुपरहीरो'! राज आणि डीकेच्या आगामी चित्रपटात करीना कपूरची वर्णी?
7
KVP Investment Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम, १ लाखांचे होतील २ लाख; 'इतक्या' महिन्यांमध्ये रक्कम होईल डबल
8
Tarot Card: अंगारकीचा मुहूर्त आणि बाप्पाची कृपा; कोणाचे नशीब बदलणार? वाचा टॅरो भविष्य
9
भाजपानं दिली संधी, आयुष्याला मिळाली कलाटणी; धुणं-भांडी, घरकाम करणाऱ्या कलिता माझी बनल्या आमदार
10
मेट गालामध्ये करण जोहरचं पदार्पण, भारतीय संस्कृतीची झलक दाखवणारा पेहराव; लूकचं वैशिष्ट्य काय?
11
शेष होलो दीदीर खैला, भगबा होलो बांग्ला... विजयाची गंगा आली बिहारमधून बंगालमध्ये, ‘अंग, बंग अन् कलिंग’ मिशन यशस्वी
12
KKR चा वेगवान गोलंदाज दुसऱ्यांदा बनला आमदार; IPL पदार्पणातच किंग कोहलीचा त्रिफळा उडवला होता
13
आजचे राशीभविष्य ५ मे २०२६: नशिबाची साथ मिळेल, कार्यात यश प्राप्ती अन् आर्थिक लाभ होईल
14
बारामतीत सुनेत्रा पवार यांचा विक्रमी मताधिक्याने विजय; राहुरीत अक्षय कर्डिलेंचा विक्रमी विजय
15
अमेरिकेचा इराणला मोठा दणका! ६ युद्धनौका उद्ध्वस्त करत ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ केली खुली
16
सर्वोच्च न्यायालयाचे ‘ते’ अधिकारी स्वत:ला सुपर सरन्यायाधीश समजतात; खंडपीठाचे कडक ताशेरे
17
'खेला' उधळला, कमळ फुलले ! भाजप २०० पार; तृणमूलमध्ये हाहाकार, काँग्रेस, डाव्यांची परिस्थिती शोचनीय
18
आसामचे ‘किंग’ हिमंताच! काँग्रेसचा ‘हात’ रिकामाच; एनडीए आघाडीची राज्यात सलग तिसऱ्यांदा सत्ता
19
अल्पवयीन मुली आणि स्त्रियांच्या सुरक्षिततेचा प्रश्न
20
एसआयआर पाच राज्यात भाजपसाठी ठरली अदृश्य ताकद! विजयाचे समिकरण नेमके कसे बदलले?
Daily Top 2Weekly Top 5

US Visa: कलम २२१(जी) अंतर्गत नॉनइमिग्रंट व्हिसा नाकारल्यास काय करावं? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2021 13:12 IST

US Visa: अमेरिकन इमिग्रेशन आणि राष्ट्रीयत्व कायद्याच्या कलम २२१ (जी) च्या अंतर्गत नॉनइमिग्रंट व्हिसा नाकारण्यात आल्यानंतरची प्रक्रिया काय?

प्रश्न: अमेरिकन इमिग्रेशन आणि राष्ट्रीयत्व कायद्याच्या कलम २२१ (जी) च्या अंतर्गत नॉनइमिग्रंट व्हिसा नाकारण्यात आल्याचं पत्र मला अमेरिकन दूतावासाकडून मिळालं. मला ऑनलाईन अपॉईंटमेंट घ्यावी लागेल असं त्या पत्रात नमूद करण्यात आलं आहे. याचा नेमका अर्थ काय? मी ऑनलाईन अपॉईंटमेंट कशी घ्यावी आणि मुलाखतीसाठी मला कुठे जावं लागेल?

उत्तर:  कलम २२१ (जी)च्या अंतर्गत विविध कारणांमुळे व्हिसा अर्ज रद्द होतो. दूतावासाला अधिक माहिती हवी असल्यास किंवा अर्जाबद्दल अंतिम निर्णय घेण्यासाठी अतिरिक्त कागदपत्रांची आवश्यकता असल्यास अशा प्रकारे अर्ज रद्द होतो. उदाहरणार्थ, फिंगरप्रिंट्स, अपडेटेड कागदपत्रं किंवा निर्णय घेणाऱ्या अधिकाऱ्याला माहितीबद्दल स्पष्टता हवी असल्यास दूतावास अर्जदाराला मुलाखतीची वेळ निश्चित करायला सांगतो.

कलम २२१ (जी)च्या अंतर्गत तुमचा अर्ज रद्द झाला असल्यास आणि तुम्हाला ऑनलाईन अपॉईंटमेंट घेण्यास सांगितलं असल्यास, कृपया पत्रात देण्यात आलेल्या लिंकवर, www.ustraveldocs.com जा आणि तुम्ही जिथे अर्ज भरलाय, त्या पदाचं नाव निवडा. उदारहणार्थ, तुम्ही अमेरिकेच्या मुंबईतील दूतावासात अर्ज केला असल्यास, तर मुलाखतीसाठी अपॉईंटमेंट घेताना 'मुंबई'चा पर्याय निवडा.

२२१ (जी) मुलाखतीसाठी तुम्हाला व्हिसा अर्ज केंद्रात मुलाखतीसाठी अपॉईंटमेंट घेण्याची गरज नाही. कोणत्याही दूतावासात २२१ (जी) अपॉईंटमेंट घेण्यासाठी शुल्काची आवश्यकता नसते. अपॉईंटमेंट घेताना अडचण असल्यास, तुम्ही india@ustraveldocs.com वर लिहू शकता किंवा कस्टमर सपोर्ट टीमला कॉल करू शकता. भारताकडून:  91-120-484-4644 किंवा 91-022-6201-1000 (सोमवार ते शुक्रवार, सकाळी 8 ते संध्याकाळी ५ पर्यंत, भारतीय प्रमाण वेळ (आयएसटी), रविवारी सकाळी ९ ते संध्याकाळी ६ पर्यंत, भारतीय प्रमाण वेळ. अमेरिकेकडून: 1-703-520-2239 (रविवारी रात्री 10:30 ते शुक्रवारी सकाळी ७.३० पर्यंत, पूर्व प्रमाण वेळ (ईएसटी). महत्त्वाची सूचना: व्हिसा आणि दूतावासाशी संबंधित पडलेल्या तुमच्या प्रश्नांना उत्तर मिळण्याचं योग्य ठिकाण म्हणजे http://www.ustraveldocs.com/in या कॉलममधून आम्ही विशिष्ट व्हिसा प्रकरणांशी संबंधित प्रश्नांची उत्तरं देत नाही. व्हिसासंबंधित सामान्य प्रश्नांची उत्तरं आम्ही देतो. तुम्हाला विशिष्ट व्हिसाबद्दल प्रश्न विचारायचे असल्यास, support-india@ustraveldocs.com वर संपर्क साधा. अमेरिकन व्हिसाचे सर्व अर्जदार अर्जाचा आयडी आणि क्रमांकासह त्यांनी अर्ज केलेल्या व्हिसाचं स्टेटस http://ceac.state.gov/ceacवर जाऊन तपासू शकता.फेसबुकवर आमचं www.facebook.com/Mumbai.USConsulate पेज लाईक करा. तर ट्विटरसाठी http://twitter.com/USAndMumbai क्लिक करून आम्हाला फॉलो करा.

टॅग्स :AmericaअमेरिकाVisaव्हिसा