US Election: निवडणुकीपूर्वी अमेरिकेत तणावाचे वातावरण, लोक स्वसंरक्षणासाठी खरेदी करतायत बंदुका 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2020 11:29 AM2020-11-02T11:29:55+5:302020-11-02T11:31:17+5:30

अमेरिकेत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वातावरण तापले आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार ज्यो बायडेन यांच्यात चुरशीची लढत होताना दिसत आहे. मात्र, आता निवडणूक निकाल कुणाच्या बाजूने येतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

US tension around the country for presidential elections people are buying guns for their safety  | US Election: निवडणुकीपूर्वी अमेरिकेत तणावाचे वातावरण, लोक स्वसंरक्षणासाठी खरेदी करतायत बंदुका 

US Election: निवडणुकीपूर्वी अमेरिकेत तणावाचे वातावरण, लोक स्वसंरक्षणासाठी खरेदी करतायत बंदुका 

googlenewsNext

वॉशिग्टन - अमेरिकेत मंगळवारी राष्ट्राध्यक्ष पदासाठी मतदान होत आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशभरात तणावाचे वातावरण दिसत आहे. अशात लोक स्वसंरक्षणासाठी बंदुका विकत घेत आहेत. बुंदूक विकत घेणाऱ्यांमध्ये 40 टक्के लोक असे आहेत, ज्यांनी आयुष्यात प्रथमच बंदूक हातात घेतली आहे. 

मार्चमध्ये 3.7 मिलियन, तर जूनमध्ये 3.9 मिलियन लोकांनी विकत घेतली बंदूक -
अमेरिकेतील अधिकांश लोक बंदूक खरेदी करताना दिसत आहेत. विशेष म्हणजे हे लोक आपल्या आयुष्यात पहिल्यांदाच बंदूक खरेदी करत आहेत आणि हे सर्व राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशात निर्माण झालेल्या वातावरणामुळे सुरू आहे. सप्टेंबरमधील एफबीआयच्या रेकॉर्डप्रमाणे बंदूक खरेदी करण्यासाठी बॅकग्राउंड क्लिअर दाखवणे आवश्यक आहे. मात्र मार्च महिन्यात 3.7 मिलियन आणि नंतर जूनमध्ये 3.9 मिलियन सप्टेंबरमध्ये 28.8 मिलियनपर्यंत बॅकग्राउंड तपासणीने गेल्या वर्षीचा 28.4 मिलियनचा आकडाही मागे टाकला आहे.

सिव्हिल वॉर होण्याची शक्यता दिसतेय - बंदूक व्यापारी
बंदूक व्यापार संघ नॅशनल स्पोर्ट्स शूटिंग फाउंडेशननुसार, 40 टक्के ग्राहकांनी पहिल्यांदाच बंदूक विकत घेतली आहे. यात मोठी संख्या असणाऱ्या राज्यांत रिपब्लिकन आणि डेमोक्रॅट दोघेही आहेत. तसेच 2016 मध्ये झालेल्या निवडणुकीत बॅकग्राउंड चेक करून बंदूक विकत घेणाऱ्यांची एकूण संख्या 27.5 मिलियन एवढी होती. बेन्सन म्हणतात, मला बंदुकांचा काही छंद नाही. मात्र, मला माझा अधिकार दाखवणे आवश्यक आहे. निवडणूक निकालासंदर्भात लोकांमध्ये तणावाचे वातावरण आहे. देशातील बंदूक व्यापाऱ्यांना सिव्हिल वॉर होते, की काय अशी शक्यता वाटत आहे. 

अमेरिकेत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वातावरण तापले आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार ज्यो बायडेन यांच्यात चुरशीची लढत होताना दिसत आहे. मात्र, आता निवडणूक निकाल कुणाच्या बाजूने येतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

Web Title: US tension around the country for presidential elections people are buying guns for their safety 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.