ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2025 00:37 IST2025-06-28T00:36:09+5:302025-06-28T00:37:17+5:30

...यावेळी त्यांनी चीनसोबत झालेल्या एका कराराचीही पुष्टी केली. ते व्हाइट हाऊस येथे 'बिग ब्यूटीफुल बिल' कार्यक्रमात बोलत होते.

us President donald trump trade deal with China, now makes a big statement regarding India | ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'

ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'

यूएस आणि भारत यांच्यात एक मोठा व्यापार करार होऊ शकतो, असे संकेत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले आहेत. यावेळी त्यांनी चीनसोबत झालेल्या एका कराराचीही पुष्टी केली. ते व्हाइट हाऊस येथे 'बिग ब्यूटीफुल बिल' कार्यक्रमात बोलत होते.

एएनआयने दिलेल्या वृ्त्तानुसार, ट्रम्प म्हणाले, "प्रत्येकालाच एक करार करायचा आहे आणि त्यात सहभागी व्हायचे आहे. काही महिन्यांपूर्वी मीडिया काय म्हणत होता? जरा आठवा, आपण कालच चीनसोबत स्वाक्षरी केली आहे (करार केला आहे.). तर काही उत्तम करारही करत आहोत. 

या शिवाय, "आपण कदाचित भारतासोबतही एक मोठा सौदा करणार आहोत, खूप मोठा. याशिवाय आपण भारताला व्यवसायासाठी खुले करणार आहोत, अगदी चीनप्रमाणेच, असेही ट्रम्प यावेळी म्हणाले.

प्रत्येक देशासोबत एकसारखा व्यवहार केला जाऊ शकत नाही -
ट्रम्प पुढे म्हणाले, 'प्रत्येक देशासोबत एकसारखा व्यवहार केला जाऊ शकत नाही. आम्ही सर्वांसोबत करार करणार नाही. काहींना केवळ एक पत्र पाठवून आभार मानू. आपल्याला 25, 35, 45 टक्क्यांपर्यंत पैसे द्यावे लागतील. 

चीनसोबत आपला करार झाला आहे -
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्रुथवर केलेल्या एका पोस्टमध्ये डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, "चीनसोबत आपला करार झाला आहे. यानुसार चीन रेअर अर्थ मॅग्नेट आणि इतर कुठल्याही आवश्यक दुर्लभ साहित्याचा पुरवठा करेल."

Web Title: us President donald trump trade deal with China, now makes a big statement regarding India