बदला घेणार! इराणच्या अणुऊर्जा प्रकल्पावर मोठा हल्ला; युरेनियम प्रक्रिया युनिटला केले टार्गेट
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2026 23:51 IST2026-03-27T23:50:41+5:302026-03-27T23:51:56+5:30
येलोकेक हे युरेनियम खनिजातून काढलेल्या युरेनियमचे प्राथमिक सुरुवातीचं रूप आहे. ही एक पिवळी पावडर आहे. हा अणुइंधन उत्पादनाचा पहिला टप्पा आहे

बदला घेणार! इराणच्या अणुऊर्जा प्रकल्पावर मोठा हल्ला; युरेनियम प्रक्रिया युनिटला केले टार्गेट
तेहरान - इराणवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला झाला आहे. इराणच्या न्यूक्लियर प्रकल्पाला टार्गेट करण्यात आल्याचा दावा इराणी सरकारी मीडियाने केला आहे. यात हेवी वॉटर प्लांट आणि येलोकेक प्रोडक्शन प्लांट यांचा समावेश आहे. अमेरिका, इस्रायलने मध्य इराणमधील हेवी वॉटर रिएक्टरला टार्गेट बनवले आहे.
अमेरिकन आणि इस्रायली सैन्याने दोन टप्प्यांत केलेल्या हल्ल्यात खोंदाब हेवी वॉटर कॉम्प्लेक्सला टार्गेट करण्यात आले असे मध्यवर्ती मार्काझी प्रांतातील अधिकारी हसन घामारी यांनी सांगितल्याचे फार्स न्यूज एजन्सीने म्हटले आहे. हेवी-वॉटर प्रकल्प आणि यलोकेक प्रोडक्शन प्रकल्प हे दोन्ही अणुऊर्जा कार्यक्रमासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. अणुभट्ट्यांमध्ये न्यूट्रॉनचा वेग कमी करण्यासाठी प्रामुख्याने हेवी वॉटरचा वापर केला जातो.
येलोकेक हे युरेनियम खनिजातून काढलेल्या युरेनियमचे प्राथमिक सुरुवातीचं रूप आहे. ही एक पिवळी पावडर आहे. हा अणुइंधन उत्पादनाचा पहिला टप्पा आहे. या येलोकेकवर पुढे प्रक्रिया करून अणुबॉम्ब बनवले जातात. मिळालेल्या माहितीनुसार, खोंदाब अणुऊर्जा प्रकल्पावर अंदाजे १० वेळा हल्ला झाला आहे. घटनास्थळावरून काळ्या धुराचे लोट बाहेर पडत आहेत. आतापर्यंत कोणतीही जीवितहानी किंवा जखमी झाल्याचे वृत्त नाही. घटनास्थळावरून किरणोत्सर्ग झाल्याचे कोणतेही वृत्त नाही.
جمعه ۷ فروردین ساعت ۱۷:۵۰
— مملکته (@mamlekate) March 27, 2026
حمله به نیروگاه خنداب
تقریبا ده بار زد
از نیروگاه داره دود سیاه میاد
یه چیزی زد که داره میسوزه pic.twitter.com/SzdpXVNe9G
खोंदाब ऊर्जा प्रकल्प मध्य इराणमधील अराक शहराच्या जवळ खोंदाब परिसरात वसलेला आहे. पूर्वी तो अराक हेवी वॉटर रिएक्टर किंवा आयआर-४० (IR-40) म्हणून ओळखला जात होता. २०१७ मध्ये त्याचे अधिकृत नाव बदलून खोंदाब हेवी वॉटर रिसर्च रिएक्टर असे ठेवण्यात आले. हा एक पारंपरिक वीज-उत्पादक ऊर्जा प्रकल्प नसून एक हेवी पाण्यावर चालणारा संशोधन अणुभट्टी प्रकल्प आहे. हेवी पाण्याच्या अणुभट्ट्या नैसर्गिक युरेनियमवर चालू शकतात आणि त्यातून प्लुटोनियम हे उप-उत्पादन तयार होते, ज्यामुळे त्या अणुप्रसारासाठी संवेदनशील ठरतात.
इराणचा इशारा
दरम्यान, या हल्ल्यानंतर इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने (IRGC) अमेरिकन आणि इस्त्रायली औद्योगिक कंपन्या व उद्योगांमधील कामगारांना तात्काळ आपलं कार्यस्थळे सोडण्याचे आवाहन केले आहे. एका हेवी-वॉटर प्लांट आणि यलोकेक उत्पादन प्लांटला लक्ष्य केल्यानंतर इराणने हा इशारा दिला आहे. इराणी सैनिक या प्रदेशातील ज्या औद्योगिक कंपन्यांमध्ये अमेरिकेचे हितसंबंध आहेत, त्यांच्यावर प्रतिशोधात्मक हल्ले करत आहेत तसेच या प्रदेशातील इस्त्रायली सहयोगी असलेल्या अवजड उद्योगांनाही लक्ष्य करत आहेत असं इराणने बजावले आहे.