उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2026 19:40 IST2026-04-09T19:39:15+5:302026-04-09T19:40:14+5:30

पाकिस्तानात दहशतवादी हल्ले सामान्य बाब आहे आणि जागतिक नेत्यांच्या उपस्थितीमुळे हा धोका कित्येक पटीने वाढू शकतो. 

US Vice President J.D. Vance fears going to Pakistan for US-Iran ceasefire talks in Islamabad, Pakistan | उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?

उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?

इस्लामाबाद - अमेरिकन उपराष्ट्रपती जे.डी व्हान्स यांच्या संभाव्य दौऱ्यामुळे पाकिस्तान हायअलर्टवर आहे. अमेरिका आणि इराणमधील वरिष्ठ नेते, अधिकारी युद्धविरामवरील चर्चेसाठी इस्लामाबादला येतील अशी पाकिस्तानला आशा आहे. इराणचे राष्ट्रपती मसूद पेझेश्कियन इस्लामाबाद चर्चेत सहभागी होतील असा दावा इराणने केला आहे परंतु अमेरिकेकडून या विषयावर अद्याप पत्ते उघडले नाहीत. त्यातच उपराष्ट्रपती जे.डी व्हान्स सुरक्षेच्या कारणास्तव पाकिस्तान दौरा टाळण्याचा प्रयत्न करतायेत अशी बातमी समोर आली आहे. मात्र पाकिस्तानने अमेरिकेला सुरक्षेची पूर्ण हमी दिली आहे.

अमेरिकन राजदूताला भेटले पाकिस्तानी गृहमंत्री

पाकिस्तानी गृहमंत्री मोहसिन नकवी यांनी गुरुवारी अमेरिकेचे राजदूत नॅटली बेकर यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी इस्लामाबादमध्ये होणाऱ्या अमेरिका आणि इराण यांच्यातील शांतता चर्चेच्या सुरक्षेचा आढावा दिला. परंतु अमेरिकन राजदूतांनी उपराष्ट्रपती जे.डी व्हान्स यांच्या दौऱ्याबाबत कुठलीही पुष्टी दिली नाही. पाकिस्तानने अमेरिकेला हमी दिली असली तरी सुरक्षेबाबत अजूनही शंका आहे. पाकिस्तानात दहशतवादी हल्ले सामान्य बाब आहे आणि जागतिक नेत्यांच्या उपस्थितीमुळे हा धोका कित्येक पटीने वाढू शकतो. 

सुरक्षेबाबत पाकिस्तानची अमेरिकेला गॅरंटी

या बैठकीत नकवी यांनी बेकर यांना सर्व परदेशी पाहुण्यांना अभेद्य सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी एक व्यापक प्लॅन तयार करण्यात आल्याची माहिती दिली. राजधानीत होणाऱ्या उच्चस्तरीय चर्चेवेळी अमेरिकेचे उपराष्ट्रपती व्हान्स, स्टीव्ह विटकॉफ आणि जेरेड कुशनर हे पाकिस्तानचे विशेष पाहुणे असतील. या बैठकीत इस्लामाबादला भेट देणाऱ्या परदेशी शिष्टमंडळासाठीच्या लॉजिस्टिकल व्यवस्थेवरही लक्ष केंद्रित करण्यात आले आहे असं त्यांनी सांगितले. 

इस्लामाबादमध्ये लॉकडाऊनसारखी परिस्थिती

दरम्यान, परदेशी शिष्टमंडळाच्या आगमनामुळे प्रशासनाने इस्लामाबादमध्ये सुरक्षा व्यवस्था कडक केली असून वाहतुकीत बदल लागू केले आहेत. अनेक प्रमुख रस्ते वाहतूक वळवण्यात आली आहे तर काही बंद केली आहे. शहरात एक विशेष वाहतूक योजना लागू करण्यात आली असून आज आणि उद्या कोणत्याही अवजड वाहनांना इस्लामाबादमध्ये प्रवेश दिला जाणार नाही असं इस्लामाबाद वाहतूक पोलिसांनी सांगितले. या वाहतूक योजनेअंतर्गत झिरो पॉइंट ते कोरल चौकपर्यंत द्रुतगती मार्ग दोन्ही बाजूंनी बंद राहील तर परदेशी शिष्टमंडळाच्या येण्या-जाण्यामुळे इस्लामाबाद द्रुतगती मार्गावरही वाहतूक वळवण्यात येईल.

Web Title : उपराष्ट्रपति वेंस को पाकिस्तान यात्रा का डर; क्या अमेरिका-ईरान वार्ता खतरे में?

Web Summary : सुरक्षा चिंताओं के बीच उपराष्ट्रपति वेंस पाकिस्तान जाने से कतरा सकते हैं। पाकिस्तान को इस्लामाबाद में अमेरिका-ईरान वार्ता की उम्मीद है। सुरक्षा बढ़ाई गई, यातायात बाधित। विदेशी गणमान्य व्यक्तियों के लिए व्यापक सुरक्षा योजना लागू।

Web Title : VP Vance Fears Pakistan Trip; US-Iran Talks in Jeopardy?

Web Summary : VP Vance may avoid Pakistan amid security concerns despite assurances. Pakistan hopes for US-Iran talks in Islamabad. Security is heightened, with traffic disruptions expected. A comprehensive security plan is in place for foreign dignitaries.