अमेरिकेत खळबळ! सैन्य तळावर आढळलं संशयित ड्रोन; मार्को रुबियो, पेट हेगसेथ यांची सुरक्षा धोक्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2026 12:25 IST2026-03-19T12:23:05+5:302026-03-19T12:25:28+5:30

इराणकडून थेट अमेरिकन शहरांना टार्गेट केले जाईल अशी माहिती अलीकडेच एका रिपोर्टमधून पुढे आली होती. त्यानंतर अमेरिकेने त्यांच्या सैन्य तळांवरील सुरक्षा वाढवली आहे.

US Isreal Iran War: Suspicious drone found at US military base; Marco Rubio, Pete Hegseth's safety at risk | अमेरिकेत खळबळ! सैन्य तळावर आढळलं संशयित ड्रोन; मार्को रुबियो, पेट हेगसेथ यांची सुरक्षा धोक्यात

अमेरिकेत खळबळ! सैन्य तळावर आढळलं संशयित ड्रोन; मार्को रुबियो, पेट हेगसेथ यांची सुरक्षा धोक्यात

वॉशिंग्टन - पश्चिम आशियात अमेरिका-इस्रायलविरुद्ध इराण युद्ध सुरू आहे. अमेरिका, इस्रायली सैन्याकडून इराणच्या शहरांवर, सैन्य ठिकाणे आणि ऑईल क्षेत्रावर बॉम्ब हल्ले केले जात आहेत. इराणकडूनही अमेरिका आणि इस्रायलला जशास तसे उत्तर देण्यात येत आहे. त्यातच या यु्द्धात घडलेल्या एका घटनेने आखाती देशांपासून कित्येक मैल दूर असलेल्या अमेरिकेत खळबळ माजली आहे. अमेरिकन सैन्य हायअलर्ट झाले आहे.

अमेरिकेच्या एका सैन्य तळावर ड्रोन घिरट्या घालताना आढळून आला आहे. विशेष म्हणजे हा ड्रोन जेव्हा सैन्य तळावर घिरट्या घालत होता तेव्हा तिथे डोनाल्ड ट्रम्प प्रशासनातील २ मजबूत आणि प्रभावी चेहरे हजर होते. वॉशिंग्टन पोस्टनुसार, अमेरिकन परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो आणि संरक्षण मंत्री पेट हेगसेथ अमेरिकन सैन्य तळावर असताना याठिकाणी ड्रोन आढळून आला. अमेरिकेच्या मॅकनेअर येथे ही घटना घडली. मार्को रुबियो आणि पेट हेगसेथ यांचे निवासस्थान याच सैन्य तळावर आहे. याठिकाणी संशयित ड्रोन दिसल्यानंतर अमेरिकन सैन्यात खळबळ उडाली. तातडीने मार्को रुबियो आणि हेगसेथ यांना दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करण्यात आल्याचं बोललं जात आहे. परंतु याबाबत अधिकृत माहिती नाही.

पेंटागनचे मुख्य प्रवक्ते सीन पार्नेल यांनी संरक्षण मंत्री पेट हेगसेथ यांच्या हालचालींबाबत संबंधित कुठलीही माहिती देण्यास नकार दिला. सुरक्षेच्या कारणास्तव ही खबरदारी घेतली जात आहे. त्याशिवाय याप्रकारचे वृत्तांकन करणे बेजबाबदार असल्याचेही त्यांनी म्हटलं. अमेरिकन सैन्य तळावर संशयित ड्रोन आढळल्यानंतर व्हाईट हाऊसमध्ये उच्चस्तरीय बैठक घेण्यात आली आहे. या बैठकीनंतर अमेरिकन सैन्यासाठी हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. इराणकडून होणारा संभाव्य हल्ला पाहता अमेरिकन सैन्याने ही पाऊले उचलली आहेत. 

दरम्यान, इराणकडून थेट अमेरिकन शहरांना टार्गेट केले जाईल अशी माहिती अलीकडेच एका रिपोर्टमधून पुढे आली होती. त्यानंतर अमेरिकेने त्यांच्या सैन्य तळांवरील सुरक्षा वाढवली आहे. इराणच्या हल्ल्याचा संभाव्य धोका लक्षात घेऊन अमेरिकेने सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे. यासोबतच जगभरातील अमेरिकन राजनैतिक दूतावासांसाठी जागतिक सुरक्षा सतर्कतेचा इशाराही जारी करण्यात आला आहे.

Web Title : अमेरिकी सैन्य अड्डे पर ड्रोन से हड़कंप; रुबियो, हेगसेथ की सुरक्षा खतरे में

Web Summary : अमेरिकी सैन्य अड्डे पर संदिग्ध ड्रोन देखा गया, रुबियो, हेगसेथ निवास करते हैं। मध्य पूर्व तनाव के बीच ईरानी जवाबी कार्रवाई के डर से सुरक्षा बढ़ाई गई। व्हाइट हाउस में उच्च स्तरीय बैठक हुई।

Web Title : US Military Base Drone Scare: Rubio, Hegseth Security at Risk

Web Summary : Suspected drone spotted at US military base housing Rubio, Hegseth. Officials heightened security, fearing Iranian retaliation amidst escalating Middle East tensions. White House convened high-level meeting.