ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2026 18:25 IST2026-04-03T18:25:05+5:302026-04-03T18:25:39+5:30

सातत्याने होणारे हल्ले पाहता आखाती प्रदेशातील तणाव शांत होण्याऐवजी आणखी चिघळण्यासाठी शक्यता वर्तवली जात आहे.

US Israel Iran War: US-Israeli attack on the B1 Bridge in Karaj resulted in 8 deaths and 95 civilian injuries | ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी

ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी

तेहरान - आखाती देशात अमेरिका इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेले युद्ध आणखी पेटण्याची चिन्हे दिसत आहेत. आताच वेळ आहे, इराणनं तडजोड करावी अन्यथा त्यांच्याकडे काहीच शिल्लक राहणार नाही अशी धमकी डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली होती. त्यानंतर या दोन्ही देशात तणाव वाढला. ट्रम्प यांच्या धमकीला इराणचे राष्ट्रपती मसूद पझेश्कियन यांनी प्रत्युत्तर दिले. इराण अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्याचा सामना करण्यासाठी पूर्ण तयार आहे. आम्ही पूर्ण क्षमता वापरू. इराण मागे हटणार नाही असं त्यांनी स्पष्ट सांगितले.

इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला

अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी दावा केलाय की, अमेरिका इस्रायलने इराणमधील सर्वात मोठा उंच पूल नष्ट केला आहे. इराणला पाषाण युगात पाठवण्याच्या धमकीनंतर अमेरिकेने काही तासांत हा हल्ला केला. स्थानिक अधिकाऱ्यांच्या मते, अलबोर्ज परिसरातील हा बी-१ ब्रिजवर मोठा हल्ला झाला. त्यात प्रचंड नुकसान झाले आहे. या हल्ल्यात कमीत कमी ८ लोक मारले गेलेत तर ९५ लोक जखमी झालेत अशी माहिती दिली. सातत्याने होणारे हल्ले पाहता आखाती प्रदेशातील तणाव शांत होण्याऐवजी आणखी चिघळण्यासाठी शक्यता वर्तवली जात आहे.

आतापर्यंत युद्धात काय काय झालं?

अमेरिका इस्रायलने इराणवरील हल्ले वाढवले आहेत. तेहरानमधील १०० वर्ष जुन्या मेडिकल रिसर्च सेंटरवर टार्गेट हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यानंतर इराणनेही इशारा दिला आहे. हे युद्ध आता तोपर्यंत सुरू राहील जोपर्यंत शत्रूंची नाचक्की आणि गुडघे टेकत नाही. इराणने अमेरिकेला संभाव्य जमिनीवरील कारवाईवरूनही सुनावले आहे. इराणने अबूधाबीतील गॅस फॅसिलिटीवरही हल्ल्याचा प्रयत्न केला आहे. इराणचा हा हल्ला हवेतच रोखल्याची अबूधाबीतील अधिकाऱ्यांनी माहिती दिली. मात्र मलब्यामुळे गॅस फॅसिलिटीत नुकसान झाल्याचे त्यांनी सांगितले. 

दरम्यान, इराणने कुवेतच्या पाणी प्लांटवरही हल्ला केला आहे. एका खार पाणी शुद्धीकरण प्रकल्पावर इराणने हल्ला केला आहे. आपत्कालीन पथके सध्या घटनास्थळी असून बचाव आणि मदतकार्य करत आहेत असं कुवेतच्या विद्युत आणि जल मंत्रालयाने सांगितले. हा तोच प्रकल्प आहे जो समुद्राचे पाणी पिण्यायोग्य बनवतो. जर इराणने आखाती देशांतील जलप्रकल्पांवर हल्ले करणे सुरूच ठेवले तर इथल्या देशांना पाण्याच्या प्रत्येक थेंबासाठी झटावं लागेल. 

Web Title : ईरान के सबसे बड़े पुल पर हमला, 8 की मौत, मध्य पूर्व संघर्ष बढ़ा

Web Summary : ईरान के प्रमुख पुल पर हमले से तनाव बढ़ा, हताहत। अमेरिका और इजरायल पर संदेह। ईरान ने जवाबी कार्रवाई की कसम खाई, चेतावनी के बावजूद क्षेत्रीय संघर्ष बढ़ा।

Web Title : Iran's Largest Bridge Attacked, 8 Dead, Escalating Middle East Conflict

Web Summary : Tensions soar as Iran's major bridge is attacked, resulting in casualties. The US and Israel are suspected. Iran vows retaliation, escalating regional conflict despite warnings.