शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup मध्ये भारताची डोकेदुखी वाढवणारी बातमी! ICC च्या नियमामुळे गोंधळ 
2
स्वाती मालिवाल यांच्यासोबत गैरवर्तन झालं, AAP ने दिली कबुली, दोषींवर केजरीवाल करणार कठोर कारवाई
3
मराठा रोषामुळे बीड मतदारसंघात सभा टाळली?; फडणवीसांनी दिलं रोखठोक उत्तर
4
"अग्निवीर योजना फाडून कचऱ्यात फेकून देऊ", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल 
5
सत्ताधाऱ्यांकडून राज्यात २ हजार कोटींचे वाटप; आमदार रोहित पवारांचा गंभीर आरोप
6
'चंदा लो, धंदा दो' या महायुतीच्या धोरणामुळेच झाली होर्डिंग दुर्घटना; विजय वडेट्टीवारांचे टीकास्त्र
7
Arvind Kejriwal : "तुम्ही कमळाचं बटण दाबलंत तर मला पुन्हा जेलमध्ये जावं लागेल पण जर..."
8
Narendra Modi : "केरळने धडा शिकवला, उत्तर प्रदेशच्या जनतेनेही ओळखलंय"; मोदींचा राहुल गांधींना खोचक टोला
9
अमेठी, रायबरेलीत काँग्रेसच्या हाताला सपाच्या सायकलची साथ, अखिलेश यादव यांचे कार्यकर्त्यांना स्पष्ट आदेश 
10
सैन्यातील नोकरी सोडून गाझातल्या लोकांच्या मदतीसाठी धावले; इस्रायलच्या हल्ल्यात वैभव काळेंचा मृत्यू
11
Akhilesh Yadav : "भाजपाने Google वर 100 कोटींचा प्रचार करण्याचा रेकॉर्ड केला... हा जनतेचा पैसा"
12
ॐ मित्राय नमः! सूर्यनमस्काराचे १० जबरदस्त फायदे; इतका परिपूर्ण व्यायाम की जिमची गरजही नाही
13
कार्तिकी गायकवाडच्या घरी 'लिटील चॅम्प'चं आगमन; पोस्ट शेअर करत दिली गुडन्यूज
14
UPSC मध्ये घटस्फोटित कोट्यातून नोकरीसाठी पतीला सोडलं, पहिल्याच Marriage Anniversary ला केली विचित्र मागणी
15
तुम्ही काय दिवे लावले? हार्दिकवर टीका करणाऱ्या AB de Villiers वर गौतम गंभीर खवळला 
16
"बायको गेल्यानंतर स्वत:ला संपवायचं ठरवलं होतं", कठीण काळाबद्दल बोलताना भूषण कडू भावुक
17
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी तेजीसह बंद; अदानी एन्टरप्राईजेसमध्ये तेजी, Cipla घसरला
18
जगातील सर्वात पॉवरफुल क्रॉसओवर बाईक BMW M 1000 XR लाँच,  जाणून घ्या किंमत...
19
RCB vs CSK सामन्यावर पावसाचं सावट! सामना रद्द झाल्यास प्ले ऑफमध्ये कोण जाणार?
20
घाटकोपरसारखीच चूक २१ वेळा; होर्डिंग दुर्घटनेला जबाबदार असलेला भावेश भिंडे कोण आहे?

अमेरिकेत आता कोरोनाग्रस्तांना दिले जाणार रेमेडिसविर, मिळाली मंजुरी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2020 2:53 PM

याआधी अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनाने आपत्कालीन परिस्थितीत हे औषध वापरण्याची परवानगी दिली होती.

ठळक मुद्देजगभरात कोरोनाने धुमाकूळ घातला असून आतापर्यंत कोरोना बाधितांची एकूण संख्या 2 कोटी 49 लाख 11 हजार 716 वर पोहोचली आहे.

अमेरिकेने आपल्या देशातील कोरोना रूग्णांवर उपचारांसाठी अँटीव्हायरल औषध रेमेडिसविरचा वापर करण्यास परवानगी दिली आहे. आता हे औषध रूग्णालयात दाखल झालेल्या कोरोनाबाधित रुग्णांना देण्यात येणार आहे. औषध निर्माता कंपनी गिलियड सायन्सेसने म्हटले आहे की, कोविड-१९ च्या नियामकाने सर्व रुग्णालयात दाखल झालेल्या रूग्णांसाठी प्रायोगिक अँटीव्हायरल औषध रेमेडिसविरच्या वापरास परवानगी दिली आहे.

