इराण नाही मात्र युद्ध दीर्घकाळ चाललं तर 'या' अरब देशात होईल सत्तापालट; देशात पसरतोय असंतोष

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2026 18:37 IST2026-03-28T18:36:07+5:302026-03-28T18:37:08+5:30

जर स्थिती सुधारली नाही तर बहरीनमध्ये २०११ च्या अरब स्प्रिंगसारखी स्थिती उद्भवू शकते. त्यावेळी मोठ्या प्रमाणात विरोध प्रदर्शने झाली होती. जी कठोर कारवाईने दडपण्यात आली

US Israel Iran War: On Iran but if the war lasts long there will be a coup in bahrain | इराण नाही मात्र युद्ध दीर्घकाळ चाललं तर 'या' अरब देशात होईल सत्तापालट; देशात पसरतोय असंतोष

इराण नाही मात्र युद्ध दीर्घकाळ चाललं तर 'या' अरब देशात होईल सत्तापालट; देशात पसरतोय असंतोष

अमेरिका इस्रायल आणि इराण युद्धाचा परिणाम आता थेट बहरीनमध्ये दिसू लागला आहे. एकीकडे इराणमध्ये सत्ता परिवर्तनाची चर्चा होत असताना आता बहरीनमध्ये देशातंर्गत अस्थिरता वेगाने वाढताना पाहायला मिळत आहे. शिया समुदायाचे लोक रस्त्यावर उतरले आहेत आणि परिस्थिती इतकी बिघडली आहे की सरकारला कठोर कारवाई करावी लागत आहे.

रिपोर्टनुसार, २८ फेब्रुवारीला युद्ध सुरू झाल्यानंतर बहरीनमध्ये आतापर्यंत २०० हून अधिक लोकांना अटक करण्यात आली आहे. ज्यात बहुतांश शिया मुसलमानांचा समावेश आहे. या अटकेमागे देशद्रोह, हेरगिरी, शत्रूला मदत करणे आणि नेतृत्वाविरोधात द्वेष पसरवण्यासारखे गंभीर गुन्हे नोंदवले आहेत. एका ३२ वर्षीय शिया सामाजिक कार्यकर्ता मोहम्मद अलमोसावी याचा पोलीस अटकेत असताना मृत्यू झाल्यानंतर तिथे तणाव वाढला आहे. मानवाधिकार संघटनांनी या मृत्यूवर संशय व्यक्त करत निष्पक्ष चौकशीची मागणी केली आहे. अटकेदरम्यान त्याचा छळ करण्यात आल्याचा आरोप होत आहे. ज्यामुळे परिस्थिती आणखी चिघळली.

शिया समुदायाची संख्या अधिक, सुन्नीच्या हातात सत्ता

बहरीनची सामाजिक रचना फार पूर्वीपासून संवेदनशील राहिली आहे. येथील बहुसंख्य लोकसंख्या म्हणजे सुमारे ६० टक्के हिस्सा शिया समुदायाचा आहे. परंतु इथली सत्ता सुन्नी समुदायाच्या हाती आहे. हा असमतोल अनेकदा संघर्षाचे कारण ठरला आहे. सध्याच्या संकटात ही जुनी जखम पुन्हा वर आली आहे. बहरीन इन्स्टिट्यूट फॉर राइट्स अँड डेमॉक्रसीसारख्या संघटनांच्या मते देशात भीती आणि दहशतीचे वातावरण आहे. अटक केलेल्या अनेक व्यक्तींना वकील मिळवण्यास मनाई केली जात आहे आणि त्यांच्या कुटुंबीयांना माहिती दिली जात नाही. इराणला पाठिंबा देणारी किंवा युद्धाशी संबंधित सामग्री असलेल्या सोशल मीडिया पोस्ट्सचाही अटकेसाठी आधार म्हणून वापर केला जात आहे.

अमेरिकन ठिकाणांच्या हल्ल्याचं शियांकडून समर्थन

या संपूर्ण घडामोडीमागे बहरीनचे सामरिक स्थान हे एक प्रमुख कारण आहे. अमेरिकेच्या पाचव्या नौदलाचे मुख्यालय या देशात आहे आणि सरकारने इस्रायलसोबत संबंध सामान्य केले आहेत. युद्धाच्या सुरुवातीला इराणने याच नौदलाला लक्ष्य केले होते. सामान्य जनतेचा एक मोठा वर्ग विशेषतः शिया समुदायाला इराणशी सहानुभूती आहे आणि त्यामुळे त्यांनी अमेरिकी तळांवरील हल्ल्यांना समर्थन दिले आहे. 

दरम्यान, जर स्थिती सुधारली नाही तर बहरीनमध्ये २०११ च्या अरब स्प्रिंगसारखी स्थिती उद्भवू शकते. त्यावेळी मोठ्या प्रमाणात विरोध प्रदर्शने झाली होती. जी कठोर कारवाईने दडपण्यात आली. सध्या बहरीन एका नाजूक काळातून जात आहे. जर इराणसोबत युद्ध आणखी दिर्घकाळ चालले तर त्याचा सर्वात मोठा परिणाम बहरीनसारख्या छोट्या देशावर होईल. जिथे अंतर्गत असंतोष कोणत्याही क्षणी मोठ्या राजकीय संकटात बदलू शकतो.

Web Title : बहरीन में अशांति बढ़ी; ईरान से युद्ध सत्ता परिवर्तन का कारण बन सकता है।

Web Summary : बहरीन अमेरिका-ईरान तनाव के बीच आंतरिक अशांति का सामना कर रहा है। शिया असंतोष कथित अधिकारों के हनन और सरकार के पक्षपातपूर्ण रवैये से भड़क रहा है। लम्बा संघर्ष राजशाही को अस्थिर कर सकता है।

Web Title : Bahrain unrest rises; war with Iran could trigger regime change.

Web Summary : Bahrain faces growing internal unrest amid US-Iran tensions. Shia discontent simmers, fueled by alleged rights abuses and perceived government favoritism. Prolonged conflict could destabilize the monarchy.