एकीकडे मध्य-पूर्वेत अमेरिकेचे इराणसोबत युद्ध सुरू असतानाच, दुसरीकडे पूर्व आशियातही युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. अमेरिका आणि दक्षिण कोरियाने आजपासून आपला सर्वात मोठा वार्षिक संयुक्त लष्करी सराव 'फ्रीडम शील्ड' सुरू केला आहे. या पावलामुळे उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन संतापण्याची शक्यता असून आशियात तणाव वाढला आहे.
जागतिक स्तरावर या लष्करी सरावाकडे अत्यंत गांभीर्याने पाहिले जात आहे. अमेरिका सध्या इराणसोबतच्या संघर्षात व्यस्त असतानाही, दक्षिण कोरियासोबत लष्करी सराव करून त्यांनी चीन आणि उत्तर कोरियाला स्पष्ट संकेत दिले आहेत. या सरावात हजारो सैनिक, अत्याधुनिक लढाऊ विमाने आणि युद्धनौका सहभागी झाल्या आहेत.
उत्तर कोरियाचा 'अणू' इशाराउत्तर कोरियाने या लष्करी सरावाचा नेहमीच निषेध केला असून, याला "युद्धाची रंगीत तालीम" असे म्हटले आहे. इराणमधील संघर्षाचा फायदा घेऊन उत्तर कोरिया एखादी मोठी क्षेपणास्त्र चाचणी किंवा अण्वस्त्र चाचणी करून अमेरिकेवर दबाव निर्माण करण्याची भीती संरक्षण तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
दक्षिण कोरियासोबतचा लष्करी सराव ही नांदी?मध्य-पूर्वेत युद्ध सुरू असतानाच अमेरिकेने दक्षिण कोरियासोबत सुरू केलेला विशाल लष्करी सराव हा केवळ सराव नसून, तो उत्तर कोरियाला दिलेला थेट इशारा मानला जात आहे. जर किम जोंग उन यांनी इराण युद्धाचा फायदा घेऊन कोणतीही कुरापत काढली, तर अमेरिका त्यांच्यावर तुटून पडण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे.
काय आहे अमेरिकेची रणनीती?अमेरिकेने गेल्या काही काळापासून आपल्या शत्रू राष्ट्रांमधील सत्तापालट किंवा तिथल्या संसाधनांवर नियंत्रण मिळवण्याची रणनीती आखली आहे.१. व्हेनेझुएला: निकोलस मादुरो यांच्या राजवटीला अस्थिर करून तिथल्या तेल साठ्यांवर दबाव निर्माण केला.२. इराण: सध्या इराणमधील 'सुप्रीम लीडर' बदलल्यानंतर अमेरिकेने लष्करी आक्रमकता वाढवली आहे.३. उत्तर कोरिया: आता किम जोंग उन यांच्या अण्वस्त्र कार्यक्रमाला खीळ घालण्यासाठी अमेरिका 'थेट कारवाई'च्या तयारीत असल्याचे संकेत मिळत आहेत.
जगावर तिसऱ्या महायुद्धाचे सावट?जर अमेरिकेने उत्तर कोरियाला लक्ष्य केले, तर चीन आणि रशिया गप्प बसण्याची शक्यता कमी आहे. अशा स्थितीत हे युद्ध केवळ दोन देशांपुरते मर्यादित न राहता त्याचे रूपांतर जागतिक महायुद्धात होऊ शकते. यामुळे जागतिक शेअर बाजार आणि पुरवठा साखळी पूर्णपणे कोलमडण्याची भीती आहे.
Web Summary : Amid Iran tensions, US-South Korea drills escalate North Korea threat. Kim's nuclear ambitions face potential US action, risking global conflict involving China and Russia. World war looms?
Web Summary : ईरान में तनाव के बीच, अमेरिका-दक्षिण कोरिया अभ्यास से उत्तर कोरिया का खतरा बढ़ा। किम की परमाणु महत्वाकांक्षाओं पर संभावित अमेरिकी कार्रवाई का खतरा, जिसमें चीन और रूस शामिल हैं। क्या विश्व युद्ध का खतरा मंडरा रहा है?