शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबतची डील यशस्वी झाली तर पूर्ण श्रेय माझे, फेल झाली तर जेडी वेन्सचे...; ट्रम्प यांचे मिश्कील विधान, पण खळबळजनक... 
2
बच्चू कडू यांच्यावर हत्येचा कट रचल्याप्रकरणी गुन्हा; आमदाराच्या चुलत भावालाच संपवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप
3
राज्यसभेत सर्वसामान्यांचा आवाज असलेल्या राघव चड्ढा यांचे शिक्षण किती? ‘अशी’ आहे राजकीय कारकीर्द
4
इराणनं आखला बदल्याचा 'मास्टर प्लॅन'! आखाती देशांतील ८ मोठे पूल 'हिट लिस्ट'वर; बघा संपूर्ण लिस्ट
5
आईस्क्रीम खाल्लं तर ५००० दंड! भारतातील 'या' गावाचा अजब पण धाडसी निर्णय; कारण काय?
6
इराण युद्धातच रशिया पुन्हा भारताच्या मदतीला; SU-30 लढाऊ विमाने घेणार भरारी, चीन-पाकला धडकी
7
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
8
कोणी केली डोनाल्ड ट्रम्प यांची येशू ख्रिस्तांशी तुलना? 'त्या' वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले...
9
वॉरेन बफे यांचे सूत्र भारतात हिट! १९०० अंकांच्या घसरणीनंतर सेन्सेक्स सावरला, कसे ओळखायचे 'व्हॅल्यू बाइंग'?
10
Crude Oil: भारताऐवजी चीनकडे वळला इराणचा कच्च्या तेलाचा टँकर; गुजरातला येणाऱ्या जहाजाचा ऐनवेळी मार्ग बदलला
11
डॉक्टरचा हलगर्जीपणा नडला! फोनवर नर्सला दिल्या डिलिव्हरीच्या सूचना; आईसह बाळाचा मृत्यू
12
पश्चिम बंगालमधील सर्वात 'लेटेस्ट' निवडणूक सर्वेक्षणात भाजपची मोठी मुसंडी; TMC ला झटका! जनतेचा 'मूड' बदलला?
13
“बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत महाविकास आघाडीचे प्रमुख नेते निर्णय घेतील”: संजय राऊत
14
तुम्ही घाबरलात राघव...! राज्यसभेतील उपनेते पदावरून हटविण्यामागचे कारण समोर आले, आपचे थेट आरोप... 
15
INS तारागिरी! समुद्रात येतंय वादळ, भारताची नौदल ताकद वाढणार; किती विध्वंसक आहे युद्धनौका?
16
अमेरिकेने इराणमध्ये मर्यादा ओलांडल्या! जिनिव्हा कन्व्हेन्शनचे नियम पायदळी तुडवले, काय केले..?
17
"आमच्या घरी नोटांची बंडलं यायची अन् बाबा..." ढोंगी अशोक खरातच्या मुलानेच उघडली पित्याची कुंडली
18
Life Lesson: जपानी लोकांसारखं यशस्वी आणि दीर्घायुषी व्हायचंय? 'या' सात नियमांचे आजपासून पालन करा
19
भयंकर! बिहारमध्ये विषारी दारूने घेतला चौघांचा बळी; अनेकांची गेली दृष्टी, ७ जणांची मृत्यूशी झुंज
20
इस्रायलचा पुन्हा एकदा विश्वासघात, नेतन्याहू संतापले; भारताच्या २ मित्र देशांमध्ये तणाव वाढला
Daily Top 2Weekly Top 5

अमेरिका-इस्रायलविरोधात इराणला कोण देतंय 'संजीवनी'?; सर्वोच्च नेता मागे हटण्यास तयार नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2026 20:53 IST

एकेकाळी एकमेकांपासून अंतर राखणारे हे देश आज एकमेकांचे अत्यंत जवळचे भागीदार बनले आहेत.

तेहरान - रशिया आणि इराण यांची मैत्री जगजाहीर आहे. हे दोन्ही देश पाश्चात्य देशांच्या अनेक निर्बंधांचा सामना करत आहेत. त्यामुळे या दोघांची मैत्री दिवसेंदिवस आणखी घट्ट होत आहे. अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धात भलेही रशिया थेट सहभागी नसेल परंतु इराणला शस्त्र आणि अन्य मार्गातून तो पहिल्यासारखा मदत करत आहे. या युद्धात सावलीसारखा रशिया इराणसोबत उभा आहे. शस्त्रांपासून स्पेस मिशनपर्यंत रशिया इराणची कशी मदत करतोय हे लोकांना जाणण्याची उत्सुकता आहे.

मागील काही वर्षात जागतिक राजकारण वेगाने बदलले आहे. या बदलात रशिया आणि इराण यांच्या मैत्रीची सर्वाधिक चर्चा आहे. एकेकाळी एकमेकांपासून अंतर राखणारे हे देश आज एकमेकांचे अत्यंत जवळचे भागीदार बनले आहेत. ही भागीदारी केवळ कागदावर मर्यादित नाही तर युद्धाच्या मैदानापासून अंतराळापर्यंत उंच ही पसरली आहे. या दोघांच्या मैत्रीचा मुख्य आधार संरक्षण क्षेत्र आहे. युक्रेन युद्ध सुरू झाल्यापासून रशियाला मोठ्या प्रमाणात शस्त्रांची गरज भासत आहे. या काळात इराणने रशियाची मदत केली. इराणने रशियाला त्यांचे ड्रोन दिले. हे ड्रोन स्वस्त आणि दूरपर्यंत मारक क्षमतेचे आहेत. रशियाने याचा वापर करून युक्रेनच्या पायाभूत सुविधांना टार्गेट केले. या बदल्यात रशिया आता इराणला त्यांचे सर्वात आधुनिक तंत्रज्ञान देत आहे.

