भारतासोबत अतिशय घाणेरडा खेळ...! आसिम मुनीरच्या प्रेमात पडली अमेरिका, हे काय बोलले टॉप लष्करी कमांडर...?
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 09:43 IST2025-06-12T09:40:19+5:302025-06-12T09:43:00+5:30
पाकिस्तानकडे आता आमेरिकेला दहशतवादाविरुद्धच्या लढाईतील एक 'अद्भूत सहकारी' म्हणून बघत आहे...!

भारतासोबत अतिशय घाणेरडा खेळ...! आसिम मुनीरच्या प्रेमात पडली अमेरिका, हे काय बोलले टॉप लष्करी कमांडर...?
ज्या पाकिस्तानने जगातील सर्वात खतरनाक दहशतवादी ओसामा बिन लादेनला आपल्या घरात लपवून ठेवले, ज्या पाकिस्तानने लश्कर ए तैयबा आणि जैश ए मोहम्मद सारख्या दहशतवादी संघटनांकरवी भारतात पहलगाम नरसंहार घडवून आणला. तोच पाकिस्तान आता अमेरिकेला दहशतवादाने ग्रस्त असलेला देश वाटत आहे. त्याच पाकिस्तानकडे आता आमेरिकेला दहशतवादाविरुद्धच्या लढाईतील एक 'अद्भूत सहकारी' म्हणून बघत आहे. हे सर्व कशामुळे तर, पाकिस्तानने दहशतवादी मोहम्मद शरीफुल्लाहसह आयएसआयएस (खुरासान)च्या पाच दहशतवाद्यांचे अमेरिकेकडे प्रत्यार्पण केले. खरे तर, अमेरिकेचे सर्वोच्च लष्करी कमांडर जनरल मायकेल कुरिला यांनी हे मान्य केले आहे. याचवेळी, भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही देश अमेरिकेसाठी महत्त्वाचे आहेत. एकासाठी दुसऱ्याला सोडता येणार नाही, असे कुरिला यांनी म्हटले आहे.
यूएस सेंट्रल कमांडचे (सेंटकॉम) प्रमुख जनरल कुरिला यांनी आपल्या देशाच्या एका संसदीय (काँग्रेस) समितीसमोर पाकिस्तानचे कौतुक केले आहे. जनरल कुरिला यांच्या मते, २०२४ पासून अफगाणिस्तानला लागून असलेल्या भागात पाकिस्तानच्या भागात सुमारे एक हजार दहशतवादी हल्ले झाले आहेत. हे हल्ले आयएसआयएस आणि तालिबान राजवटीच्या भीतीने अफगाणिस्तानातून पळून गेलेल्या इतर दहशतवादी संघटनांनी केले आहेत. या हल्ल्यांत ७०० पाकिस्तानी सैनिक आणि २५०० नागरिकांनी आपले प्राण गमावले आहेत. असे असूनही, पाकिस्तानी सैन्य या दहशतवाद्यांशी लढत आहे. यूएस सेंट्रल कमांड पाकिस्तान आणि अफगाणिस्तानसह आखाती देश आणि संपूर्ण पश्चिम आशियावर लक्ष ठेऊन असते.
आसिम मुनीरचं कौतुक -
जनरल कुरिला यांच्या या विधानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे. जनरल कुरिला यांनी पाकिस्तानी फील्ड मार्शल असीम मुनीरचे कौतुक केले आहे. कुरिल यांच्यामते, IS दहशतवदी शरीफुल्लाहच्या अटकेनंतर, मुनीर यांनी सर्वप्रथम आपल्यालाच फोन केला होता. तसेच, पाकिस्तान, त्याचे अमेरिकेला प्रत्यपर्ण करण्यास तयार असल्याचे, रक्षा सचिवांना सांगण्यास सांगितले होते.
काबुल एअरपोर्टवर US फोर्सेसव हल्ला -
2021 मध्ये अफगानिस्तान सोडताना काबुल एअरपोर्ट येथे युएस फोर्सेसवर एक दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यात अमेरिकेचे एक डझनहून अधिक सैनिक मारले गेले होते. या हल्ल्यासाठी अमेरिकेने शरीफुल्लाहला आरोपी ठरवले होते. याच वर्षाच्या मार्च महिन्यात पाकिस्तानी सैनिकांनी शरीफुल्लाहला पकडून अमेरिकेच्या स्वाधीन केले होते. तेव्हापासूनच अमेरिकन राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प पाकिस्तानच्या प्रेमात पडले आहेत.