इराणचा नवा सुप्रीम लीडर मृत्यूच्या दारात? दोन्ही पाय गमावले अन् चेहराही विद्रूप; अमेरिकेच्या दाव्याने खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2026 20:10 IST2026-03-13T20:05:26+5:302026-03-13T20:10:10+5:30

अमेरिका आणि इस्रायलच्या संयुक्त कारवाईत मोजताबा जखमी झाल्याचा संशय.

US Pete Hegseth Questions Legitimacy of Iran Missing Leader Mojtaba Khamenei | इराणचा नवा सुप्रीम लीडर मृत्यूच्या दारात? दोन्ही पाय गमावले अन् चेहराही विद्रूप; अमेरिकेच्या दाव्याने खळबळ

इराणचा नवा सुप्रीम लीडर मृत्यूच्या दारात? दोन्ही पाय गमावले अन् चेहराही विद्रूप; अमेरिकेच्या दाव्याने खळबळ

US on Iran Supreme Leader:इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या मृत्यूनंतर सत्तेवर आलेले त्यांचे पुत्र मोजताबा खमेनेई यांच्या प्रकृतीबाबत अत्यंत धक्कादायक माहिती समोर येत आहे. अमेरिकेचे संरक्षणमंत्री पीटर हेगसेथ यांनी शुक्रवारी एक खळबळजनक विधान केले असून, मोजताबा खामेनी हे हवाई हल्ल्यात गंभीर जखमी झाले असून ते विद्रूप झाले असावेत, असा दावा केला आहे. या विधानामुळे पश्चिम आशियातील तणाव आता टोकाला पोहोचला आहे.

पीटर हेगसेथ यांनी इराणच्या नव्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. "इराणचा हा नवा सो-कॉल्ड सर्वोच्च नेता जखमी आहे आणि बहुधा त्याचे रूपही विद्रूप झाले आहे. काल त्यांनी एक निवेदन प्रसिद्ध केले, पण त्यात ना त्यांचा आवाज होता, ना व्हिडिओ. इराणकडे कॅमेरे आणि रेकॉर्डर्सची कमतरता नाही, मग फक्त लेखी निवेदन का? याचे उत्तर स्पष्ट आहे - तो घाबरलेला आहे, जखमी आहे आणि सध्या जीव वाचवण्यासाठी पळत आहे," असे हेगसेथ म्हणाले.

मोजताबा खामेनी कोमात? पाय गमावल्याची चर्चा

माध्यमांच्या वृत्तानुसार , मोजताबा खामेनी यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे. एका हवाई हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांचा किमान एक किंवा दोन्ही पाय निकामी झाले असून ते कापून टाकावे लागले आहेत. त्यांच्या यकृत आणि पोटाला गंभीर इजा झाली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, मोजताबा सध्या कोमात असून त्यांच्यावर तेहरानमधील सिना युनिव्हर्सिटी हॉस्पिटलमध्ये कडक सुरक्षाव्यवस्थेत उपचार सुरू आहेत.

इराणचे नेतृत्व भूमिगत

इस्रायल आणि अमेरिकेच्या सततच्या हवाई हल्ल्यांमुळे इराणचे संपूर्ण वरिष्ठ नेतृत्व सध्या भूमिगत झाले असल्याचे हेगसेथ यांनी सांगितले. "इराणमध्ये सध्या कोणाचे नियंत्रण आहे? हे कदाचित इराणला स्वतःलाही माहीत नसेल. तिथे सध्या गोंधळाची स्थिती आहे," असेही ते म्हणाले.

मोजताबा यांचा पहिला 'लेखी' संदेश

दुसरीकडे, गुरुवारी मोजताबा खमेनेई यांच्या नावाने इराणने पहिला अधिकृत संदेश जारी केला. या संदेशात त्यांनी म्हटले की, "आम्ही शहीदांच्या रक्ताचा बदला घेण्यास विसरणार नाही. आम्ही शेजारी राष्ट्रांशी मैत्रीवर विश्वास ठेवतो, पण आखाती देशांमधील अमेरिकन लष्करी तळांना लक्ष्य करणे सुरूच ठेवू." महत्त्वाचे म्हणजे, या नंतरही मोजताबा सार्वजनिकरित्या समोर न आल्याने संशयाची पाल अधिकच चुकचुकत आहे.
 

Web Title : ईरान के नए सर्वोच्च नेता मृत्यु के करीब? अमेरिकी दावों से खलबली।

Web Summary : अमेरिकी दावों के अनुसार ईरान के नए नेता, मोजताबा खामेनेई, हवाई हमले में गंभीर रूप से घायल हो गए हैं। रिपोर्टों में दावा किया गया है कि वह कोमा में हैं, पैर काट दिए गए हैं, जिससे तनाव और भूमिगत शासन के बीच नेतृत्व अनिश्चितता बढ़ गई है।

Web Title : Iran's New Supreme Leader Near Death? US Claims Spark Controversy.

Web Summary : US claims Iran's new leader, Mojtaba Khamenei, is severely injured and disfigured after an airstrike. Reports suggest he's in a coma with amputated legs, fueling leadership uncertainty amid heightened tensions and underground governance.