रशिया देणार इराणला लढाऊ विमाने

इराण कित्येक वर्षापासून त्यांच्या वायू सैन्याला आधुनिक बनवू इच्छितो. रशिया इराणला आता SU-35 ही लढाऊ विमाने देण्याची तयारी करत आहे. ही विमाने जगातील उत्तम लढाऊ विमानांपैकी एक मानली जातात. त्याशिवाय रशिया इराणला प्रगत वायू संरक्षण प्रणाली म्हणजे एअर डिफेन्स सिस्टम आणि रडार तंत्रज्ञान देणार आहे. त्यातून इराण त्यांच्या सीमेवरील सुरक्षा क्षमता अनेक पटीने वाढवू शकते.

अंतराळ मिशनमध्येही सहकार्य

रशिया आणि इराण यांच्यातील संबंध जमिनीपुरते राहिले नाही तर रशिया आता इराणला अंतराळात जगातील सर्वात मोठा खेळाडू बनवण्यासाठी मदत करत आहे. इराण आपल्या स्पेस कार्यक्रमात खूप संघर्ष करत होता परंतु रशिया सोबत आल्याने त्याला गती मिळाली. अलीकडेच रशियाने इराणसाठी खय्याक नावाचे सॅटेलाइट लॉन्च केले. जे हाय रिजॉल्यूशन रिमोट सेंसिंग सॅटेलाईट आहे. रशियाने हे कझाकिस्तान येथील बॅकोनूर कॉस्मोड्रोमहून अंतराळात पाठवले. या सॅटेलाईटच्या मदतीने इराण आपल्या सीमेची देखरेख चांगल्यारितीने करू शकतो. मात्र याचा वापर शेती आणि पर्यावरणाच्या देखरेखीसाठी होईल असं इराणने म्हणते. परंतु पाश्चात्य देशांच्या भीतीने याचा वापर हेरगिरीसाठीही केला जाऊ शकतो. रशिया इराणला वैज्ञानिक प्रशिक्षणही देत आहे जेणेकरून भविष्यात ते स्वत: रॉकेट आणि सॅटेलाइट विकसित करू शकतील.

इंटरनॅशनल नॉर्थ साऊथ ट्रान्सपोर्ट कॉरिडोरचं वेगाने काम

इराण आणि रशिया इंटरनॅशनल नॉर्थ साऊथ ट्रान्सपोर्ट कॉरिडोरचे वेगाने काम करत आहे. हा एक असा रस्ता आहे ज्यामुळे रशिया इराणच्या माध्यमातून भारत आणि अन्य आशियाई देशांना जोडेल. हा मार्ग सुएझ कालव्यापेक्षा लहान आणि स्वस्त असून त्यामुळे दोन्ही देशांमधील व्यापार वाढतो आणि पाश्चात्य निर्बंधांचा प्रभाव कमी होतो. रशियाने आंतरराष्ट्रीय व्यासपीठावरही सातत्याने इराणचे समर्थन केले आहे. रशिया संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत इराणविरोधी ठरावांना वारंवार विरोध करतो. त्या बदल्यात इराण आंतरराष्ट्रीय राजकारणातील रशियाच्या निर्णयांना पाठिंबा देतो.

रशियाकडून मिळणाऱ्या आधुनिक शस्त्रास्त्रांमुळे मध्य-पूर्वेत इराणची शक्ती वाढत आहे. यामुळे इस्रायल आणि अमेरिकेसाठी चिंता वाढली आहे. रशियाच्या पाठिंब्याने इराण अंतराळ आणि क्षेपणास्त्र तंत्रज्ञानात लक्षणीय प्रगती करू शकतो. रशिया, इराण आणि चीन एक अशी आघाडी तयार करत आहेत, जी अमेरिकेच्या वर्चस्वाला आव्हान देऊ शकते. त्यामुळे रशिया आणि इराण यांच्यातील संबंध आता केवळ एक गरज राहिलेली नाही तर ती एक धोरणात्मक गरज बनली आहे. रशियाला युद्धासाठी ड्रोन आणि दारुगोळ्याची गरज आहे तर इराणला आपल्या संरक्षणासाठी आधुनिक विमाने आणि उपग्रह तंत्रज्ञानाची आवश्यकता आहे. जो करार शस्त्रास्त्रांचा होता, त्याचा विस्तार आता अंतराळ मोहिमा आणि प्रमुख आर्थिक मार्गांपर्यंत झाला आहे. भविष्यात ही मैत्री जागतिक नकाशावर कोणते नवीन बदल घडवून आणते हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.

English
हिंदी सारांश
Web Title : Russia's Support Fuels Iran Against US-Israel; Supreme Leader Unwavering.

Web Summary : Russia bolsters Iran with arms, space tech amid US tensions. This partnership, driven by mutual needs, challenges US dominance, reshaping global dynamics with defense and economic cooperation.
टॅग्स :US Israel Iran Warअमेरिका-इस्रायल-इराण वॉरIranइराणrussiaरशियाAmericaअमेरिका