याआधी अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनाने आपत्कालीन परिस्थितीत हे औषध वापरण्याची परवानगी दिली होती. आतापर्यंत हे केवळ तीव्र कोरोनाबाधित रुग्णांना देण्यात येत होते.  कॅलिफोर्नियाच्या गिलियड कंपनीने १० ऑगस्टला या रेमेडिसवीरच्या औपचारिक मान्यतासाठी अर्ज केला होता. आता हे वेक्लरी या ब्रँड नावाने विकले जाईल.

गिलियडने निवेदनात म्हटले आहे की, आपत्कालीन उपयोगाच्या सुविधेचा विस्तार आहे. हे रुग्णालयात दाखल झालेल्या रूग्णांच्या नुकत्याच झालेल्या फेडरल चाचणीच्या निकालांवर आधारित होते. यामध्ये गांभीर्याचे वेगवेगळे स्तर पाहता हा निर्णय घेण्यात आला.गिलियडच्या अभ्यासानुसार कोरोना विषाणूमुळे रूग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांमध्ये रेमेडिसविरचा उपयोग केल्यानंतर पाच दिवसांच्या उपचारात बरे होणाऱ्यांची शक्यता 65% अधिक होती.

जगभरात आतापर्यंत 2 कोटी 49 लाख 11 हजार 716 जणांना कोरोनाची लागणजगभरात कोरोनाने धुमाकूळ घातला असून आतापर्यंत कोरोना बाधितांची एकूण संख्या 2 कोटी 49 लाख 11 हजार 716 वर पोहोचली आहे. Worldometers ने दिलेल्या माहितीनुसार, जगभरात कोरोना बाधितांची एकूण संख्या 2 कोटींच्या पार गेली असून आतापर्यंत एकूण 8,41,331 रुग्ण दगावल्याची माहिती मिळत आहे. तर 1,72,99,915 रुग्ण बरे झाले असून त्यांची कोरोनाविरुद्धची झुंज यशस्वी ठरली आहे. जगभराचा विचार केला असता कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण अमेरिकेत असून देशात 60,96,235 रुग्ण आढळले आहेत. Worldometers दिलेल्या आकडेवारीनुसार, अमेरिकेत 1 लाख 85 हजार 901 रुग्ण दगावले असून बरे झालेल्या रुग्णांची संख्या 33,75,838 वर पोहोचली आहे. अमेरिकेपाठोपाठ ब्राझील आणि भारत देशात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आहेत.

भारतात कोरोनाबाधितांचा आकडा ३४ लाखांवरजगभरात कोरोना रुग्णांची संख्येत वाढ होत आहे. तसेच, भारतातही कोरोना संक्रमितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. आता देशातील कोरोनाबाधितांचा आकडा 34 लाखांवर पोहोचला आहे. आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, कोरोनामुळे देशात आतापर्यंत 62,550 जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र, दिलासादाक गोष्ट म्हणजे आतापर्यंत तब्बल 26,48,999 लोकांनी कोरोनावर मात केली असून ते बरे झाले आहेत. केंद्रीय आरोग्य विभागाकडून आतापर्यंत मिळालेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत कोरोनाचे तब्बल 76,472 नवे रुग्ण समोर आले आहेत. तर 1,021 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोना संक्रमितांच्या बाबतीत अमेरिका आणि ब्राझीलनंतर भारताचा जगात तिसरा क्रमांक लागतो. भारतात शुक्रवारी 24 तासांत विक्रमी 77,266 नवे कोरोनाबाधित समोर आले होते.

आणखी बातम्या...

- अ‌ॅपल कंपनी लवकरच आणणार स्वत:चे ‘Search Engine’, गुगलला देणार टक्कर

- कोरोना स्पेशल विमा सुरक्षा कवच लोकप्रिय, १५ लाखांहून अधिक लोकांनी घेतला फायदा    

- Railway Recruitment 2020 : रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी, परीक्षेशिवाय ४३२ जागा भरणार    

CoronaVirus News : रशिया सर्वात आधी 'या' देशाला देणार कोरोनावरील लस...    

आरबीआयने डेबिट, क्रेडिट कार्डशी संबंधित नियम बदलले; 30 सप्टेंबरपासून लागू होणार    

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAmericaअमेरिका