America Iran News: अमेरिका कधीही इराणवर हल्ला करण्याची शक्यता, युद्धाचे मोठे संकेत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2026 09:19 IST2026-02-10T09:19:05+5:302026-02-10T09:19:58+5:30

America Iran Tension: मध्य पूर्वेत युद्धाचे ढग दाटले आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणवर कोणत्याही क्षणी लष्करी कारवाई होण्याची शक्यता निर्माण झाली.

US Vessels Told to Avoid Iranian Waters; Donald Trump Forces Ready for Strike as Tensions Peak | America Iran News: अमेरिका कधीही इराणवर हल्ला करण्याची शक्यता, युद्धाचे मोठे संकेत!

America Iran News: अमेरिका कधीही इराणवर हल्ला करण्याची शक्यता, युद्धाचे मोठे संकेत!

मध्य पूर्वेतील तणाव आता शिगेला पोहोचला असून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प कोणत्याही क्षणी इराणवर लष्करी कारवाईचे आदेश देऊ शकतात, अशी चिन्हे दिसत आहेत. अमेरिकेकडून गेल्या काही दिवसांत मिळालेले संकेत आणि होर्मुझच्या सामुद्रधुनीसाठी जारी केलेली नवीन मार्गदर्शक तत्वे यामुळे युद्ध अटळ असल्याची चर्चा जागतिक स्तरावर सुरू झाली आहे.

अमेरिकन सागरी प्रशासनाने होर्मुझच्या सामुद्रधुनीतून प्रवास करणाऱ्या अमेरिकन व्यावसायिक जहाजांसाठी नवीन नियमावली जारी केली. अमेरिकन जहाजांना इराणच्या प्रादेशिक हद्दीपासून शक्य तितके दूर राहून ओमानच्या सागरी हद्दीजवळून प्रवास करण्याची शिफारस करण्यात आली. जर इराणी सैन्याने जहाजांना अडवण्याचा प्रयत्न केला. तर, क्रू मेंबर्सनी सशस्त्र प्रतिकार करू नये, असे सांगण्यात आले. मात्र, याचा इराणी सैन्याला संमती देणे असा होत नाही, असेही स्पष्ट करण्यात आले.

अमेरिकेने आपल्या नागरिकांसाठी सर्वात कडक अशी ट्रॅव्हल ॲडव्हायझरी जारी केली. इराणमधील अमेरिकन नागरिकांनी सरकारी मदतीची वाट न पाहता स्वतःहून देश सोडण्याची योजना तयार ठेवावी आणि तातडीने इराण सोडावे, असा इशारा देण्यात आला. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी युद्धनौकांचा ताफा इराणच्या दिशेने रवाना केला आहे. यामध्ये विमानवाहू युद्धनौका, लढाऊ विमाने आणि हजारो सैनिकांचा समावेश आहे.एकीकडे ट्रम्प इराणवर अणु करारासाठी दबाव आणत आहेत, तर दुसरीकडे लष्करी ताफा तैनात करून युद्धाचे संकेत देत आहेत. 

Web Title : अमेरिका ईरान समाचार: क्या अमेरिका का हमला आसन्न? युद्ध के संकेत!

Web Summary : अमेरिका द्वारा ईरान पर संभावित सैन्य कार्रवाई के संकेतों के साथ तनाव बढ़ गया है। जहाजों और यात्रा सलाहकारों के लिए नए दिशानिर्देश युद्ध की आशंकाओं को बढ़ाते हैं। ट्रम्प सैन्य तैनाती करते हुए परमाणु समझौते पर ईरान पर दबाव डाल रहे हैं, जिससे संघर्ष का संकेत मिलता है।

Web Title : America Iran News: Imminent US Attack? War Signals Intensify!

Web Summary : Tensions escalate as the US signals potential military action against Iran. New guidelines for ships and travel advisories heighten war fears. Trump pressures Iran on nuclear deal while deploying military, hinting at conflict.