इस्रायलमध्ये मिसाइल हल्ल्यावेळी सर्वात जास्त जीव वाचवणारी प्रणाली आयरन डोम नाही तर त्याची मिसाइल वॉर्निंग सिस्टम आहे. या सिस्टमचं अधिकृत नाव होम फ्रंट कमांड अलर्ट सिस्टम असून सामान्य भाषेत त्याला रेड अलर्ट म्हटलं जाते. आयरन डोम मिसाइलला हवेतच रोखतो परंतु ही वॉर्निंग सिस्टम लोकांना सेकंदात अलर्ट करून त्यांना सुरक्षित ठिकाणी जाण्यासाठी सतर्क करते. ही सिस्टम आयरन डोमपेक्षाही जास्त जीव वाचवते कारण वेळीच इशारा मिळाल्यानंतर लोक शेल्टरसारख्या सुरक्षित ठिकाणी पोहचतात.
कशी चालते ही सिस्टम?
जेव्हा इराण अथवा हिजबुल्लाह मिसाइल हल्ला करते तेव्हा इस्रायलचे रडार नेटवर्क ज्यात EL/M2084 सारख्या आधुनिक रडारचा समावेश आहे. मिसाइल लॉन्च होताच ती रडारवर येते. रडार मिसाइलचा वेग, दिशा आणि टार्गेट पटवून घेतो. त्यानंतर बॅटल मॅनेजमेंट सेंटर ही मिसाइल कुठल्या भागात पाडायची हे ठरवते. जर बहुसंख्य लोक असलेल्या भागाकडे ही मिसाइल जात असेल तर तातडीने सिस्टम अलर्ट जारी करते. यात २ प्रकारचे अलर्ट असतात. मोबाइल फोनवर होम फ्रंट कमांड APP आणि SMS द्वारे जोरदार आवाजासह मेसेज येतो. त्याशिवाय परिसरातील सायरन वाजू लागतात.
किती सेकंदात अलर्ट सक्रीय होतो?
लांब पल्ल्याची बॅलेस्टिक मिसाइल असेल तर अलर्ट १५ ते ३० मिनिटाआधीपासून सुरू होतो. मिसाइल लॉन्च झाल्यानंतर आधीच्या १० मिनिटांत लाउड एसएमएस अलर्ट जारी केला जातो. ९० सेकंद आधी सायरन वाजण्यास सुरुवात होते. गाजा अथवा लेबनानहून येणाऱ्या छोट्या रॉकेट्ससाठी केवळ १५ सेकंदाचा वेळ मिळतो. या छोट्या कालावधीत लोक तातडीने सुरक्षित ठिकाणी अथवा शेल्टरमध्ये जातात.
आयरन डोमपेक्षा जास्त प्रभावी का?
आयरन डोम मिसाइलला हवेतच रोखतो. परंतु प्रत्येक मिसाइल तो पकडू शकत नाही. जेव्हा शेकडो मिसाइल एकाचवेळी येतात तेव्हा त्यातील काही सुटतात. परंतु वॉर्निंग सिस्टम प्रत्येक मिसाइलसाठी अलर्ट देतो. त्यामुळे लोक वेळीच लपतात आणि जीव वाचतात. इस्रायलमध्ये कित्येक वर्ष लोकांना प्रशिक्षण दिले जात आहे. त्यामुळे लोक १५ सेकंदात सुरक्षित ठिकाणी पोहचतात. ही अलर्ट सिस्टम इस्रायलमध्ये सर्वात जास्त जीव वाचवणारी व्यवस्था आहे. इराणसोबतच्या युद्धात इराणने तेल अवीव आणि अन्य शहरांवर मिसाइल हल्ले केले तेव्हा याच वॉर्निंग सिस्टमने लाखो लोकांचे जीव वाचवले. अनेक ठिकाणी लोक ९० सेकंदाच्या आधीच शेल्टरला पोहचले. ज्यातून मोठी जीवितहानी टळली. जर ही प्रणाली इस्रायलकडे नसती तर खूप जास्त नुकसान झाले असते. आधुनिक युद्धात वेळीच अलर्ट जारी केल्याने कित्येक जीव वाचू शकतात हे या प्रणालीने दाखवून दिले.
Web Summary : Israel's missile warning system, the 'Red Alert,' is crucial for saving lives during attacks. More effective than Iron Dome, it quickly alerts citizens, giving them vital seconds to reach safety shelters, minimizing casualties from incoming missiles.
Web Summary : इज़राइल की मिसाइल चेतावनी प्रणाली, 'रेड अलर्ट', हमलों के दौरान जीवन बचाने के लिए महत्वपूर्ण है। आयरन डोम से ज़्यादा असरदार, यह नागरिकों को तुरंत सतर्क करता है, जिससे उन्हें सुरक्षित आश्रयों तक पहुँचने के लिए ज़रूरी समय मिल जाता है, और आने वाली मिसाइलों से होने वाली हताहतों को कम किया जा सकता है।