मध्य पूर्वेतील युद्धामुळे जवळपास ४ आठवडे स्ट्रेट होर्मुझमधील वाहतूक बाधित झाली आहे. याच कारणामुळे जगातील तेल-गॅस पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. या अरुंद जलमार्गावर केवळ इराणचा अधिकार नाही. हा सागरी मार्ग इराण आणि ओमान यांच्या जलक्षेत्रात विभागला गेला आहे. म्हणजे ओमान आणि इराण या दोघांचा यावर समान अधिकार आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये दोन्ही देश आपापल्या किनारपट्टीपासून १२ सागरी मैलांपर्यंतच्या स्थानिक सागरी क्षेत्रावर नियंत्रण ठेवतात. तरीही होर्मुझवर इराणचा प्रभाव अधिक आहे. त्यामागचं कारण म्हणजे इराणच्या सैन्याची ताकद ओमानपेक्षा अधिक प्रभावी आणि शक्तिशाली आहे.
ओमानपेक्षा इराणची सैन्य शक्ती मोठी
ग्लोबल मिलिट्री नेटच्या रिपोर्टनुसार, इराण जागतिक सैन्य क्रमवारीत १३ व्या स्थानावर आहे. सैन्य तुलनेत ओमानपेक्षा इराणची ताकद अधिक आहे. ओमान जागतिक सैन्य क्रमवारीत ५४ व्या क्रमांकावर आहे. इराणकडे ६ लाख ५० हजार सक्रीय सैन्य आहेत तर ओमानजवळ केवळ ४७ हजार सैनिक आहेत. इराणकडे ३ लाख ५० हजार राखीव सैनिक आणि ४० हजार अर्धसैनिक दल आहे. इराण संरक्षणावर ८ अब्ज डॉलर खर्च करते तर ओमान ६ अब्ज डॉलर खर्च करते. इराणी वायू सेनेत ६२७ विमाने आहेत त्यातील २८६ लढाऊ विमाने आहेत. ओमानकडे एकूण १२६ विमानांपैकी ३५ लढाऊ विमाने आहेत. नौदलाबाबत सांगायचे झाले तर इराणकडे ९७ जहाजे आहेत तर ओमानकडे २१ जहाज आहेत. त्यातही इराणकडे ६ पाणबुडी समाविष्ट आहेत. ओमानकडे सध्या एकही पाणबुडी नाही.
स्ट्रेट ऑफ होर्मुझबाबत अनेक तुलनेत इराणचे पारडे भारी आहे. इराणची भौगोलिक स्थिती त्यांच्या बाजूने आहे. होर्मुझची सामुद्रधुनी तिच्या सर्वात अरुंद ठिकाणी सुमारे २४ मैल रुंद आहे आणि जवळजवळ सर्व वाहतूक दोन मुख्य जलमार्गांमधून होते जी त्याहूनही अरुंद आहे. खुल्या महासागरात मार्ग बदलण्याचा पर्याय नेहमीच उपलब्ध असला तरी अरुंद खाडी किंवा अरुंद समुद्रात ते अशक्य आहे. याचा अर्थ इराणला आपल्या लक्ष्यांची टेहळणी करण्याची गरज नाही. ते शांत बसून वाट पाहू शकतात असं रॉयल युनायटेड सर्व्हिसेस इन्स्टिट्यूट या थिंक टँकचे जर्नल संपादक केविन रोलँड्स यांनी म्हटलं.
होर्मुझच्या सामुद्रधुनीला लागून इराणला १,००० मैलांचा किनारा लाभला
या भौगोलिक स्थितीत प्रभावीपणे एक 'किल झोन' (घातक क्षेत्र) तयार होतो, जिथे धोक्याची सूचना मिळायला फक्त काही सेकंदांचा वेळ मिळतो. शिवाय, इराणकडे सुमारे १,००० मैलांचा किनारा आहे, जिथून ते जहाजविरोधी क्षेपणास्त्रे डागू शकतात. या क्षेपणास्त्रात बॅटरी नेहमीच सक्रिय असतात, ज्यामुळे त्यांना नष्ट करणे कठीण होते आणि सामुद्रधुनीच्या लांब किनाऱ्यामुळे इराण होर्मुझच्या पलीकडून खूप दूरवरून हल्ले करू शकतो. शिवाय होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये इराण इतर नौदल शक्तींपेक्षा अधिक शक्तिशाली आहे, कारण कमी खर्चाचे ड्रोन आणि सागरी सुरुंग यांसारख्या अपारंपरिक युद्धपद्धतींमुळे इराण आपल्या भौगोलिक स्थानाचा फायदा घेऊन कोणत्याही जहाजावर किंवा युद्धनौकेवर अचूक हल्ले करू शकतो. ज्यामुळे अमेरिका किंवा इतर देशांना त्या अरुंद मार्गातून जहाजांचे संरक्षण करणे किंवा त्यांना लष्करीदृष्ट्या सुरक्षित करणे कठीण होते.
Web Summary : Despite shared control with Oman, Iran dominates the Strait of Hormuz due to its superior military strength and strategic geographical advantage. Iran's powerful navy, extensive coastline, and advanced missile capabilities enable it to exert significant influence over this crucial waterway, impacting global oil and gas supplies.
Web Summary : ओमान के साथ साझा नियंत्रण के बावजूद, ईरान अपनी बेहतर सैन्य शक्ति और रणनीतिक भौगोलिक लाभ के कारण होर्मुज जलसंधि पर हावी है। ईरान की शक्तिशाली नौसेना, विस्तृत तटरेखा और उन्नत मिसाइल क्षमताएं इसे इस महत्वपूर्ण जलमार्ग पर महत्वपूर्ण प्रभाव डालने में सक्षम बनाती हैं, जिससे वैश्विक तेल और गैस की आपूर्ति प्रभावित होती है।