वॉशिंग्टन - अमेरिकन राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनाइजेशन(NATO) सदस्य देशांवर संताप व्यक्त केला आहे. इराणविरोधातील लढाईत नाटो देशांनी अमेरिकेची मदत केली नाही असं त्यांनी म्हटलं. सोबतच अमेरिकेचा प्रस्ताव स्वीकारा अन्यथा पुन्हा हल्ल्यासाठी तयार राहा अशी धमकी इराणला दिली आहे. ट्रम्प यांची नाराजी अशावेळी समोर आली आहे जेव्हा अमेरिकेचे बहुतांश मित्र देश मध्य पूर्वेतील संघर्षापासून स्वत:ला दूर ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत.
डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरुवारी ट्रुथ सोशलवर त्यांची पोस्ट लिहिली. त्यात म्हटलं की, नाटो देशांनी इराणविरोधात युद्धात काहीच केले नाही. अमेरिकेला नाटोकडून कुठल्याही गोष्टीची गरज नाही परंतु आम्ही हे दिवस नक्कीच लक्षात ठेवू अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली. ट्रम्प यांनी याआधीही नाटो देशांवर टीका केली होती. ट्रम्प यांनी पुन्हा एकदा त्यांच्या शैलीत एकीकडे नाटो देशांना अमेरिकेला मदत न केल्यामुळे फटकारले तर दुसरीकडे इराणच्या भूमिकेवरही संताप व्यक्त केला. इराणला लवकरात लवकर गोष्टी मानायला हव्यात कारण तडजोडीसाठी वेळ निघून जात आहे असं त्यांनी सांगितले.
तसेच इराणी वाटाघाटी करणारे खूपच वेगळे आणि विचित्र आहेत. ते आम्हाला तडजोड करण्याची भीक मागत आहेत आणि त्यांनी ते करायलाच हवे. कारण ते लष्करीदृष्ट्या पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहेत आणि सावरण्याचा त्यांच्याकडे कोणताही मार्ग नाही. तरीही ते जाहीरपणे म्हणतात की ते अमेरिकेच्या प्रस्तावावर 'विचार करत' आहेत. ही पद्धत योग्य नाही असं डोनाल्ड ट्रम्प यांनी बजावले.
इराणला गंभीर व्हावं लागेल - ट्रम्प
इराणने खूप उशीर होण्याआधी गंभीर व्हावे. कारण वारंवार असे होत राहिले तर परतीचा कुठलाही मार्ग नसेल आणि त्याचा परिणाम चांगला होणार नाही. अमेरिकेचा प्रस्ताव स्वीकारणे हेच इराणच्या भल्याचे ठरेल असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. या आठवड्याच्या सुरुवातीलाच अमेरिका आणि इराण यांच्यात संघर्ष संपवण्यासाठी चर्चा सुरू असल्याचे ट्रम्प यांनी सांगितले होते. त्यांनी यापूर्वी इराण करारासाठी आतुर आहे, परंतु अंतर्गत परिणामांच्या भीतीने ते जाहीरपणे बोलण्यास घाबरत आहे असं म्हटले होते. २८ फेब्रुवारी रोजी अमेरिका आणि इस्रायलने इराणवर हल्ला केल्यानंतर युद्ध सुरू झाल्यापासून ट्रम्प यांनी अनेक निवेदने जारी केली आहेत.
Web Summary : Trump criticizes NATO for not aiding America against Iran. He threatens Iran, urging acceptance of a deal or facing renewed attacks. Trump emphasizes Iran's military weakness and insists they are secretly seeking a deal, despite public denials. He warns Iran to act swiftly.
Web Summary : ट्रम्प ने ईरान के खिलाफ अमेरिका की मदद न करने के लिए नाटो की आलोचना की। उन्होंने ईरान को धमकी दी, सौदे को स्वीकार करने या नए हमलों का सामना करने का आग्रह किया। ट्रम्प ने ईरान की सैन्य कमजोरी पर जोर दिया और जोर देकर कहा कि वे सार्वजनिक इनकार के बावजूद गुप्त रूप से एक सौदा चाहते हैं। उन्होंने ईरान को तुरंत कार्रवाई करने की चेतावनी दी।