डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा, 'फार्मा'नंतर आता या क्षेत्रावरही लावणार टॅरिफ; भारतावर काय परिणाम होणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2025 09:18 IST2025-08-23T09:18:10+5:302025-08-23T09:18:52+5:30

या निर्णयामुळे अमेरिकन उद्योग पुन्हा मजबूत होईल आणि देशांतर्गत उत्पादन वाढेल, असे ट्रम्प यांचे मत आहे.

us president Donald Trump big announcement after pharma now tariffs will be imposed on furniture sector as well; What will be the impact on India | डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा, 'फार्मा'नंतर आता या क्षेत्रावरही लावणार टॅरिफ; भारतावर काय परिणाम होणार?

डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा, 'फार्मा'नंतर आता या क्षेत्रावरही लावणार टॅरिफ; भारतावर काय परिणाम होणार?


डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणाने जागतिक व्यापार युद्धाला तोंड फोडले आहे. ट्रम्प यांनी आता फार्मा क्षेत्रानंतर, फर्नीचर आयातीवरही टॅरिफ लादण्यचाा नवा प्रस्ताव सादर केल आहे. यासंदर्भात बोलताना ते म्हणाले, "येणाऱ्या ५० दिवसांत या संदर्भातील चौकशी पूर्ण होईल आणि त्यानंतर इतर देशांमधून अमेरिकेत येणाऱ्या फर्निचरवर किती शुल्क लावायचे यासंदर्भात निर्णय घेतला जाईल." तसेच, या निर्णयामुळे अमेरिकन उद्योग पुन्हा मजबूत होईल आणि देशांतर्गत उत्पादन वाढेल, असे ट्रम्प यांचे मत आहे.

फर्नीचर आयातीवर का टॅरिफ लावतायत ट्रम्प? -
महत्वाचे म्हणजे, डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या निवेदनात प्रामुख्याने उत्तर कॅरोलिना, दक्षिण कॅरोलिना आणि मिशिगन आदी राज्यांचा उल्लेख  केला. ही राज्ये एकेकाळी फर्निचर उद्योगाची मोठी केंद्रे होती. मात्र, स्वस्त कामगार आणि कमी उत्पादन खर्चामुळे येथील बहुतेक कंपन्यां दुसऱ्या देशांत गेल्या. आता ट्रम्प यांचे म्हणणे आहे की, नव्या टॅरिफमुळे या कंपन्यांना पुन्हा अमेरिकेत उत्पादन करणे भाग पडेल.

ट्रम्प यांच्या घोषणेचा भारतावर काय परिणाम होणार? - 
ट्रम्प यांचा फर्निचर आयातीवर शुल्क लावण्याचा प्रस्ताव हा एका व्यापक धोरणाचा भाग आहे. सरकार आधीच इतर उत्पादनांवरही शुल्क लावण्याच्या विचारात आहे. यात तांबे, सेमीकंडक्टर आणि औषधे (फार्मास्यूटिकल्स) आदींचा समावेश आहे. ट्रम्प यांच्या या धोरणाचा उद्देश देशांतर्गत उत्पादनाला चालना देणे, परकीय अवलंबित्व कमी करणे, तसेच अमेरिकेतील उद्योग आणि रोजगार मजबूत करणे असा आहे. महत्वाचे म्हणजे, ट्रम्प यांच्या या घोषणेचा भारतावरही परिणाम होणार होईल. कारण अमेरिकेला फर्निचरची निर्यात करण्यात भारताचाही मोठा वाटा आहे. 

Web Title: us president Donald Trump big announcement after pharma now tariffs will be imposed on furniture sector as well; What will be the impact on India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.