शहरं
Join us  
Trending Stories
1
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
2
पाऊस पुन्हा मुक्कामी, मुसळधारेमुळे महामुंबईत धावपळ; ३० ऑक्टोबरपर्यंत मुंबईसह कोकणात मुसळधार
3
रशियावरच्या निर्बंधाने भारतीय तेल कंपन्या अडचणीत; फटका बसू नये म्हणून ONGC जाणार न्यायालयात
4
पश्चिम उपनगरातील वाहतूककोंडी सुटण्यास आणखी ३ वर्षे; गोरगाव ते ओशिवरा केबल-स्टेड पूल उभारणार
5
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
6
देशभरातील आठ हजार शाळा ‘रिकाम्या’; २० हजार शिक्षक घेताहेत फुकटचा पगार
7
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
8
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
9
सलग दुसऱ्या दिवशीही प्रसूतिगृहाचा काेंडवाडा; सहा महिला वेटिंगवर, दाटीवाटीने लावले बेड
10
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
11
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
12
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
13
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
14
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
15
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
16
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
17
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
18
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
19
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
20
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा

US Market Crash: अमेरिकेन शेअर बाजार कोसळला; एका दिवसात जेफ बेझोस यांचे 80,000 कोटी बुडाले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2022 21:49 IST

US Market Down: जेफ बेजोस यांच्यासह एलोन मस्क, मार्क झुकेरबर्ग आणि बिल गेट्ससह अनेकांचे अब्जावधीचे नुकसान झाले आहे.

Jeff Bezos Net Worth: मंगळवारी अमेरिकेत महागाईचे आकडे जाहीर करण्यात आले. ही आकडेवारी समोर आल्यानंतर अमेरिकन शेअर बाजारात मोठी घसरण झाली आहे. या घसरणीचा झटका जगातील टॉपच्या अब्जाधीशांनाही बसलाय. जगातील अनेक श्रीमंतांच्या संपत्तीत मोठी घट झाली आहे. 

जेफ बेझोस यांना मोठा झटकाब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सनुसार, अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस (Jeff Bezos) यांच्या संपत्तीत एका दिवसात $9.8 बिलियन (सुमारे 80,000 कोटी रुपये) घट झाली आहे. जेफ बेझोस यांच्या मालमत्तेत सर्वात मोठी घसरण दिसून आली आहे. यानंतर एलोन मस्कच्या संपत्तीत 8.4 अब्ज डॉलर (70 हजार कोटी रुपये) घट झाली आहे.

आणि कोणाचे किती नुकसान झाले?ब्लूमबर्गने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, मार्क झुकेरबर्ग, लॅरी पेज, सर्जे ब्रिन आणि स्टीव्ह बाल्मर यांच्या संपत्तीत $4 अब्जांपेक्षा जास्त घट झाली आहे, तर वॉरेन बफेट आणि बिल गेट्स यांना अनुक्रमे $3.4 अब्ज आणि $2.8 अब्ज नुकसान झाले आहे.

यूएस बाजार 1300 अंकांनी कोसळलायूएस बाजारातील घसरणीनंतर, डाऊ जोन्स सुमारे 1300 अंकांनी घसरला आणि S&P देखील 500 अंकांनी घसरला. अमेरिकेत किरकोळ चलनवाढीचा दर ऑगस्ट महिन्यात 8.3 टक्के होता. याशिवाय अमेरिकेच्या बाजारपेठेत खाद्यपदार्थ आणि उर्जेच्या किमतीत मोठा चढउतार पाहायला मिळत आहे.

अपेक्षेपेक्षा वाईट आकडेवारीअमेरिकेतील आकडेवारी अपेक्षेपेक्षा खूपच वाईट आली आहे. त्यामुळे बाजारात मोठी घसरण झाली आहे. पुढील आठवड्यात होणाऱ्या बैठकीत फेडरल रिझर्व्ह पुन्हा एकदा व्याजदरात 0.75 टक्क्यांनी वाढ करू शकते. याच कारणामुळे चलनवाढीचे आकडे येताच अमेरिकन शेअर बाजारात चौफेर विक्री झाली.

 

टॅग्स :amazonअ‍ॅमेझॉनAmericaअमेरिकाshare marketशेअर बाजारMark Zuckerbergमार्क झुकेरबर्गBill Gatesबिल गेटसelon muskएलन रीव्ह मस्क